top of page
खोज करे
लेखक की तस्वीरEKNATH GOFANE

' आदिवासींचे अंतरंग '- आदिवासी समाज जीवनाचं दर्शन घडविणारं शासनाचं कॉफी टेबल बुक -

पुस्तक परिचय : -


आदिवासी समाज जीवनाचं दर्शन घडविणारं शासनाचं कॉफी टेबल बुक - ' आदिवासींचे अंतरंग '

----------------------

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे प्रकाशित करण्यात आलेलं आदिवासींचे अंतरंग हे ' कॉफी टेबल बुक ' हे पुस्तक ,

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून प्रकाशित करण्यात आले आहे .

यामध्ये सातपुडा विभागातील जमाती, सह्याद्री विभागातील गोंडवाना विभागातील जमाती , यासोबत आदिवासी क्रांतिकारक व प्रेरणा गाथा दिल्या आहेत . लोकसंख्या प्रमाण , लोकपरंपरा , संस्कृती , यांची सचित्र माहिती दिली आहे .

या पुस्तकाच्या निर्मितीसाठी डॉ .जॉन गायकवाड

मानवशास्त्रज्ञ T R TI पुणे यांच्या माहितीचा स्रोत उपयोगात आला आहे .

आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या संकल्पनेला प्रकल्प प्रमुख डॉक्टर राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनातून किरण पाटील यांच्या सुंदर अशा डिझाईनने वरिष्ठ संशोधन अधिकारी डॉ . चिद्विलास मोरे यांच्या सहयोगाने व श्रीकृष्ण परांजपे पुणे , लीलावती प्रकाशन - नाशिक ,डॉ .रमेश रघतवान ,कपिल पाटील विरु कदम यांच्या छायाचित्राने हा अंक बोलका केला आहे .

आदिवासी जमाती त्यांचं जगणं त्यांच्या परंपरा त्यांची संस्कृती त्यांच्या राहण्याची धाटणी जीवनशैली यांची सचित्र बोलकी अशी माहिती अभ्यासकांना संशोधकांना आणि विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल .

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमातींची जनतेला तोंड ओळख व्हावी या उद्देशाने या कॉपी टेबल बुक ची निर्मिती करण्यात आलेली आहे .

महाराष्ट्रात वास्तव्यास असणाऱ्या आदिवासी जमातींची माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे .

सातपुडा विभागात राहणाऱ्या भिल्ल जमात कोकणा / कोकणी जमात , मावची जमात ,पावरा जमात , धानका जमात , तडवी भिल्ल जमात , कोरकू जमात , भिलाला जमात यांची माहिती पृष्ठ क्रमांक ३ ते ९५ वर उपलब्ध आहे .

सह्याद्री विभागातील वारली जमात ,कोळी महादेव ,कोळी मल्हार ,कातकरी जमात , दुबळा जमात ,धोडिया जमात , ठाकर / ठाकूर जमात , पारधी ,कोळी जमात यांच्या विषयी माहिती पृष्ठ क्रमांक १०७ ते १८७ यावर नोंदवण्यात आलेली आहे .

गोंडवाना विभागातील माडिया जमात ,गोंड जमात ,हलबा कोलाम ,परधान , अंध या जमातींची माहिती पृष्ठ क्रमांक १९७ ते २४९ यावर सचित्र देण्यात आलेली आहे .

याशिवाय आदिवासी क्रांतिकारक व प्रेरणादायी व्यक्तींच्या प्रेरणा गाथा यांची माहिती पृष्ठ क्रमांक 257 ते 20067 मध्ये देण्यात आलेले आहे .

पद्मश्री जिव्या सोमा वसे ( वारली चित्रकार )

पद्मश्री सौ . राहीबाई पोपरे (बीजमाता )आणि आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या कार्याचा सचित्र आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे .

वेगवेगळ्या जमातींची माहिती देताना त्या जमातींची तोंड ओळख ,त्यांची भाषा ,त्यांची गोत्र व कुळे ,जमातींच्या पारंपारिक पंचायत ,धर्म ,सण उत्सव ,आहार , व्यवसाय ,पोशाख व दागिने , विवाहाच्या पद्धती , जन्ममृत्यू संस्कार , त्यांची विधी ,सण उत्सवातील परंपरा हा सगळा सुंदर असा चित्रमय पट या पुस्तकात मांडलेला आहे .

सातपुड्यातील या मोगी माता

व विविध जमातींच्या धार्मिक परंपराचं सचित्र असं दर्शन या पुस्तकाच्या माध्यमातून होतं .

विविध जमातींच्या वस्तीस्थान कोण कोणत्या जिल्ह्यात हे लोकजीवन बहरत आहे .फुलत आहे .याची सचित्र नोंद वाचकांना आदिवासी लोकजीवनाचा परिचय करुन देते .

आदिवासींचे अंतरंग मांडत असताना त्यांचा लोकजीवन त्यांची संस्कृती यांचा परिचय समाजाला देत असताना या आदिवासी समाजातून शिक्षण घेऊन उच्च पदावर गेलेल्या व्यक्तींची व साहित्य कला संस्कृती या क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या आदिवासी साहित्यिक कलावंतांची नोंद सुद्धा या पुस्तकात घेण्यात आली असती तर अधिक प्रेरणादायी कार्य झालं असतं .

तरीही महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने खूप सुंदर असं कार्य 'आदिवासींचे अंतरंग ' हे कॉफी टेबल बुक प्रकाशित करुन वाचकांना संशोधकांना अभ्यासकांना आदिवासी लोक जीवनाच्या जवळ पोहोचवलं .

बदलत्या काळानुसार धावपळीच्या युगात शहरी संस्कृती पासून दूर असलेला हा आदिवासी समाज काही प्रमाणात समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असला तरी आपली बोली भाषा ,आपली संस्कृती आणि आपले वेगळेपण टिकून या डोंगर कपाऱ्यांमध्ये निसर्गाच्या सानिध्यात निसर्गालाच सर्वस्व समजून जगतोय ही फार मोठी गोष्ट आहे .

शासनाच्या आदिवासी विकास विभागाने खूप सुंदर असं 'कॉफी टेबल बुक ' स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकाशित करून आदिवासींचा अंतरंग उलगडण्याचा , केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे शासनाच्या या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा .

----------------------

✍️ एकनाथ लक्ष्मण गोफणे .

चाळीसगाव

8275725423

60 दृश्य0 टिप्पणी

Comentários


bottom of page