पुस्तक परिचय :-
___________________
आश्रम शाळेचे शिक्षक सतीश सूर्यवंशी यांच्या माझी शाळा माझ्या उपक्रमाची फलनिष्पत्ती असलेलं पुस्तक 'सेल्फी विथ सक्सेस ' ...
____________________
चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड तांडा येथील माध्यमिक आश्रम शाळेत कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक सतीश सूर्यवंशी हे शाळेमध्ये आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी विविधांगी उपक्रम राबवित असतात .
त्यांनी माझी शाळा माझा उपक्रम अंतर्गत 'सेल्फी विथ सक्सेस ' याया कृतिशील उपक्रमाची सुरुवात केली आणि त्यांना मिळालेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
पुस्तक रुपात संग्रहित करून ठेवावा आणि इतरांसाठी तो प्रेरणा ठरावा या हेतूने एका पुस्तकाची निर्मिती केली .
आश्रम शाळेचे शिक्षक सतीश सूर्यवंशी यांच्या माझी शाळा माझ्या उपक्रमाची फलनिष्पत्ती असलेलं पुस्तक 'सेल्फी विथ सक्सेस ' होय .
नाशिक येथील ज्ञान सिंधू प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले हे पुस्तक श्री . सूर्यवंशी सरांनी सतत सामाजिक काम करण्याची प्रेरणा देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञातांना समर्पित केले आहे .
या आधी सुद्धा विज्ञान प्रदर्शनातून सामाजिक विषयावर जनजागृती ,प्रश्नमंजुषा उपक्रम , वर्तमानपत्रातील कात्रणांपासून सुबोधकथांचा संग्रह ,कोविड काळामध्ये व्हिडिओ आणि पोस्टर्स द्वारे जनजागृती , समाजसुधारकांच्या कार्यकर्तृत्वाची लेखमाला अशा विविध अंगी उपक्रमामुळे सूर्यवंशी सर शिक्षण विभागात परिचित आहे .
शिक्षक समृद्धी फाउंडेशन चे ते संस्थापक अध्यक्ष असून महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे जळगाव जिल्हा समन्वयक सुद्धा आहेत .
शैक्षणिक उपक्रमा संदर्भातील त्यांच्या कार्याचा विविध संस्थांतर्फे गौरव करण्यात आलेला आहे .राज्यभरातील अनेक विविध पुरस्काराचे ते मानकरी आहेत .
'सेल्फी विथ सक्सेस' वर्गात राबविलेल्या या उपक्रमाला एकत्रित करण्याची कल्पना सूर्यवंशी सरांच्या मनात आली आणि त्याला त्यांनी पुस्तक रुपात
विद्यार्थी व शिक्षकांसाठी प्रकाशित केले .
वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांनी त्यांच्या या उपक्रमात सहभाग नोंदविला पण काही निवडक आणि प्रतिनिधी स्वरूपाच्या उपक्रमालाच त्यांनी पुस्तक रूपात स्थान दिले .हे प्रेरणा घेऊन इतर विद्यार्थी सुद्धा स्वयं विकासाकडे वाटचाल करतील . आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढवतील हा मुख्य उद्देशया पुस्तक निर्मितीत दिसत आहे .
भविष्यवेधी शिक्षणाचा विचार करीत असताना जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होणं आवश्यक आहे त्यासाठी 'सहा - सी '( 6 -C )
विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणे आवश्यक आहे ज्यामध्ये सर्जनशील कौशल्य , चिकित्सक कौशल्य , सहकार्य कौशल्य ,संभाषण कौशल्य आत्मविश्वास , करुणा यांची रुजवणूक होणं गरजेचं आहे .
यासाठी विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे त्यांच्या शिकण्याला आव्हान देणे . सहकारी जिज्ञासू मित्रांच्या मदतीने स्वतः शिकण्याची गती वाढवणे तंत्रज्ञानाचा उपयोग करणे . या गोष्टी विद्यार्थी स्वयंप्रेरित होऊन करतात .
सूर्यवंशी सरांनी वर्गात राबविलेल्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढीस लागला त्याच सोबत पालकांमध्ये सुद्धा उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले . वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरणा देत असताना विविध गोष्टींचे आव्हान सरांनी दिले आणि विद्यार्थ्यांनी ते आव्हान दिलेल्या वेळेत पूर्ण केले आणि गुणवत्तेच्या दृष्टीने त्यांची गती वाढलेली दिसून आली .
अशा 20 विद्यार्थ्यांच्या या आव्हानात्मक उपक्रमाची नोंद 'सेल्फी विथ सक्सेस ' या पुस्तकामध्ये सतीश सूर्यवंशी यांनी घेतलेली आहे .
चैताली साळुंखे या विद्यार्थिनीला स्वामी विवेकानंद यांच्या विषयीची माहिती संकलित करायला लावली घनशाम मुलमुले या विद्यार्थ्याला भावे प्रयोगाच्या उदाहरणांचे संकलन करायला लावले प्राची भोसले चैताली साळुंखे तनुजा जगताप गायत्री सूर्यवंशी या विद्यार्थिनींच्या गटाला स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या विषयी त्यांनी प्रश्नांची निर्मिती करायला लावली श्रीनिवास चव्हाण या विद्यार्थ्याला 'संत सेवालाल महाराज ' यांच्या विषयीची माहिती संकलित करायला लावली तनुजा जगताप व प्राची भोसले या विद्यार्थ्यांच्या गटाला अण्णाभाऊंची भेट आणि प्रश्न निर्मिती यासोबतच ऋषिकेश भोसले याला कर्तरी प्रयोगाच्या उदाहरणाचा संकलन करायला लावला. सोबतच स्वरसंधीची उदाहरणं .कर्मणी प्रयोगाची उदाहरणे .पाड्यावरचा चहा या विषयाची प्रश्न निर्मिती . व्यंजन संधींची उदाहरणे . फुलपाखरे आणि त्याविषयी प्रश्न निर्मिती . जलप्रदूषणाची माहिती . मराठी भाषा गौरव दिनाविषयी माहिती . यंत्रांनी बंड केलं या विषयावरची प्रश्न निर्मिती अशा अनेक विविध विषयावर वर्गातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या कल्पकतेला त्यांच्या शोधक वृत्तीला आणि त्यांच्या चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी सूर्यवंशी सरांनी वर्गात कार्य केले .
या वीस विद्यार्थ्यांच्या अध्ययन कृतीच सचित्र लेखन या सर्वांचा संग्रह या पुस्तकामध्ये दिलेला आहे .
पुस्तकात असलेले विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लेखी अभिप्राय हे सूर्यवंशी सरांनी केलेल्या कार्याचा गौरवच म्हणावा लागेल .
आश्रम शाळेमध्ये कार्यरत असलेले श्री . सतीश सूर्यवंशी सर यांच्या उपक्रमाचे हे पुस्तक शिक्षण क्षेत्रातील सर्वांनाच प्रेरणादायी आहे . आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी धडपडणाऱ्या सतीश सूर्यवंशी सर यांच्या लेखन प्रवासाला हार्दिक शुभेच्छा .
____________________
✍️ एकनाथ लक्ष्मण गोफणे
8275725423
चाळीसगाव
Commentaires