top of page
खोज करे
लेखक की तस्वीरEKNATH GOFANE

इतिहासाचे वस्तुनिष्ठ वर्णन करणारे पुस्तक हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम

पुस्तक परिचय -


इतिहासाचे वस्तुनिष्ठ वर्णन करणारे पुस्तक हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम

. . . .______________

दमाळ प्रकाशन चंद्रपूर यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात आलेले 'हैदराबाद स्वातंत्र्यसंग्राम (पळापळीचा काळ ) हे पुस्तक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले व सामाजिक कार्यकर्ता म्हणून भूमिका बजावणारे बी . सुग्रीव यांनी लिहिलेले आहे .

हे पुस्तक 2023 मध्ये मार्च महिन्यात प्रकाशित करण्यात आले . कॉम्रेड ठाणू नायक स्मारक समितीला या पुस्तकाचे सर्व हक्क प्रदान करण्यात आलेले असून हे पुस्तक , लेखकाने निजाम राजवटीत लोकांवर होत

असलेला अत्याचार व अन्याय सहन न झाल्याने ज्यांनी न्यायासाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही अशा लढवय्या क्रांतिवीरांना हे पुस्तक अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली आहे .

सदर पुस्तक हे भावी पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे .

पुस्तकात निजाम राजवट ,

रझाकार , मुस्लिम नरसंहार , हैदराबाद स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्मारक , जमीनदारी पद्धत , हैदराबाद लढ्यात स्त्रियांचा सहभाग , धर्मपुर तांडा एक प्रेरणार्थक . . ! आणि तेलंगणा मुव्हमेंट या प्रकरणावर सखोल चिंतनातून वस्तू वस्तुनिष्ठपणे विविध संदर्भ यांचा आधार घेऊन लेखन केले आहे . निजाम राजवट या प्रकरणात निजाम घराण्याची माहिती व निजाम म्हणजे काय हे सांगितले . या राजवटीमध्ये लोक जागृती साठी बंजारा बोलीतील लोकगीतांचा प्रभाव दिसत होता . हे स्पष्ट होते . बदलातून मुक्त होण्याचा सल्ला व एकतेची आरोळी देणारी रचना त्या काळात मना मनामनाला जागृत करत होती .हे वर्णन करताना लेखक मांडतो ,


' आवो रे भडा ,

केयेर कुचू रे थोडा ,

पगेती पग पाडा

पगेरी बेडी तोडा

निजामेती लडा . . . '


शेतकरी व विमुक्त जातीवरील अन्याय निजामाने कसा केला याचे वर्णन या पुस्तकात लेखकांनी लिहिलेले आहे .

गोविंद भाई श्रॉफ स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासोबत भारतीया , भूपतीया या मूड यासोबत नुरिया पिरिया झरपला बंधू यांच्याही कार्याचा उल्लेख यामध्ये मांडलेला आहे .निजाम राजवटी विरोधातील भिल्ल , हटकर यांचा निकराचा लढा . या संग्रामातील स्त्रीयांच्या लढयाची प्रेरणादायी कहाणी , शेतकरी महिलांच्या चळवळीला वाचकांसमोर आणते . इतिहासाने ज्यांच्या कार्याची नोंद घेतली नाही त्यांचे अतुलनीय कार्य हे पुस्तक वाचकांना सांगते . लेखक प्रत्यक्ष भेटीतून चर्चेतून माहिती नोंदवितो . व पुस्तकात मांडतो यामुळे वस्तुनिष्ठ माहितीत भर पडते . चंदुनायकाच्या जीवनकार्याचा पोवाडा या संदर्भात उल्लेख आलेला आहे . ती प्रेरणा अनेक पिढयांना बळ देईल . पळापळीच्या काळातील विविध आठवणी या पुस्तकात प्रकर्षाने मांडल्या आहेत .

लेखक शिक्षक असून चळवळीत काम करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे . अनेक जेष्ठ स्वातंत्र्य सैनिकांशी केलेल्या चर्चेवरुन वस्तुनिष्ठ प्रेरणादायी इतिहास मांडण्यात आला आहे .

हे सांगत असतांना लेखक ठामपणे सांगतो की , हैद्राबाद मुक्ती संग्रामाचा लढा हा हिंदू विरुद्ध मुस्लीम नव्हता तर सरंजामशाही राजवटीच्या विरुद्ध जनसामान्यांनी एकत्र येत पुकारलेला लढा होता . विविध संदर्भ व कल्हाळी येथील ३५ व जनगाव जिल्ह्यातील ११ हुतात्मे , पांगरा शिंदे येथील हुतात्मा स्मारक , तसेच नांदेड जिल्ह्यातील टेळकी सह २५ ठिकाणी झालेल्या सत्याग्रहाची नोंद व तेथील हुतात्मा स्मारक यांचे सचित्र पुरावे व लेखकाने दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या भेटी व चर्चेचा सचित्र वृतांत पुस्तकाचा वस्तुनिष्ठ इतिहास सांगतो .

मलपृष्ठावर प्रा . डॉ . पंडीत चव्हाण यांनी लेखनासाठी नवचेतना देणारी शुभेच्छा . व मुखपृष्ठावरील निजाम राजवटीचा भाग दर्शविणारा महाराष्ट्राचा नकाशा व स्मृती स्मारक पुस्तकाचे अंतरंग उलगडते .

लेखक बी .सुग्रीव यांनी इतिहासाचे वस्तुनिष्ठ वर्णन करणारे पुस्तक 'हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम ' हे पुस्तक लिहून एकजुटीने झुंज देणाऱ्या लढवय्या विर व विरांगनांचे प्रेरणादायी कार्य वाचकांसमोर ठेवलंय . त्यांच्या मेहनतीला हार्दिक शुभेच्छा .🌹🌹

____________________


✍️एकनाथ लक्ष्मण गोफणे

📲८२७५७२५४२३

92 दृश्य0 टिप्पणी

Comments


bottom of page