उज्वल भविष्याचा आशावाद निर्माण करणारा काव्यसंग्रह-व्यथा.
खळखळणा-या पाण्यासारखं हास्य तुझं प्रसन्न ठेव. श्रावणाच्या पावसासारखं प्रेम तुझं बरसत ठेव प्रकाशणा-या सूर्यासारखा भविष्य तुझं उज्वल ठेव. जीवनातल्या सुखदुःखांना
एका तागडीत तोलून ठेव' उज्वल भविष्याचा आशावाद निर्माण करणा-या या ओळी आहेत 'व्यथा' या काव्यसंग्रहातील. 'व्यथा' मीनाक्षी निकम यांचा 106 कविताचा हा पहिला काव्यसंग्रह आहे. काव्यसंग्रहाचं मुखपृष्ठ चित्रकार एस.के.मोरे यांनी रेखाटलं असून मुखपृष्ठ बघितल्यावरच वाचकांना ही ही व्यथा, गोठलेल्या आसवांची,उध्वस्त जीवनाची उध्वस्त जीवनाची, कोंबलेल्या भावनांची ,विखुरलेल्या स्वप्नांची आसुसलेल्या प्रेमाची, अमावस्येच्या काळोखाची ,भारावलेल्या मनाची आणि छाटलेल्या पंखांची असल्याची जाणीव होते. मानवी मनावर आपल्याच माणसाकडून होणारे वार, रक्ताळलेलं, भळभळणारं कपाळ, शांत संयमपणे सोसणारं जीवन अनेक व्यथा, हाल सोसून स्वयंदिप होत जाणारं कवयित्रीचं जीवन या विविध विषयांवरील कवितेतून प्रतिबिंबित होतं. ही व्यथा फक्त शाब्दिक कल्पना नाही तर अनुभवलेले दुःख, जखमा, टोचणारी काटे यांचे वास्तव चित्रण मांडलेली आहे. 'व्यथा' या कवितासंग्रहाध्ये व्यथा, राख ,जीवन ,प्रतीबिंब, विनंती ,आशा वेडी ,व्यर्थ, त्याग , वाट, घाव ,निरस माझी कविता बहरते तेव्हा नशीब, का? संघर्ष, शाप ,त्याग, दिशा ,जखम क्षणभर ,अपराध, अपंगत्व,कावळे खेळ ,उज्वल भविष्य.आणि काळोख अशा शीर्षकांच्या विविध कविता आहेत. मुखपृष्ठासह आतील प्रत्येक कविता वाळलेल्या वृक्षाच्या वेदनेच्या शाखा दर्शविणा-या चित्रावर शब्दबद्ध झालेली असल्याने मनाच्या प्रवाहाच्या चिखलात कितपत पडलेले हे कमळा भवराच्या प्रतीक्षेत तू जीवन जगणार आहेस का एक संपूर्ण मानवी जीवनाची व्यथा आणि त्या व्यथेतून त्यांनी केलेलं कार्य हे कल्पना नसून वास्तव जीवनाचा आधार या शब्दांना आहे .वास्तवतेची धार आहे आणि म्हणून व्यथा हा काव्यसंग्रह मीनाक्षी निकम यांच्या वेदनेला मांडतो. स्वतःच्या अपंगत्वावर मात करत. इतर दुःखी कष्टी भगीनींना सोबत घेऊन 'ऊंच माझा झोका गं' म्हणणारी कवयित्री प्रयत्न करायला कवितेच्या माध्यमातून शिकवितांना म्हणते.
'डोकावून पाहिले, अंतर्मनात प्रतिध्वनी आला, वेडे फूल कोमजतात म्हणून
कळ्या उमलायचं थांबवत नाहीत.
आकांक्षांना वास्तव्याचे कोंदण मिळत नसलं
तरी कुणी स्वप्न बघायचं थांबवत नाही'. स्वप्न बघून स्वयंदिप होण्याचा मोलाचा सल्ला देणारी ही कविता या संग्रहात वाचतांना वाचकाला नवी दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही. खोट्याच्या विरोधात ऊभं राहून प्रहार करणारी कविता सुद्धा याच संग्रहात वाचता येते.व सत्य पोहोचविण्याची जबाबदारी घेत खोट्या प्रशंसांचे सुंदर शब्दांचे भरजरी शेले, विणू शकत नाही हे ठामपणे सांगतांना.जे सत्य पोहचत नाही तर भरजरी शेल्यांचा उपयोग काय? असा सवाल करते.
दुःख वेदनांची आठवण ठेवत.जागृत राहून उद्याचा सूर्योदय मनात कायम ठेवून नवा विचार, नवा विश्वास देणारा हा काव्यसंग्रह आहे.मुखपृष्ठावरील महिलेचं चित्र हे बुद्धाच्या शांतता, आत्मत्याग, दया या धोरणाने जीवन दर्शन घडवले, दुःखाच्या मधून जीवन व्यतीत केलेल्या कवयित्रीने आपल्या 106 कवितांच्या माध्यमातून विविध गोष्टींचा उलगडा हा काव्यरुपी शब्दाने केलेला आहे. दुःख भोगत दुःख भोगत हालअपेष्टा सहन करत स्वयंदीपपणे जगणाऱ्या कवयित्रीला साहित्य निर्मितीसाठी हार्दिक शुभेच्छा.......
-----------------------------------=============
पुस्तक परिचय लेखन -एकनाथ ल ,गोफणे.8275725423
Comments