पुस्तक परिचय-
परिवर्तनाची हाक देत आठवणी जागृत करणारा श्रीकांत पवार यांचा काव्यसंग्रह
'कांयी कू गोरुर साकी '
डोंबिवली येथे मार्च 2018 मध्ये संपन्न झालेल्या पाचव्या अखिल भारतीय बंजारा संमेलनात कवी श्रीकांत पवार यांच्या
कांयी कू गोरुर साकी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले.परिवर्तनाची हाक देत आठवणी जागृत करणारा हा काव्यसंग्रह आहे.
कवी श्रीकांत पवार हे यवतमाळ जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सामान्य प्रशासन विभागात त्यांनी सेवा केली आणि 2009 मध्ये ते सेवानिवृत्त झाले आहेत. ध्यास कवितेचा मंच बोरिवली याचे ते सदस्य आहेत.
त्यांचे अनेक लेख कविता गझल हे प्रकाशित झालेले आहेत. 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तसेच 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना सह 15 वे आगरी सांस्कृतिक साहित्य संमेलन डोंबिवली येथे सुद्धा त्यांनी
त्यांनी आपल्या कवितांचं सादरीकरण केलं आहे .
कवी श्रीकांत पवार यांच्या कवितेचा काळ हा 60 च्या दशकातला . त्या काळातला बंजारा समाज त्यांची बोली भाषा संस्कृती चालीरीती आणि आजचं वास्तव जीवन , तांड्याचं दुःख त्यांनी या काव्यसंग्रहात मांडलेलं आहे .
एकूण ५३ वेगळ्या प्रकारातील गोरबोलीभाषेतील कवितांचा हा काव्यसंग्रह आहे.
यामध्ये निसर्ग व माणुसकी आहे .संस्कृती व परिवर्तन आहे.आठवण आहे बंजारा गोर बोलीभाषेत हायकू या प्रकारात सुद्धा श्रीकांत पवार यांनी लेखन केलेलं आहे. गोरबोली भाषेतील विविध शब्दांचे ज्ञान करुन देत, मानवी जीवन परिवर्तन कवितेतून मांडण्याचा प्रयत्न काव्यसंग्रहात केलेला आहे.
आधुनिक काळात वेगवेगळ्या भूलथापांमध्ये आम्ही जीवनाचा आनंद कसा विसरलोय, माणसाची एवढी गर्दी आहे तरीसुद्धा माणूस एकटाच आहे हे सांगणारी त्यांची 'जगेर हवा ' ही रचना खूप काही सांगून जाते.
गोरबोलीभाषेत दुःख सांगणारी 'काल म देको' ही रचना आहे.
आशावाद जागृत करणारी उंच भरारी घ्यायला लावणारी 'मनक्या' ही कविता निसर्ग प्राणिमात्रांची उदाहरण देत स्वतःला सुद्धा समृद्ध करण्याचा ध्यास प्रत्येकाने घ्यावा असं सांगते.
'मार लिदे भरारी
भरोसो पकोडाप
लिदे जिम्मेदारी तो
वाट मळ आपोआप '
या शब्दातून उंच भरारीचा आशावाद त्यांनी मांडलेला आहे .
'वो दन' या कवितेतून साठच्या दशकातली त्यांचं जीवन , तांड्याची स्थिती आणि वृक्षाची आठवण देखील मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तर सोबतच वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला अधोरेखित करणारी रचना सुद्धा ह्या काव्यसंग्रह मध्ये आहे
परिवर्तनाची हाक देणारी आणि अनेकांच्या मनामध्ये घर करून राहिलेली त्यांची 'दुनिया बदलगी' ही कविता आज परिवर्तनाचं गाणं म्हणून बंजारा समाजात आनंदाने गायीली जाते व ऐकली जातेय.
शब्द सौंदर्याने सजलेली त्यांची आहे
परिवर्तनाची हाक देणार आहे एकत्र आणणारा जागृतीचा संदेश 'नंगारा' या कवितेतून दिसून येतो. शेतकऱ्यांचं दुःख मांडून त्यांना आधार देणारी 'मत व जीवेपं उदार' नावाची कविता शेतकऱ्यांना एक आधार देणारी आहे .
'कर्ज फिट जायेरे,
आज ना सवार '
असा आशावाद शेतकऱ्यांच्या मनात जागृत करणारी ही रचना आहे
त्यांनी 'हायकू' प्रकारात सुद्धा या काव्यसंग्रहात काव्यलेखन केलेलं आहे.त्यासोबत बंजारा लेंगी गीतातून केसुला चे उपयोग, आणि होळी लेंगी प्रेमगीत काव्यसंग्रहात आहे.
परिवर्तनाची हाक देणारा आणि आठवणी जागृत करणारा त्यासोबतच बंजारांच्या अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी गोरबोली भाषा समृद्ध करणारा 'कांयी कू गोरुर साकी' हा काव्यसंग्रहआहे. श्रीकांत पवार यांच्या लेखन कार्यास हार्दिक शुभेच्छा .
----------------------
एकनाथ लक्ष्मण गोफणे
8275725423
चाळीसगाव
Comments