पुस्तक परिचय :-
कृपेश महाजन यांच्या
अभिव्यक्तीचे दर्शन घडविणारी साहित्यकृती - ' दोन तारे शेजारी '
----------------------
प्रयोगशील साहित्यिक म्हणून कवि कृपेश महाजन यांचे नाव घेता येईल .
शिक्षकी पेशा सांभाळत लेकरांमध्ये बागडण्याचा नित्यनूतन आनंद आणि मिळणारं पराकोटीचं समाधान हीच मोठी दौलत मानत बालकांच्या भाव विश्वाशी जवळीक साधणारा हा कवी आपल्या स्वतंत्र व प्रयोगशिल अभिव्यक्तीने ओळखला जातो .
कवीने कल्पनेत वावरणाऱ्या सईच्या
एका कहाणीला ' दोन तारे शेजारी ' या काव्यसंग्रहाच्या रुपात प्रकाशित केले आहे .
कवी कृपेश महाजन यांनी लेखनाच्या आवडीमुळे पाचोरा येथील तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत बनकर यांच्या 'सदरक्षणाय ' आत्मचरित्राचे शब्दांकन केलं .
'माणसांच्या भूईतून ' व 'अनिमा अनिमस ' या साहित्यकृती कृपेश महाजन यांच्या अभिव्यक्तीची स्वतंत्र शैली दाखवितात .
"दोन तारे शेजारी शेजारी" चे पुनरावलोकन कवितेच्या अफाट विस्तारात, हा काव्यसंग्रह म्हणजे शब्द, भावना आणि अनुभवांची उत्कृष्ट विणकाम आहे जी सामान्यांच्या पलीकडे जाऊन असामान्यांच्या क्षेत्रात प्रवेश करते.
महाजन यांची कविता एका आकाशीय चित्रजवनिका सारखी आहे . यातील प्रत्येक भाग मानवी भाव स्थितीचे दर्शन घडवितो .
काव्यसंग्रहाचे
"दोन तारे शेजारी शेजारी" हे शीर्षकच एक सुसंवाद आणि समतोल सूचित करते जे संपूर्ण संग्रहाला व्यापत आहे .
भाषा साधी पण प्रगल्भ आहे .
कवी म्हणतो ,
' तू समोर असलीस की मग ,
आठवणी साठविण्याचा प्रयत्न होतो . . . .
आणि नकळत तुझ्या नजरेआड जाण्यानंतर
मी वेचलेल्या आठवणी उलगडत राहतो . . . . .
या संग्रहाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे आश्चर्य आणि विस्मय निर्माण करण्याची क्षमता. महाजन यांच्या कवितेमध्ये वाचकांना नवीन परिमाणांकडे नेण्याचा मार्ग आहे .
जिथे सांसारिक जादूई बनते आणि सामान्य, असाधारण. तुम्ही तुमच्या ह्रदयाला स्पर्श करण्याचा, तुमच्या मनाचा विस्तार करण्याचा आणि तुमच्या डोळ्यांना तारा देणारा कवितासंग्रह शोधत असल्यास 'दोन तारे शेजारी ' हा काव्यसंग्रह वाचायलाच हवा.
कल्पनेतल्या सईशी संवाद साधत साधत कवी शब्दांच्या पलीकडे जाऊन भावनांना वाट मोकळी करुन देतो .
हा काव्यसंग्रह वाचणाऱ्या प्रत्येकाला वर्तमानातून कवी भूत आणि भविष्यातही घेऊन जातो .
कवितासंग्रह वाचतांना वाचक मुक्तछंदातून ,खंडकाव्य ते वृत्तबद्ध रचनेत प्रवास करतो .
व वाचनानंद घेतो .
कवी म्हणतो ,आपण सारेच या पृथ्वीवर जन्मलोत आणि ही पृथ्वी गोल आहे त्यामुळेच कदाचित आपल्या आप्त शब्दांची पुन्हा पुन्हा भेट होणंही अटळ आहे .
'मी आज उभा आहे या मुख्या बहिऱ्यांच्या व्यासपीठावर येथे सारे थकलेले व्याकुळलेले जणू ऐकण्याची भिस्त डोळ्यांवर '
कवीला ऐन पावसाळ्यातही माणुसकीचा दुष्काळ पडल्यासारखा ग्रीष्म चहूकडे वाटतो .
अन कवी सईला म्हणतो
'स्वप्नभूमीवर पसरलीत बांडगूळं
जी स्वप्न शोधून शोषतात . . !
माझ्यासारखे निरक्षर नवखे सारेच
हातबल होऊन त्यांना पोसतात .
सईशी संवाद साधताना एकेक कवीच्या मनातील भाव ,कविता बनून शब्दरुपात कागदावर उतरतात.
कलानंद प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या दोन तारे शेजारी या संग्रहाचे मुखपृष्ठ पाचोरा येथील रंगश्री आर्ट चे सुबोध एम .कांतायन यांनी अप्रतिम रेखाटले आहे .हेमंत जाधव गजलकार यांची पाठराखण व लक्ष्मण महाडिक यांची प्रस्तावना काव्यसंग्रहाचे वेगळेपण सांगून जाते .
कवी कृपेश महाजन यांच्या साहित्य लेखन प्रवासाला
हार्दिक शुभेच्छा !🌹
----------------------
✍️पुस्तक परिचय :-
एकनाथ लक्ष्मण गोफणे
827525423
चाळीसगाव
Comentarios