पुस्तक परिचय
-------------
ग्रामीण जीवनाची कष्टमय स्थिती शब्दबद्ध करणारा कथासंग्रह - पोशिंदा .
----------------------
शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले आणि ग्रामीण जीवनाशी मातीशी नाळ जुळवून ठेवणारे शिक्षक कथालेखक राजेंद्र गहाळ सरांचा एकूण बारा कथांचा 'पोशिंदा ' कथासंग्रह ग्रामीण जीवनाची कष्टमय स्थिती शब्दबद्ध करतो लेखकांनी आधी 'कोंडी ' आणि 'दोन एकर ' या शीर्षकाचे दोन कथासंग्रह प्रकाशित केलेले आहेत .
'प्रतिभास प्रकाशन ' - परभणी यांनी प्रकाशित केलेल्या या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ संतुक गोलेगावकर यांनी छान रेखाटलेले आहे .
या कथासंग्रह मध्ये मळ्याची वाट , सांजवेळ , जिव्हाळा , सोनामाय , परिवर्तन , पोशिंदा , उगवतं मावळतं ,आधार , वाट, नियती , हिस्सा आणि परतफेड या शीर्षकाच्या कथा आहेत .
कथा लेखकाने ग्रामीण जीवनातील जगणं त्यांच्या कथेतून मांडलेलं आहे .
कथेतील पात्रांची नावे ही ग्रामीण भागाकडे घेऊन जातात . कथेतील संवाद लेखनाच्या वैशिष्टयपूर्ण शैलीने वाचकांना गुंतवून ठेवण्यात लेखक यशस्वी झाले आहेत .
मळ्याची वाट या कथेतील सीताबाई , बाबूकाका , पद्मा , आसराबाई यांच्यातील संवाद आणि सीताबाई ची कौटुंबिक परिस्थिती आणि बाबू काकाच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो .
कांता आणि परसूच्या संसाराची कहाणी आणि दारुचं व्यसन सोडण्याची शपथ घेणारा परसू . सांजवेळी संसार सुखाचा करण्यासाठीचा कांताचा प्रयत्न
सांजवेळ या कथेतून दिसून येतो .
लेखकाचं ग्रामीण भागातील निरीक्षण लेखनातील कौशल्य , बोलीभाषेचा संवादामध्ये केलेला चपलखपणे वापर या गोष्टी कथेला बहुआयामिपणा देतात .
जिव्हाळा कथेतून आनंदा सालदार व सावकाराच्या बैलजोडीचा जिव्हाळा माणूस व प्राणी यातील आत्मीयतेचे दर्शन घडते .
नर्मदा व सोनामाईच्या संवादाने सुरू होणारी सोनाबाई ही कथा , शेताला पंढरी मानणाऱ्या व इतरांना मायेची ऊब देणाऱ्या ' सोनामाय ' या व्यक्तीरेखेची गृणवैशिष्टे सांगते .
शेतकऱ्याचा मुलगा सुरेश बाजारात जातो आणि बाजारातल्या प्रसंगातून 'पोशिंदा ' या कथेच्या माध्यमातून लेखक शेतकऱ्याचं दुःख शेतीची स्थिती मराठवाड्यातील दुष्काळी स्थिती
शेतकऱ्याची कौटुंबिक स्थिती आणि शेतकऱ्याचा माल विकत घेऊन 'जगाचा पोशिंदा कंगाल अन त्याच्या मालावर बाकीचे मालामाल ' हे सांगण्याचं धाडस लेखक पोशिंदा या कथेतून करतो आणि शेतकऱ्याची विदारक स्थिती सांगतो .
'उगवतं मावळतं 'या कथेतून काशिनाथच्या कमला नावाच्या मुलीवर ढोंगी साधू कसे अत्याचार करतो आणि केरबा आणि परसू तिच्या रक्षणार्थ काय पावलं उचलतात याचं वर्णन केलेलं आहे .
पोशिंदा या कथासंग्रहातील सर्व कथा विविध वांग्मय नियतकालिका आणि दिवाळी अंकांमधून प्रकाशित झालेल्या आहेत .
पोशिंदा या कथासंग्रहातून माणुसकी , जिव्हाळा , मैत्री आत्मीयता , परस्परांना केला जाणारा सहकार्य , संविधानिक मूल्य , जगण्याची धडपड मांडून
ग्रामीण जीवनाची स्थिती तेथील वस्तुनिष्ठ असच चित्रण प्रसंग लेखकाने आपल्या कौशल्याने उभे केलेले आहेत . हा कथासंग्रह वाचताना माणुसकी हा जगण्याचा केंद्रबिंदू आहे हा अनुभव वाचकांना येतो .
राजेंद्र गहाळ सर हे ग्रामीण कथा लेखनात उत्कृष्ट कार्य करुन मराठी साहित्यात बहुमोल असं योगदान देत आहेत .त्यांच्या साहित्य लेखन प्रवासाला हार्दिक शुभेच्छा .
✍️ एकनाथ लक्ष्मण गोफणे
📲8275725423
Comments