पुस्तक परिचय-
जगण्याची धडपड मांडणारा
कथासंग्रह 'शिकार'
_____________________________
संघर्ष, वास्तव चित्रण व सूक्ष्म निरीक्षणातून जगण्याची धडपड मांडणारा प्रा.डॉ.युवराज पवार यांचा
कथासंग्रह 'शिकार'
शिरपूर जि.धुळे येथील महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक डॉक्टर युवराज पवार यांच्या आठ कथांचा समावेश असलेला 'शिकार' हा कथासंग्रह .
चेतक बुक्स (पुणे) यांनी प्रकाशित केलेला आहे.
यामध्ये
जुळी,पाल, रासुंडा, अंगठा ,शिकार ,परीक्षा, शाळा,
तांड्याची बाई
आठ कथांचा समावेश केला आहे.या कथा 2007 ते 2013 या कालावधीमध्ये मिळून साऱ्याजणी अक्षर वैदर्भी परिवर्तनाचा वाटसरू अस्मितादर्श,अक्षरगाथा आदी साहित्यिक प्रकाशनांमध्ये पूर्व प्रसिद्ध
झालेल्या आहेत .
वास्तव चित्रण शब्दात मांडतांना लेखकाने केलेले सूक्ष्म चित्रण या कथासंग्रहात वैशिष्ट्य म्हणावे लागेल या कथासंग्रह मध्ये ज्या कथा आहेत त्या भटक्या विमुक्त बंजारा समाजाच्या भटके-विमुक्त समाजाच्या व्यथा मांडत खूप सुंदर पद्धतीने त्यांच्या जगण्याला वास्तव शब्दांकन,सांस्कृतिक परिवेश देण्याचं कार्य लेखकाने या ठिकाणी केलेलं आहे .
बंजारा लोक जीवनातील हा एक सुंदर असा सांस्कृतिक खजिना या कथासंग्रहाचे निमित्ताने मराठी साहित्यात आलेला आहे. यामध्ये स्वतःची गोरबोलीली भाषा,
बंजारा लोकजीवनातील ,बोलीभाषेतील शब्द आहेत.
यामध्ये विद्रोह आहे. यामध्ये नायकचं ऐकून ,जी एकजूट लोक दाखवतात आणि एका प्रस्थापित पुढाऱ्याला तांडा कसा हरवतो हेही याच्यामध्ये दिसून येतं.
या विविध कथासंग्रह मधून कथांमधून प्रगतीची वाट पुरोगामित्वाकडे वाटचाल ही दिसून येते.
या कथा वाचत असताना एक चित्र डोळ्यासमोर येतं.
लेखकाच्या लेखन कौशल्याचा अनुभव वाचकांना येतो.
प्राध्यापक डॉक्टर युवराज पवार यांनी कथासंग्रहात वेगवेगळ्या कथा लिहिलेल्या आहेत.
हे अनुभवसिद्ध आहे आणि यामध्ये त्यांनी बंजारा लोकजीवन त्या बंजारा लोक जीवनाच्या जगण्याचं अतिशय वास्तववादी सूक्ष्म चित्रण त्यांनी या कथासंग्रह मध्ये केलेला आहे .
तांडा व तेथील लोकजीवन कशा पद्धतीने वाटचाल करत असतात हे सगळं मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
जुळी कथेतील वास्तव चित्रण त्यासोबत घरातील कर्त्या पुरुषाला कामानिमित्त बाहेर जावं लागतं. स्त्रीला सुद्धा उदरनिर्वाहासाठी , एवढ्या उन्हात फिरावे लागते
बंजारा कुटुंबातील गरीबी, त्यातून होणारा संघर्ष, सिंधू, सुदाम, गीता, यांच्यातील चर्चा, मध्येच येणारी गोरबोलीतील संवादमाला, त्यांच्या मुलींचं जीवन तसेच तांड्याची आरोग्य सुविधेची परवड व त्यातही
नंतर जुळ्या मुली होतात.व बाप त्यांचा स्विकार करुन तांड्यातल्या व्यक्तीची सकारात्मक प्रतिसादाची कृती 'सुदाम' ही व्यक्तीरेखा यातून दिसते .
'पाल' या कथेतून भटक्या जमाती पैकी असलेल्या एक फासेपारधी समाज ,स्त्रीयांच्या ,हालाखीच्या जीवनाचे चित्रण या कथेत केलेला आहे.
तिथुर, लाव्हऱ्या विकणाऱ्या बाईची कथा आहे.
'रासुंडा' या कथेत तांड्यातला रामा नाईक हा शेतकरी,त्यांची शेती व नवस यात अडकलेली स्थिती, मनाची तगमग,पत्नी शांता च्या मनाची, घालमेल.गजू व दिलू या दोन्ही मुलांची स्वभाववैशिष्टे असलेली कथा.
रासुंडा म्हणजे नवस .व त्याला पूर्ण करण्यासाठीची धडपड व शेतीची चिंता .बापाची तगमग ओळखून परिवर्तनाकडे जाणारा दिलू हा मुलगा. या कथेतून दिसतो.
'अंगठा' याकथेतुन शिवा नाईकच्या सुनबाई सुलीला सर्पदंशाने होणारा त्रास व सरपंच, आमदार यांच्या राजकिय दंशाची व्यथा याच चित्रण केले आहे.
'शिकार' कथा खूपच सुंदर पद्धतीने घेण्यात आली आणि त्यावरूनच या कथासंग्रहाचे नाव 'शिकार' हे देण्यात आलेलं आहे .
तुकाराम सह सुरेश, व रानडुक्करच्या शिकारीची कथा.सुंदर गुंफण केली आहे.
प्रा.डॉ.युवराज पवार यांच्या कथेत गोरबोली व तावडी बोली एकत्रित आल्याने वाचतांना वेगळाच आनंद होतो.बंजारा गोरबोलीतील अनेक शब्द व म्हणी या कथासंग्रहामुळे मराठी साहित्यात आल्या आहेत.
'परीक्षा' कथेतील हरी या बापाचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी संघर्ष करणारी, 'बा' चं प्रेत घरात असुनही
डोळ्यात आसवं आणि हातात रिसीट, पेन, कंपास पेटी, फुल पट्टी अन् पॅड घेऊन परीक्षेला जाणारी 'बा' चं स्वप्न पूर्ण करायचं ,प्रत्येक कसोटीला खरं उतरायचं असं ठरवत आयुष्याची परीक्षा द्यायला निघालेले दिपाली मुलगी दिसते.
'तांड्याची बाई' या कथेमध्ये अनेक गोष्टींचा संघर्ष करत नायक सगळ्या गावाची वैचारिक बैठक घेतो .विचार करायला लावतो आणि कशा पद्धतीने ती तांड्याची बाई सरपंच होते . त्यांच्यावर होणारे अत्याचार अन्याय याच्या विरोधात सरपंच म्हणून जमिनीतून वनिता नावाची एक वेल अंकुरते हे कथा वाचतांना दिसून येते.
खूपच सुंदर असा हा कथासंग्रह.
प्राध्यापक डॉक्टर युवराज पवार यांनी लिहिलेल्या कथांचा आहे. भविष्यात विविधांगी विषय घेऊन असंच आगळंवेगळं लेखन मराठी साहित्यात त्यांनी लेखन करावं.सोबतच गोरबोलीत व तावडी भाषेतही स्वतंत्र कथासंग्रह प्रकाशित करावा.
कुंडल कृष्णाई प्रतिष्ठान 🌼 तर्फे 🏆शिकार कथासंग्रहास -राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रा. डॉ.युवराज पवार सरांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🌹🌹🌹💐💐💐
✍ एकनाथ गोफणे
Comments