पुस्तक परिचय :-
तांड्याच्या माळरानात ,बकऱ्या चारणाऱ्या 'सामऱ्याचा श्यामशेठ ' होईपर्यंतचा 'आक्रोशमय ' जीवन प्रवास असलेली साहित्यकृती - आक्रोश..........
तांड्याच्या माळरानात ,बकऱ्या चारणाऱ्या 'सामऱ्याचा श्यामशेठ ' होईपर्यंतचा 'आक्रोशमय ' जीवन प्रवास असलेली - आक्रोश .ही साहित्यकृती म्हणजे .मोठा भाऊ वसंतरावाने लिहिलेली लहान भावाच्या संघर्षमय , जीवन प्रवासाची कहाणी होय.लहान भावाच्या संघर्षमय जीवनात मोठा भाऊ वसंत एक आधार होतो.व श्यामच्या जीवनाचा वसंत ऋतू चैतन्याची नवी पालवी घेवून बहरतो.
आक्रोश वाचतांना ,कवी,इंद्रजीत भालेराव यांच्या दोस्त कवितेतील
‘आज जेव्हा पाहतो मी
भाव-भावांचं फाटताना,
आठवत राहतो दोस्त माझा
अंग माझं चाटताना .’
या ओळी आठवतात .कारण छोट्या गोष्टींसाठी आज बरीच भावंडे भांडतात .अशा या काळात मोठा भाऊ वसंतराव लहान भावाच्या संघर्षमय दिवसात त्याला साथ देतो .
लेखक डॉ. वसंत राठोड यांचं अक्रोश या साहित्यकृतीची 5 मार्च 2023 रोजी प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली . कैलास पब्लिकेशन, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रकाशित केलेल्या . अक्रोशचे सरदार जाधव आशयसंपन्न मुखपृष्ठ तयार केलं आहे.
मराठी भाषेसह बंजारा बोली भाषेतील संवादाने वाचकांना लेखकाचे लेखन कौशल्य दिसून येत
''याडी आपणो प्रकरण मिटगो, गंगाम हांगोळी वेगी.
ठिक वेगे बेटा, खूप आचो वेगो,
भगवानेर नंजरेम देर र आंधारो रेयेनी. "
हा संवाद आईच्या मुलावरील आत्मविश्वाला वाचकांसमोर ठेवतो.
लेखकाने आपली ही साहित्यकृती सत्याच्या मार्गाने चालण्याचा संदेश देणाऱ्या,आपले आजोबा स्व. रतनसिंग बद्दुसिंग राठोड, व आजी स्व. सामकीबाई रतनसिंग राठोड यांच्या चिरंतन आठवणीस अर्पण केली आहे.
बंधू प्रेमाचा भाव, प्रयत्न, अपार कष्ट ,संघर्ष ,परिवारातील सदस्यांसह मित्रांचे सहकार्य या जमेच्या बाजूवर हे वास्तववादी कथानक साहित्यमूल्य जपत वाचकांना विविध प्रसंगातून फिरवून वाचन आनंद मिळवून देत.वास्तवात दडलेलं लेखकाच्या मनातलं' कुठतरी मांडावं किंबहुना त्याला लिपिबध्द तरी करावं असं सारखं लेखकाला वाटू लागलं होतं. त्यातूनच आक्रोश लेखनाचाचा प्रारंभ झाला.
बंजारा समाजाच्या एका तांड्यातला अक्षरांची ओळख नसलेला, तांड्याच्याच्या माळरानात माळा रानात शेळ्या चालणारा मुलगा.भावाच्या प्रेरणेने बहिस्थ म्हणून सातवीच्या परीक्षेत बसतो .आपल्या जीवनात आलेल्या प्रसंगांवर वाईट प्रसंगावर कसा मात करतो. हे या कथानकात वाचायला मिळतं
परमानंद महाराज्यांच्या शंकर हॉटेमध्ये काही दिवस काम करतो.
पुढे चार चाकी वाहन घेऊन आपला उदरनिर्वाह करून जीवन जगण्याचा विचार करत असताना अचानक ड्रायव्हरने केलेली आत्महत्या आणि त्यामुळेआलेला पोलीस ठाण्यात जाण्याचा प्रसंग.
आणि त्यातून जीवन जगण्यासाठीसावरणा कुटुंबीयांची मदत.असे एकूण आज भावविश्व आणि जीवनातील हा सगळा आक्रोश वसंतराव राठोड यांनी आपल्या या साहित्यिक कृतीतून मांडलेला आहे.
वास्तववादी कथानकातील प्रत्येक प्रसंग संवाद वाचकांना भावविश्वाशी जोडतात.
कल्लोळ आणि जगणं रानफुलांचं या पुस्तपुस्तकानंतर वसंत राठोड यांची आक्रोश ही साहित्यकृती मराठी साहित्यात मोलाची भूमिका बजावणारी आहे.
या साहित्यकृतीत वसंतराव यांनी मांडलेल्या सर्व घटना प्रसंग वाचकांसमोर उभे राहतात.
उत्कृष्ट मांडणी हा या साहित्याचा आत्मा आहे. बकऱ्या चारणाऱ्या 'सामऱ्याचा श्यामशेठ 'होईपर्यंतचा संपूर्ण प्रवास आणि त्या प्रवासातील साथीदार म्हणून वसंतराव आपल्या भावाच्या पाठीशी उभा राहतो आणि त्याला समर्थपणे जीवन जगण्याची प्रेरणा देऊन इतरांसाठी प्रेरणादायी कर्तृत्व उभं करतो.
डॉ. वसंत राठोड यांच्या साहित्य लेखन प्रवासाला हार्दिक शुभेच्छा.
--------------------------------------------------
पुस्तक परिचय :-
✍️एकनाथ लक्ष्मण गोफणे -
चाळीसगाव
8275725423
Comments