top of page
खोज करे
लेखक की तस्वीरEKNATH GOFANE

त्यांच्या आयचा नवरा -डॉ. संतोष राठोड यांच्या दमदार लेखनातील उत्कृष्ट कलाकृती  _ दीर्घांकी मराठी नाटक

अपडेट करने की तारीख: 10 अक्तू॰ 2023

पुस्तक परिचय.

.................


डॉ. संतोष राठोड यांच्या दमदार लेखनातील उत्कृष्ट कलाकृती 


 

दीर्घांकी मराठी नाटक ..


त्यांच्या आयचा नवरा.



......जनाई प्रकाशन मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या लेखक प्रा. डॉ. संतोष धर्म राठोड यांनी लिहिलेल्या 'त्यांच्या आयचा नवरा' या नाटकाची वाचक व रसिकांना भुरळ पडली आहे.

डॉ.संतोष राठोड हे मुंबई विद्यापीठात कार्यरत आहेत.  बंजारा गोरबोलीभाषेसह मराठी इंग्रजी भाषेतून ते लेखन करीत असतात.

काव्य लेखनाबद्दल त्यांना अनेकविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. अशा या दमदार लेखकाने समाजातील घटनेवर आधारित एक नाटक लिहिलेलं आहे.

हे नाटक रंगमंचावर सुद्धा सादर होत आहे.  पुस्तक रुपाने प्रकाशित झालेलं  'जनाई प्रकाशन' यांच्यामार्फत शंभर रुपये मूल्य असलेले हे पुस्तक , समस्त महिला वर्गाच्या वेदनेला वाचा फोडण्यासाठी ज्यांनी लेखकाच्या लेखणीच्या हत्यार आणि संवैधनिक  लढ्याचा मार्ग दिला. त्या  महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ही नाट्यकृती आदरपूर्वक  अर्पण केलेली आहे.

या नाटकाची प्रस्तावना  कबीर दास यांनी लिहिलेली आहे आणि पाठराखण  99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी  केलेली आहे.

या  नाटकामध्ये धोंडीबा, गोपी ज्योतिबा ,कल्पना, कावेरी, पवन मनोज ,वंदना आणि वसंत ही पात्र आहेत .

धोंडीबा हा चक्कीवाला कामातूर माणूस या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येतो.गोपी ही धोंडीबाची लग्नाची बायको. जोतिबा धोंडीबा चा धाकटा मुलगा. कल्पना ही जोतिबाची बायको .

कावेरी ही धोंडीबाची दुसरी बायको. पवन हा 38 वर्षांचा अविवाहित धोंडीबाचा प्रशंसक शिष्य .मनोज हा कावेरीचा जावई

वंदना ही कावेरीची मुलगी आणि वसंत हा कावेरी चा मुलगा

अशी व्यक्तिरेखा या नाटकाच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहे.


 संतोष राठोड यांनी या नाटकाच्या माध्यमातून व्यभिचार, कामातूरता यावर विषयावर आधारित नाटक. 

2007 मध्ये 'देअर मदर्स हजबंड' हे इंग्रजी नाटक त्यांनी लिहिलं आणि महाराष्ट्र राज्य नाट्य परीक्षण मंडळाने त्यासाठी योग्यता प्रमाणपत्र सुद्धा त्यांना दिलेलं आहे.

मराठीतील ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी या इंग्रजी नाटकाचे मराठीत रुपांतर करावं मराठीत आणावं अशी सूचना केली आणि त्यांच्या सूचनेनुसारच 'त्यांचा आयचा नवरा' या शिर्षकाखाली हे नाटक त्यांचे लिहून पूर्ण झालं.

नाटकाचा विषय फार गमतीदारपणे  या साहित्यकृतीतून लेखकाने मांडलेला आहे.

चक्की वाला कामातूर माणूस   'धोंडीबाची चक्की ,दुपारची वेळ तिथे दळण दळण्यासाठी येणाऱ्या आयाबाया आणि धोंडीबा आणि पवन याच्या संवादाने नाटकाचे सुरुवात होते.

 धोंडीबाची पत्नी गोपी या दोघांमधील संवाद गोपी ची पती परमेश्वर ही भूमिका वाचकांना आणि रंगमंचा वर दर्शकांना मोहित करुन जाते.

सतरा दृश्यांमधील हे विविध रंगी नाटक  धोंडीबा सारखी कामातूर वृत्ती कधीच मरणार नाही हे दाखवण्यासाठी,पात्र ,प्रसंग, घटनाक्रम आणि संवादाची अचूक मांडणी करत वाचकांना आणि रसिकांना गुंतवून ठेवण्याची क्षमता या लेखनाच्या माध्यमातून लेखकाने साधलेली  आहे.गुंतागुंत स्थिती आणि त्या स्थितीतून  यू टर्न करत प्रेक्षकांना मोहित करण्याची कला लेखकाने अवगत केलेले आहे. ते या नाटकाचे यश आहे.

नाट्य लेखनातील संवादाची भाषा वाचकांना गुंतवून ठेवते.जसे की धोंडीबा व पवन चा संवाद येथे दिला आहे.

धोंडीबा:- दिवाळी तरी पहिलीस की नाही ? फटाक्यांचे आवाज तर ऐकले असतील न? मला असे प्रश्न इचारु नको. तुला तोंडीच सगळं इचारायचा आसल अन येळ घालवायचा आसल,तर हेपा, मी परत निगालो.

पवन:' नाई, तसं करु नका. तुझी मव  पण नाव सांगितलं न? मी पण काडी पेटी घेऊन सुरसुरी फोडाय तयार हाय.


भाषेचा चपलखपणे उपयोग लेखकाने कौशल्यात्मक पद्धतीने केला आहे.

 समाजाच्या कानाकोपऱ्यात दडून बसलेला व्याभिचार.ही संकल्पना असलेल्या    नाटकाचा नायक कामातूर 'धोंडीबा' हा  आहे.

कामातूर व्यक्ती ,साधी भोळी पत्नी वासनेला बळी पडलेली सून अविवाहित असलेला तरुण.

ही या नाटकाची भक्कम बाजू. यामुळे नाट्यप्रसंग हळूहळू पुढे पुढे जातो आणि वाचक आणि रसिक त्यामध्ये गुंतत जातो. नाटकातील प्रत्येक प्रसंग त्यातील संवाद मानवी मन,भावभावना खेळ, गुंतागुंत सांगत पुढे जातो.

35 वर्षे वय उलटून गेल्यावर लग्न होत नाही .आपलाही कुठेतरी जुगाड होईल या हेतूने धोंडीबा ला गुरु मारणारा त्याचा शिष्य पवन. हा आशेवर जगणारी व्यक्तीरेखा. 

व्याभिचारावर प्रहार करत लेखक नाट्यविषय विविध प्रसंगातून पुढे नेतो.

समाजात आढळणा-या 'धोंडीबा' सारख्या वृत्तीला समोर आणून ऊभं करतो. धोंडीबाचा मुलगा सोनबाची आत्महत्या. वटपौर्णिमेचा प्रसंग. गोपी ची वचन मागणी. हा प्रसंग स्री वेदना दाखवितो.

नाटकातल्या सातव्या दृश्यातील कावेरी हे स्त्री पात्र आणि त्या बाईच्या पाठीमागे चिटकून बसलेली बकुळी कुत्री. हा प्रसंग किंवा इतर प्रसंग 

अचूक रेखाटले आहेत.

धोंडीबा च्या अंत्येष्टीनंतर गाव सोडून जाताना कावेरीला त्याच्यासोबत येण्यासाठी मुलं तयार करतात तो प्रसंग आणि नाटकाच्या शेवटचं.

धोंडीबाची जात बदलेल .

पण तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात वास करेल.

तो अस्वस्थाम्यासारखा अमर राहील कुणाच्या सुख तर कोणाचे दुःख वाहत राहील.

हे वाक्य बोलके ठरते.

इंग्रजी साहित्यातून आपला लेखन ठसा उमटवून वेगळंपण जपणारे लेखक डॉ.संतोष राठोड यांनी मराठी भाषेत दीर्घांकी मराठी नाटक ..'त्यांच्या आयचा नवरा'.

या नाट्यकृतीचं लेखन करुन 

मराठी साहित्यात  उत्कृष्ट योगदान दिले आहे.






..................................................................................

✍️

एकनाथ लक्ष्मण गोफणे.

8275725423

चाळीसगाव

208 दृश्य0 टिप्पणी

Comments


bottom of page