top of page
खोज करे
लेखक की तस्वीरEKNATH GOFANE

दखल एका दिवाळी विशेषांकाची.....! ✍️याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद- 94 21 77 43 72

दखल एका दिवाळी विशेषांकाची.....!


*सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तन चळवळीतील मैलाचा दगड* -स्वच्छंदी भरारी गोरबोली भजन विशेषांक- 2023


📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚


*संपादक-प्रसिद्ध साहित्यिक एकनाथ गोफणे* 8275725423


*विशेष सहकार्य- गणेश राठोड दमाळ प्रकाशन चंद्रपूर*



*✍️याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद- 94 21 77 43 72*


•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

नुकतीच दिवाळी झाली. आणि साहित्य क्षेत्रामध्ये वाचन प्रेमीला दिवाळी अंकाची भर पडलेली आहे. दरवर्षीप्रमाणे गेल्या 7 वर्षापासून दिवाळी अंक स्वच्छंदी भरारी गोरबोली भजन विशेषांक- 2023 चे संपादन प्रसिद्ध लेखक व प्रतिभावंत कवी मा. एकनाथजी गोफणे सरांनी संपादन केलेले गोरबोली भजन विशेषांक- आठवणीने मला पाठवले. सदर विशेषांकाची मी लगेच पीडीएफाची प्रिंट काढून वाचनासाठी हाती घेतले असता अत्यंत सुंदर आणि सुबक असा स्वच्छंद भरारी भजन विशेषांक आहे. या अंकाचे मानकरी आंतरराष्ट्रीय साहित्यिक तथा भाषातज्ञ भीमणीपुत्र मोहन गणूजी नाईकसाहेब, प्रसिद्ध कवी मांगीलाल राठोड, याडीकर पंजाब चव्हाण, प्रसिद्ध लेखक प्रा. एकनाथ राठोड, प्रसिद्ध कवी निरंजन मुडे, कवी सुरेश राठोड, प्रसिद्ध लेखक प्रा. डॉक्टर सुभाष राठोड, कवी पि.के. पवार, प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक मा.राजाराम जाधव सर, प्रसिद्ध लेखक तथा कवी ता.धों.चव्हाण, कवी सौ.निरंजना चव्हाण, कवी सौ. नंदा राठोड, कवी रमेश राठोड, कवी विनोद राठोड, कवी प्रभाकर पवार, कवी संतोष जाधव, कवी दिगंबर राठोड, कवी विनायक राठोड आणि प्रसिद्ध लेखक तथा प्रतिभावंत कवी एकनाथ गोफणे सरासह अनेक मान्यवर साहित्यिकांचे विविध विषयातील लेख, सामाजिक चिंतन, भजन, कविता, व्यक्तिविशेष, बंजारा चारोळी, बंजारा भजन बद्दल लेख अशा विविध विषयाचे अभ्यासपूर्ण लेखन आणि कवितासह या अंकाचे संपादन केलेले आहे. त्याबद्दल प्रसिद्ध लेखक तथा प्रतिभावान कवी एकनाथ गोफणे सरांना मी याडी परिवारातर्फे धन्यवाद देतो. त्यांचे अभिनंदन करतो!

स्वच्छंदी भरारी गोरबोली विशेषंकाची विशेषतः अशी आहे की, यावर्षी गोफणे सरांनी गोरबोली भजन विशेषांक काढलेला आहे. त्याचे नेमके कारण असे की भजन हे नाम कीर्तनाचे, लोककल्याणाचे उपयुक्त साधन आहे. पण त्याला सुद्धा काही लोकांनी गालबोट लावलेले दिसत आहे. आम्ही लहान असताना श्रद्धेय प्रेमदास महाराज वनोलीकर, देवानंद महाराज दापुरा ,तुकाराम महाराज मारवाडीकर, तुकाराम महाराज पांढुर्णा , दामु महाराज धुंदी,साहेबराव महाराज या व अशा समाजक्रांती घडवणाऱ्या महाराजांनी समाज जागृतीचे इमानीईतबारे काम केलेले आहे. आणि गोरबंजारा गौरवशाली परंपरा, संस्कृती भजनातून जतन ठेवली होती. त्यानंतर ज्योतिराम महाराज वनोलीकर, वसंत राठोड सर खेरडा, अनिल महाराज, राजू महाराज ,मदन महाराज, बाबुलाल महाराज खामलवाडी, सुखदेव महाराज, जगदीश महाराज, पंजाब महाराज या व अशा अनेक महाराज लोकांनी सेवालाल महाराज लडी आणि झमरका, महानायक वसंतराव नाईक साहेबांचे जीवन चरित्र, आला-उदलखंड ,गोपीचंद राजाची लडी, संत डॉक्टर रामरावबापू महाराज या व अशा अनेक सामाजिक समस्यावर भजनाद्धारे प्रकाश टाकुन तमाम गोरगणाचे मनोरंजनाच्या माध्यमातून परिवर्तन करण्याचा या महान भजनाकारांनी आजही विडा उचललेला आहे. त्यानंतर या लोकांनी शिक्षण ,आरोग्य भाऊबंदकी, सासूबोडीचे नाते, हुंडा आणि समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा वर सुद्धा प्रहार करून समाज जागृतीचे महान कार्य केले त्याबद्दल त्यांना मी नतमस्तक होतो. अशा विविध विषयावर या भजनी मंडळींनी अहोरात्र समाजाचे प्रबोधन करून समाजाला परिवर्तनाच्या दिशेने नेण्याचे फार मोठे महान कार्य केल्यामुळे स्वच्छंदी भरारी गोरबोली विशेषांक हा मैलाचा दगड ठरलेला आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.

प्रसिद्ध कवी सुरेश मंगू राठोड यांची जागृती, व्यसनमुक्ती, जीवन सार या कविता तर प्रा. एकनाथ राठोड यांचे बंजारा भजनाचे सामाजिक प्रबोधनातील योगदान, आंतरराष्ट्रीय साहित्यिक तथा भाषातज्ञ भिमनीपुत्र मोहन गणूजी नाईकसाहेब यांचे सिंधू नायक असुरराज बळी आणि गोरमाटी, कवी विनोद राठोडची कार्यकर्ता कविता, याडीकार पंजाब चव्हाण यांचे भजनातील मुकाबला प्रकार बंद व्हायला पाहिजे, प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक तथा प्रतिभावंत कवी राजाराम जाधव सरांचे समाज उद्धाराची पंचशील तत्वे, प्रसिद्ध कवी एकनाथ गोफणे सरांचे थाळी नंगारा भजनाच्या आवडीतून बंजारा संस्कृतीचे दर्शन घडवणारे-मोरसिंग राठोड, प्रसिद्ध कवी मुनादीकार मांगीलाल राठोड बुलढाणा यांचे बंजारा भजन लोकसंस्कार आणि परिवर्तन हे अत्यंत वाचनीय लेख असून कवी प्रभाकर पवार यांची पाणी, संतोष जाधव यांचे आपणेंच रच,कवी सौ.नंदा राठोडचे गोरबोली संस्कृती, रमेश राठोड यांचे वाजवा रे नंगारा ,कवी वाकडोत गोविंद पवार यांचे जायदं भडा येनुती कायीं व्हचं, कवी विनायक राठोड यांची वनवासी आणि प्रसिद्ध कवी निरंजन मुडे यांचे गोरबंजारा समाज प्रबोधनात शाहीर भजन्याचे योगदान आणि शेवटी प्रसिद्ध लेखक डॉ. सुभाष राठोड यांचे गोरबंजारा साहित्य चळवळीला बळ देण्यासाठी माझे योगदान हे लेख सुद्धा समाज परिवर्तनासाठी अभ्यासपूर्ण लिहिलेले आहे आणि वाचनीय तर आहेच पण ते संग्रही ठेवण्यासारखे आहे. हा गोरबोली भजन विशेषांक निश्चितच गोर बंजारा समाजातील भजनकरी मंडळींना दिशादर्शक ठरेल अशी मला आशा आहे. प्रसिद्ध लेखक तथा कवी एकनाथ गोफणे सर आपल्या साहित्य व गोरबोली रेडिओच्या माध्यमातून अनेक लेखक कवींना उजाळा देण्याचे काम ते अहोरात्र करतात. त्यांचे साहित्य कार्य हे अनमोल असून अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी मा. एकनाथ गोफणे सरांनी परिवर्तनाची वाट धरलेली आहे. त्या वाटेचे आपण सर्वच साहित्यिक मानकरी असल्याचा उजाळा ते आपल्या साहित्यातून देत राहतात. हा त्यांचा मोठेपणा आहे. त्यांचे परिवर्तनाचे काम पाहता ते गोरबंजारा समाजातील गाडगेबाबाच आहेत. मा. एकनाथ गोफणे सरांना मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्या साहित्याची भरभराट होवो अशी संत सेवालालबापू चरणी प्रार्थना करतो‌ आणि थांबतो!!

स्वच्छंदी भरारी गोरबोली भजन विशेषांकाचे मुखपृष्ठ जयवंत गोफणे तर या अंकाला सहकार्य दुर्गा गोफणेचे लाभलेले आहे. सर्वांनीच वाचावा असा हा सुंदर अंक आपल्या संग्रही सुद्धा ठेवावा अशी अपेक्षा आहे.

धन्यवाद !!


*अंकेम अंक स्वच्छंदी भरारी गोरबोली भजन विशेषांक*



*✍️याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद -94 21 77 4372*

7 दृश्य0 टिप्पणी

Comments


bottom of page