top of page
खोज करे
लेखक की तस्वीरEKNATH GOFANE

नापास वस्याच्या जीवनातील भाव भावनांचा कल्लोळ मांडणारा अप्रतिम ग्रंथ! कल्लोळ

नुकतेच प्रकाशन झालेले

गोरबंजारा समाजातील प्रसिद्ध लेखक प्रा. डॉक्टर वसंत. भा. राठोड यांचे *कल्लोळ आणि आक्रोश* हे दोन ग्रंथ त्यांनी आठवणीने मला पाठवले. ते काल मिळाले. नवीन पुस्तक भेट आले म्हणजे ते वाचल्याशिवाय चैन पडत नाही. असा माझा दिनक्रम आहे. सध्या मी लोकसभा- विधानसभा आढावा लेखमालिकेत गुंतल्यानंतरही सदर पुस्तकावर काहीतरी ओझरतं लिहावं. हे मनोमन वाटत होते. त्यामुळे मी माझी लेख मालिका थोडी बाजूला करून या पुस्तकावर लिहिता झालो. गोरबंजारा साहित्य दालन हे दिवसेंदिवस समृद्ध होत आहे. एकेकाळी तांडा कादंबरी वाचणारा गोरमाटी तांडा. याडी आत्मकथनाकडे वळला. याडी आत्मकथनाने प्रंचड धुमाकूळ घातली.नवतरूणांना वेड लावले. त्यानंतर मात्र एकशे एक दर्जेदार आत्मचरित्र बाहेर यायला लागली. रावजी राठोड यांचा तांडेल, राजाराम जाधव यांचा अजिंक्यवीर- अंधार यात्रेचे स्वप्न, नामदेव राठोड चा वादळवाट, नामदेव चव्हाणचा लदेणी, सध्या मराठी साहित्यात चर्चेत असलेला शिवाजी जाधवांचा आयुष्य जगतांना या पुस्तकांनी गोर साहित्य वाचकांना भुरळ घातलेली आहे.

*गोर साहित्यातले भीष्म पितामह आदरणीय भीमणीपुत्र मोहन नाईक साहेब* यांनी गोर साहित्याची चळवळ केवळ पुढे नेलीच नाही. तर त्यांनी बरेच साहित्यिक घडविले. आज गोर बंजारा साहित्यामध्ये 400 च्या जवळपास पुस्तके प्रकाशित झाली असून त्यामधील अर्धे अधिक साहित्यिक/ लेखक/ कवी हे आदरणीय भीमणीपुत्र मोहन नाईक साहेब यांनी घडवलेले आहे. याच कडीतील हा डॉक्टर वसंत. भा .राठोड हा सुद्धा एक प्रसिद्ध साहित्यिक असून जाग पालका, जगणं रानफुलाच ही त्यांची दोन गाजलेली पुस्तके आहेत. आता नुकताच *कल्लोळ आणि आक्रोश* या पुस्तकांनी गोर साहित्यातील वाचकांना वेड लावलेले आहे. *गोर बंजारा समाजातले प्रसिद्ध इतिहास संशोधक तथा उपजिल्हाधिकारी मा. जयराम पवार यांनी* या कल्लोळ पुस्तकावर दोन ओळी लिहिल्या आणि कल्लोळ पुस्तकाची प्रचार प्रसिद्धी सर्व दूर पसरली. त्यानंतर महाराष्ट्राच्या *मंत्रालयात कुशल प्रशासक म्हणून नावाजलेले जेष्ठ साहित्यिक मा. राजाराम जाधव साहेब* यांनी या कल्लोळ पुस्तकावर चार ओळी लिहिल्या आणि अख्खा महाराष्ट्रात कल्लोळ पुस्तकाबद्दल फोनाफोनी करू लागला. नापास वस्याच्या जीवनातील भावभावनातील व्यथा,वेदना मांडणारा हा कल्लोळ सगळ्याला वेड लावत आहे. कल्लोळ पुस्तकातील नापास वस्याची जीवन स्टोरी वाचताना मात्र डोळे डबडबतात. असेच डोळे गोर साहित्यातील अनेक आत्मकथनात डबतात. पुसदच्या बस स्टॅन्ड मध्ये कपबशी धुणारा राजाराम जाधव, मुसलमानाच्या गाडयावर सडलेले केळे खाऊन पोलिसांसाठी धावणारा नामदेव राठोड, उस्टफास्ट खाऊन जज झालेला नामदेव चव्हाण, ऊस कापणाऱ्या मजुराच्या पोटी जन्मलेला डॉक्टर दत्ताराम राठोड पोलीस अधीक्षक होतो. अशी कितीतरी उदाहरण सांगता येईल. पण या सगळ्यांचे दुःख,व्यथा, वेदनाच्याही पलीकडे एका मुसलमानाच्या हॉटेलमध्ये काम करता करता *गधे के बच्चे, अंधा हुआ क्या। दिखाई नही देता। अशा उर्फाट्याशिव्या खात असताना पुन्हा शिवीवर शिवी भेंणचोद, मादरचोद* अशा कितीतरी शिव्या वस्यांनी खाल्ल्या. पण तो मागे हटला नाही.डगमगला नाही. त्याला शिकायचं होतं. मोठं व्हायचं होतं. कारण *महानायक वसंतराव नाईकसाहेब* आपल्या भाषणात नेहमी सांगायचे तम काहीही करो पण आपण बाल बच्यांन शिकावो. ही प्रेरणादायी तुकारी सर्व तांड्यातल्या बा च्या मनात घुमत होती. पण त्याच्यामधून वस्याचा बाप कसा सुटणार. वस्याचं हॉटेलमधील शोषण. वस्याच्या वडिलांनी बघितलं. आणि त्यांनी लगेच सांगितलं *बेटा वसू आपकांणेर उन्हाळेम तु हांटेलेम मत जो!* तळ हातावरील फोडाप्रमाणे आपल्या वश्याला जपणारा भाऊराव मामा हा खरा शिक्षणाचा डॉक्टर होय! दलिंद्रीच्या संसाराला ठिकळे लावण्यासाठी अहोरात्र मनासन अवस्थेपर्यंत कष्ट करणारी स्वतः दुःख सहन करून आपल्या कोथळीतल्या पाखरांना प्रकाश देणारी पार्वती मामीच्या पोटी हा वस्या म्हणजे वसंता जन्मला. नापास झाला आणि तो डॉक्टर कसा झाला हे जर मी सांगत बसलो तर मग तुम्ही पुस्तक केव्हा वाचणार ?

*नापास वस्या डॉक्टर कसा झाला?* हे जर तुम्हाला शोधून काढायचं असेल तर तुम्हाला 285 पेजचं हे पुस्तक खरेदी करून वाचावंच लागेल? किंमत फक्त चारशे रुपये तीन पाव मटण येत नाही. एवढ्या कमी किमतीमध्ये गोरबंजारा समाजात अनेक हाल अपेष्टा सहन करत करत प्रा. डॉक्टर वसंत राठोड हा कसा घडला ही वेड लावणारी जीवन स्टोरी प्रत्येकाने वाचलीच पाहिजे. असं माझे प्रामाणिक मत आहे डॉ.वसंत राठोड च्या जीवनातील अनेक घटनांचा ऊहापोह कल्लोळ मध्ये आलेला आहे. एवढेच नव्हे तर त्यांचे संघर्षमय जीवन हे अत्यंत वेदनादायी आहे. प्रा. डॉक्टर वसंत राठोडची ही जीवन कहाणी केवळ वसंतची नसून ती तमाम तांड्यातील नवतरुणाची आहे. असे जर सांगितले तर ते वावगे होणार नाही. प्रत्येक तरुणांनी आपल्या जीवन संघर्षातून म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जायचं असेल, आपले जीवन सुख आणि समृद्धीमय करायचं असेल तर त्यांनी कल्लोळ वाचलाच पाहिजे!

*कल्लोळ मधील वसंताचे याडी आणि बा सोबत आलेले संवाद हे एखाद्या सुपरडुपर सिनेमातल्या डायलॉगलाही मागे पाडणारे आहे*.

*वस्या नापास झाला. वाऱ्यासारखी वार्ता तांड्यामध्ये पोहोचली. याडी ढावलो करायला लागली . बा मारत होता.याडी ढावलो करत होती.* *आणि जोरजोराने सांगत होती. मार वसु आब बच्चेनी. खूब मार खादोचं. कठोर पण वंसताचा हित जपणारा बा या कल्लोळ मधील तो खरा नायक आहे.* अशी अनेक प्रसंग या पुस्तकात रडायला लावतात. मी रडलो तुम्हालाही रडायचं असेल तर कल्लोळ वाचावंच लागेल. कल्लोळ जरूर वाचा..!

वस्याच्या जीवनातील भावभावनांचा कल्लोळ *ही अप्रतिम कलाकृती गोरबंजारा साहित्यात एक दिवस नक्कीच कल्लोळ करेल*. यात मला शंका नाही. नापास वस्या तु हिम्मत सोडली नाही आणि डॉ. झालास आणि आपल्या आईवडिलांचेच नाही तर तमाम गोरबंजारा समाजाचे नाव रोशन केले म्हणून तुला याडी परिवारातर्फे सेवामय शुभेच्छा!!

लवकरच या पुस्तकाची समीक्षा आपल्याला वाचायला मिळेल.


धन्यवाद !!



समिक्षक:- याडीकार पंजाबराव चव्हाण.

पुसद

94 21 77 43 72

37 दृश्य0 टिप्पणी

Comments


bottom of page