------------पुुुस्तक परिचय--------------------
परिवर्तनाची नांदी ठरलेली तेजस्वी कहाणी-लेखक पंजाब चव्हाण यांची साहित्यकृती 'याडी'
पुुुस्तक परिचय.
लेखक पंजाब चव्हाण यांनी निलंबनाच्या संकट काळात लिहीलेली गरीबीच्या झळांमधून तावून सुलाखून निघालेली परिवर्तनाची नांदी ठरलेली ही तेजस्वी कहाणी याडी आहे.
गोरबंजारा प्रकाशनने याची द्वितीय आवृत्ती प्रकाशित केली हेच या साहित्यकृतीचे यश म्हणावे लागेल.
याडी आत्मकथनाच्या एकूण 19 भागांमधून 'लेखकाचा संघर्ष, जडणघडण' वाचकांच्या हृदयाला जाऊन भिडणा-या स्वकथनातून पोहोचतो.
सुंदलयाडीची
परिश्रमावरची निष्ठा, प्रामाणिकपणाची जोड, संघर्ष, कुटुंबाची काळजी, स्वतः उपाशी राहून लेकरांचे पोट भरले जावे यासाठीची तळमळ ,संयम व निर्भयता त्याचसोबत बाप लालसिंग यांचं स्वाभिमानी व्यक्तीमत्व,लेखकाच्या सामाजिक व वैचारिक सामर्थ्याची ओळख दर्शवितो .काका भिका जेव्हा कुटुंबांपासून वेगळा होण्याची भाषा करतो तेव्हा ,सर्व वस्तू भिकाला द्या व माझे आईवडील मला द्या हे म्हणणारा बाप. एका घराच्या दोन चुली झाल्यावर आलेला करुण प्रसंग,व एकच चुल बरोबर पेटत नसताना दुसरी चुल कशी पेटेल हा लेखकाच्या मनात निर्माण झालेला प्रश्न तत्कालीन आर्थिक परिस्थितीची जाणीव करुन देतो.
याडी साहित्यकृतीतून लेखक पंजाब चव्हाण यांनी काकांची वेगळी चुल सह तांड्यातील प्रतिबिंब, पुष्पावंती नगरीत प्रवेश,योगायोग ,तांडा चालला शेतकी शाळा- एक आठवण, जीवघेणी रात्र, लग्नात मस्त, टटेल कंपनी, टाऊन हॉल , मुलाखत , भंडारा जिल्ह्यातील जीवन व वास्तव्य, झिपरी बाई सह,बाबासाहेब नाईक यांच्या धर्मपत्नी,नाननी नायकण,मनोहर नाईक, मुख्यमंत्री वसंतराव नाईक, पत्नी सीता आदींच्या आठवणी सह सामाजिक उत्तरदायित्व या भावनेतून बंजारा कर्मचारी संघटनेने कार्य बाबा आमटेंच्या भेटीचा प्रसंग आदी बाबी दिलखुलासपणे मांडलेल्या आहेत. आर्थिक परिस्थिती मुळे उभे राहणारे अनेक कठीण प्रसंग,त्यातून शिक्षण घेण्यासाठीची लेखकाची जिद्द.
आजोबांनी लेखकाचं शाळेतील भाषण ऐकून याडीला सांगितलेले,सुंदल तुझा पोरगा फार हुशार आहे, एक दिवस तुझ्या पोराच्या मागेपुढे चपराशी राहतील ,मोठा साहेब होईल. हा आशावाद निर्माण करणारा आशिर्वाद आईला आशेचा किरण दाखवणारा ठरला.त्याच प्रेरणेतुन संसाराचा गाडा संघर्षमय रस्त्यावरुन ओढताना याडीची होणारी दमछाक व शिक्षणाने सुसंस्कृत होणारा लेखक
पंजाब चव्हाण सक्षमपणे उभा राहतांना दिसतो.
तांड्याच्या संस्कृतीची ,नसाबनितीची जपणूक करण्यासोबत तांड्याच्या परिवर्तनाची गरज देखिल
लेखक सहजेने नमुद करतो.जीवघेणी रात्र मधला प्रसंग अंगावर शहारे आणणारा आहे तर लग्नात मस्त या भागात लेखक कधी हळवा होतो तर कधी कठोर भुमिका घेतांना दिसतो.आंध्रप्रदेश मध्ये कापूस विकायला जाणा-या शेतकरी बांधवांच्या समस्येच्या मांडणीतून याडी ही साहित्यकृती शेती माती नाती गोती यांची घट्ट नाळ जोडण्याचा प्रयत्न करते.
लेखकाने स्वतःची वेदना व्यथा मांडलेली आहे. शिकत असताना तो नोकरी करत असताना त्याला मंडळी आणि त्याचं जगणं वागणं गोष्ट त्यांनी मांडलेली आहे .रात्रभर जागायचं बंजारा भजन करायचा वेगवेगळ्या ठिकाणचे बंजारा भजनी मंडळ त्यावेळेस होते ते आजही आहेत आणि या माध्यमातून तांड्याला कोणत्या प्रबोधनाची गरज आहे हेसुद्धा या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने मांडले आहे. त्यावेळी पुसद मध्ये एकमेव फुलसिंग नाईक विद्यालय होते आणि फुलसिंग नाईक आणि जिवंतपणी वसंतराव नाईकांना महाविद्यालय सुरू करण्यास भाग पाडले होते ही वसंतराव नाईक यांच्या वडिलांचे दूरदृष्टी सुद्धा त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे
व्यक्तीला समृद्ध करणे यावर ठाम विश्वासाने बदलायचं कसं तर परिवर्तनासाठी तांड्यात महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर, वसंतराव नाईकांचा अभ्यास करणं जरुरीचं वाटतं अशी ही गोष्ट या माध्यमातून लेखक अधोरेखित करतात तांड्याला परिवर्तनाकडे घेऊन जातात. खूप सुंदर पद्धतीने त्यांनी आठवणींचा पट मांडलेला आहे. मामाच्या मुलीला जी भविष्यात त्याची बायको असावी तर अशी कशी त्याच्या संदर्भात फार रंजक पद्धतीने त्यांनी मांडलेल्या आहे. तीच्या सोबतचा प्रवास त्या रस्त्याकडे आलुबोंडा खाऊन बसने केल्याने
शेलूत उतरुन पांदण रस्त्याने निघाले आणि तिथून सीताचा आणि त्यांचा प्रवास सुरु झाला व भविष्यात किती चांगला होता हे त्यांनी मांडलेला आहे सीता ची सात आणि त्यासाठी ते कधीतरी लपून दोन शब्द बोलायचे ते मान हलवायची तिच्यासाठी मी तसेच तिला चोरुन दे .तसेच होस्टेलवर असताना आलेली आठवण लेखकाच्या मनाची तगमग व प्रेमभावाचं दर्शन घडविते.लेखकाचा हळवेपणा यातून दिसतो.याडी मध्ये येणारी झिपरीबाई ही व्यक्तीरेखा मनाची श्रीमंती दर्शविते. जिव्हाळा जोपासले. संघर्ष करत ,लढत, झगडत, परिवर्तनाच्या दिशेने ,जाणारा, भटक्यांचं दु:ख अनुभवणारा व त्यातून घडणारा लेखक ,सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सामाजिक सुधारणा विषयावर कार्य व संघटन करताना दिसतो.
याडीच्या प्रथम आवृतीचं मुखपृष्ठ प्रा.रवि चापके यांनी तर द्वितीय आवृतीचं मुखपृष्ठ जयंती आष्टनकर यांनी साकारले असुन संस्कृतीरक्षण, संघर्ष व शिक्षणाने परिवर्तन होईल व यशाची शिखरे गाठता येतील यासाठी धडपणारी याडी यात दिसते. भीमणीपुत्र मोहन नायक यांच्या प्रस्तावेमुळे याडी चा साहित्यक्षेत्रातील प्रवेश सुकर झाल्याचे दिसून येते .
भविष्यात पंजाब चव्हाण यांनी गोरबोलीत काव्यसंग्रह प्रकाशित करावा. त्यात स्वावलंबनाची व स्वाभिमानाचा संस्कार करणा-या बापावर, लालसिंग चव्हाण यांच्यावर एक कविता असावी.
याडी, शिकारी राजा, बंजारा हस्तकलेची शोकांतिका आदी साहित्यकृतीस सोबतच साहित्यिक पंजाब चव्हाण यांच्या समाजपरिवर्तन व वाचन चळवळीला गती देणा-या आगामी साहित्यसेवेस gorbolibanjararadio.com तर्फे हार्दिक शुभेच्छा.🌹🌹🌹
-----------
पुुुस्तक परिचय लेखन-✍
एकनाथ गोफणे.
Commentaires