top of page
खोज करे
लेखक की तस्वीरEKNATH GOFANE

पुस्तक परिचय - लावण पिवसी

*पुस्तक परिचय - लावण पिवसी*


- भिमणीपुत्र मोहन नायक

______________________________________

भिमणीपुत्र बापूने बणजारा साहित्य संस्कृती वाढावी, तांड्या तांड्यात वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी यासाठी विपुल असे लेखन केले आहेत. खास गोरमाटी साहित्यात त्यांचा पगडा वरचढ आहे. त्यांच्या लेखन साहित्याच्या माध्यमातून दिसून येतात गोरमाटी साहित्यातील (बंजारा) साहित्याचे त्यांना पितामह म्हटले तरी वावगे ठरणार नाही. असे भिमणीपुत्र बापू... त्यांच्याच लेखन शैलीतून, कल्पना विस्तारातून नुकतच प्रकाशित झालेलं "लावण पिवसी" हे पुस्तक नुकतंच माझ्या वाचनात आलं. या पुस्तकाचं मुखपृष्ठ खूपच देखणा व खूप काही सांगून जाणारा आहे.हे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी काढलेले आहे. पुस्तकाची पृष्ठ संख्या ९८ असून मूल्य १२५ आहे.हे पुस्तक निर्मल प्रकाशन नांदेड यांच्या माध्यमातून प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचं एक वैशिष्ट म्हणजे हे पुस्तक बापूने गोरमाटी (गोरबोली) बोलीच संवर्धन, प्रचार व प्रसार करणाऱ्या चाळीसगाव येथील एकनाथ गोफणे व दुर्गाताई गोफणे या जोडप्याला हे पुस्तक कृतज्ञतापूर्वक समर्पित केलेले आहेत.

"लावण" या शीर्षकाचा सविस्तर खुलासा करताना त्यांनी असं लिहिलेलं आहे की, लावण म्हणजे लावण्य, आकर्षित, मोहक, अदभुत.. व इंग्रजीत (Attract)

हे स्पष्ट करतांना गोरबोलीतील एका गाण्याचे (गीत- गीद) संदर्भ देतात की,

"लावणेती खलरी नार, मोडंमोडं करं सणगार !"

अस ते स्पष्ट करतात.

सुरुवातीलाच त्यांनी खंत व्यक्त केली आहे की, गोरबोली (गोरमाटी) भाषा वाड:मय ही जगातल्या प्रतिभावंत साहित्याच्या पंगतीत बसण्याचा क्षमतेची आहे. पण खरी खंत अशी आहे की, आपणच आपल्या भाषा सौदर्य जगाला माहिती करण्याच्या दृष्टीने असमर्थ ठरलो आहोत. गोरबोली (गोरमाटी) भाषेत चिंतनशीलता, आश्चर्यकता, भावपूर्णता, व्यापकता किती आहे हे स्पष्ट करताना ते एका लोकगीतांतून (गिद) ओळीच्या माध्यमातून स्पष्ट करतात की,

"चावळ गळगे सूं, धासरे समधी,

समधण आयी रे ठिक,

घेरेती मारियूं तो माथो फोडीयूं

लावणेती तेड चलायूं... रे...सूं..!

पुढे ते लिहितात की, लेंगी:- लेंगी हा वाड:मय प्रकार ७००० भाषामध्येही आढळून येत नाही. बंजारा समाजाचा तो स्वतंत्र वाड: मय प्रकार आहे. लिंग>लैंगिक>लेंगी असा हा लेंगी या शब्दाचा अपभ्रंश झाला असावा. लेंगी हे अश्लिल जरी असले पण तरीही त्यात अभिव्यक्तीची जोम व नैसर्गिक लावण्या सौदर्य आहे. स्वच्छंदावाद (Romanticism) वास्तववाद, अभिजातवाद, निर्भयवाद, असून एक शृंगारिक व लैंगिक भाषाविष्कार देखील आहे.

आज बंजारा स्त्रिया तिज उत्सव साजरा करतात. तिजउत्सव म्हणजे निसर्गाच्या स्वभावाला, सर्जन क्षमतेला सर्व प्रथम स्त्री जातीने अंकीत केल्याच्या आनंदाचे प्रतिक म्हणजे तीजउत्सव होय.

तीज व बंजारा समाज यांचा खूप जवळचा संबंध आपल्याला दिसून येतो.

"तू कुणसे देसाती आयीये सोनकी

मोयनारो दळ भी जागो

तू मेयेरगडेती आयीये सोनकी

मोयनारो दळ भी जागो..."

या बंजारा लोकगीतातून असं स्पष्ट होतं की, तिजच्या स्वरूपात कृषी संस्कृतीचा शोध सर्वप्रथम मेहगड येथे गोर स्त्रियांनी लावला याचे स्पष्ट ऐतिहासिक पुरावे

"तू मेयेरगडेती आयीये सोनकी

तू तीजेरी सोजा लायीये सोनकी

मोयनारो दळ भी जागो..."

या गोर वाड:मयातून हे स्पष्ट होतात.

"काचीन खांऊ क, पाकीन खांऊ" या प्रकरणातून बापू खंत व्यक्त करत आहे की, आज सर्व गोर स्त्रिया मॉडर्न फॅशन करू लागल्या फेट्या (बंजारा स्त्रियांचा एक पोशाख) सोडून साडी नेसू लागल्या. काळाच्या ओघात आपण बदलत आहोत पण आपली जीवनशैली, राहणीमान, पोशाख, आपली संस्कृती आपण लयाच्या वाटेवर सोडत आहोत.ही आपली प्रगती नसून अधोगती आहे.

बंजारा समाजाच्या गोर स्त्रिया ही काही कमी नव्हत्या वाघिणी सारख्या विरांगण्या होत्या त्याच त्यांनी "पणि नायकण" हे उत्तम उदाहरणाचा दाखला त्यांनी सदर पुस्तकात दिलेले आहेत. "गोर गरीबेन सायी वेणू" या मानवतावादी मूल्य जोपासणारी "पणि नायकण" होती. पणि नायकण हे एक प्रतिनिधी आहे. पण अशा हजारो क्रांतिकारी स्त्रिया बंजारा समाजात होऊन गेल्या.

बंजारा बोली (गोरमाटी) ही स्वतंत्र भाषा आहे.. ती उपबोली नाहीच. हे स्पष्ट करताना बापूने ज्येष्ठ साहित्यिक आत्माराम राठोड यांच्या उदाहरणाचे संदर्भ देतात की, अनेक शब्दांचे मूळ रूप बंजारा बोलीतच शोधता येईल. ही स्पष्टता या ठिकाणी सिद्ध होते.

"लावण गमागो तांडेरो" या प्रकरणात मोहन बापूने बंजारा समाज आपलं स्वतंत्र लोकजीवन, इतिहास, संस्कृती, अन भाषा यांना सामावून घेणारे लोकगीत, साकी, साकतर, लेंगी, टेर ढावलो, मळणो, वाजणा या सर्व गोष्टी तांड्यामधून हद्दपार होत आहे. याला परिवर्तन म्हणावं की अधोगती असा सवाल करून ते म्हणतात की, ही आपली अधोगती आहे. पारतंत्र्याच्या काळात आपली संस्कृती, व भाषा सुरक्षित होत्या पण स्वातंत्र्योत्तर काळात आपली संस्कृती व भाषा लयाल जाण्याच्या वाटेवर आहेत. जो समाज आपली संस्कृती, भाषा, साहित्य,कला, व इतिहास विसरून जातो, तो समाज कधीच इतिहास घडवू शकत नाही. "घर कतरिक दूर, चांदा दूर!" असे अनेक खेळ आज बंद झालेत. आज आम्हाला आरक्षण महत्वाचं वाटतं पण गोरबोली (गोरमाटी) भाषा व संस्कृती महत्वाची वाटत नाही. आरक्षणासाठी आंदोलने होतात पण गोरबोली भाषेच्या संवर्धनासाठी आंदोलने होत नाही. अनेकांना गोरबोली (गोरमाटी) बोलता येत नाही. आपली मातृभाषा येत नाही. ही खूप मोठी शोकांतिका भिमणीपुत्र मोहन नायक सदर पुस्तकात व्यक्त केलेली आहे.

भिमणीपुत्र मोहन नायक हे लेखक कसे झाले? हे सांगताना महाविद्यालयात असताना त्यांचा एक प्रसंग ते सांगतात, अनिंत्या प्रसंगाच्या माध्यमातून वा.सी. काळे सर (त्याचे मास्तर) मोहन बापूंना सांगतात की, भरल्या बाजारात गाणे गात मोठमोठ्याने रडण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य गोर स्त्रियांना कोणी दिलं! जगाच्या पाठीवर अशी संस्कृती शोधूनही सापडणार नाही. या अदभुत संस्कृतीचा अजूनही सखोल अभ्यास संशोधन झालेला दिसत नाही. तो व्हायला हवा. हे वाक्य ऐकून बापू विचमग्न होतात.. विचार करू लागतात. ही गोष्टी त्यांच्या मनाला लागते व ते लेखक झाले.

पुढे भाषेचे सौंदर्य सांगताना मोहन बापू लिहितात की, गोरबोली भाषेत ९ रस, व २३ अलंकार स्वतः च्या अलंकारिक शब्दाने परिपूर्ण आहे. एकंदरीत गोरमाटी भाषेच्या सहवासातून संस्कृती व भाषा विकसित झालेली आहे.हे त्यांचे स्पष्ट मत असून "शृंग" (कामवासना) या रसातील स्थायीभाव गोरमाटी भाषेत "धण" शब्द आहे. हे सिध्द करतांना उदाहरणाचा दाखला देतात की, "धण" या शब्दापासून गावडी धनासगी, कतं धणायेनं चलीगीती, अशा भाषा व्यवहार तांड्यात रूढ आहे याच शब्दांपासून धणी, हे शब्द रूढ झालेले आहेत. कदाचित "धणी" या शब्दांपासून मराठीत "धनी" हा शब्द रूढ झालेला असावा अशी शक्यताही ते मांडतात.

वाचनसंस्कृती बद्दल मोहन बापू लिहितात की, जोपर्यंत तांड्यात वाचन संस्कृती जोमाने वृद्धिंगत होणार नाही उदयास येणार नाही तोपर्यंत तांडा आपलं स्वतः च प्रतिनिधित्व करूच शकणार नाही. खाटिकेच्या दुकानावरील, दारूच्या भट्टीवरील, निवडणुकीच्या प्रचारातील, आणि ढाब्यावरील याठिकाणी जेवढ्या संख्यानी गोरमाटी (बंजारा) माणूस दिसतो. अगदी तेवढ्याच संख्यानी बुकस्टॉलवर गोरमाटी (बंजारा) दिसायला लागेल. तेव्हा समजून जा की, आता समाज परिवर्तनेचा संकेत देत आहे. वाचन संस्कृती शिवाय पर्याय पर्याय नाहीच. पुस्तकाच्या शेवटी पिवसीच्या सदरात अनेक बंजारा बोलीतील शब्दांचे मराठीत अनुवाद दिलेले आहेत.

अशा संक्षिप्त स्वरूपात "भिमणीपुत्र मोहन नायक लिखित वाड:मयीन तांड्याचे मोहक रुप संग्रह लावण पिवसी" या पुस्तकाचे संक्षिप्त स्वरूपात परिचय माझ्या परीने आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सविस्तर माहितीसाठी "लावण पिवसी" हे पुस्तक नक्की वाचा..

______________________________________

• पुस्तकाचे नाव - लावण पिवसी

• लेखक - भिमणीपुत्र मोहन नायक

• प्रकाशन - निर्मल प्रकाशन, नांदेड

• पृष्ठ संख्या - ९८

• मूल्य - १२५ ₹

______________________________________

• परिचय कर्ता •

लेखक - दिनेश राठोड


मो. नं. 7391939846

20 दृश्य0 टिप्पणी

Comentarios


bottom of page