top of page
खोज करे
लेखक की तस्वीरEKNATH GOFANE

पुस्तक परिचय ---वाचनाची रुची वाढविणारी साहित्यकृती ‘मोहोरपाला’


पुस्तक-परिचय

वाचनाची रुची वाढविणारी साहित्यकृती ‘मोहोरपाला’


विदर्भातील प्रतिभावंत लेखक ,कवी गोपाल शिरपूरकर यांनी लिहिलेले ‘मोहोरपाला’ हे पुस्तक त्यांनी ‘ज्यांच्या मिश्किल ,खुमासदार लेखनशैलीने अवतीभवती बघायला शिकवलं’ त्यांना अर्पण केलेले आहे. या अर्पण पत्रिकेवरुन‘मोहोरपाला’ची मध्यवर्ती कल्पना येते .मोहरपाला मधील हे लेख यापूर्वी दैनिक पुण्यनगरी, लोकशाही वार्ता, विदर्भ मतदार,सायबर क्राईम,त्रै.भावमाला यामध्ये प्रकाशित झालेले आहेत. मोहरपालामध्ये लेखक गोपाल शिरपूरकर यांनी आठवणींच्या आनंददायी सुखद क्षणांचा त्या अनुभवांचा संचित लेखरूपाने या ठिकाणी मांडलेला जीवन जगत असताना आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांमधून काहीतरी बोध देत ,त्या घटना आपल्याला काहीतरी वेगळे शिकून जातात. जगण्याला नवीन प्रेरणा देऊन जीवनाला आनंद देऊन जातात अशा विविध घटनांचा मागोवा त्यांनी या मोहरपाला मधून घेतलेला आहे वाचनाची रुची वाढविणारी साहित्यकृती ‘मोहोरपाला’ या रुपात ज्ञानसिंधु प्रकाशनने प्रकाशित केली आहे..गोपाल शिरपूरकर हे एक प्रतिभावंत असं व्यक्तिमत्व आहे. कवी ललित लेखक म्हणूनही त्यांची एक स्वतंत्र ओळख आहे. या संग्रहाला वाचक राजू गरमडे यांची प्रस्तावना आहे.तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर प्रमोद मुनघाटे यांनी या संग्रहाची पाठराखण केलेली आहे.

प्रमाणभाषा आणि बोलीभाषेचा चपखल केलेला वापर या मोहरपालाचे वैशिष्य आहे.

एकूण साठ वेगवेगळ्या बाबींवर त्यांनी लिहिलेल आहे.ज्यामध्ये ग्रामीण जीवनच्या आठवणी ,मनातले कधी गंभीर तर कधी खट्याळ भाव यात दिसून येतात.विविधांगी सौंदर्याचा शोध लेखकाने या निमित्ताने घेतलेला आहे.वासंतऋतुच्या आगमन समयी शेतशिवारात ,निसर्गात असलेल्या चिंचेच्या झाडावर येणारा मोहोर मन हरवून टाकतो .तो मोहोर खाण्याची खटपट , यासाठी धडपडणारा मित्रमेळा व प्रदुषण विरहित वातावरण यांची छान आठवण वाचकांना होते.या संग्रहातील छत्रीसह शेंगदाणे, कडदुडा ,गट्स ,कैरी, गावातली हरवलेली पंगत ते सुरकुत्या अशा एकुण ६० विविधांगी विविध आठवणी त्यांनी यामध्ये मांडलेल्या आहेत. वाचक वाचत असताना त्यामध्ये गुंतून जातो आणि वाचकाला गुंतवून ठेवण्याची ही अनोखी क्षमता मोहरपालाच्या निमित्ताने लेखकाच्या लेखनातून दिसून येते .जे जे दिसलं,अनुभवल ते सर्व मोहोरपाला मध्ये शब्दबद्ध करण्याची कला लेखकाने केली आहे. ‘वैदर्भीय शिव्या आणि रसग्रहण’ या भागात शिव्यांचे विश्व उलगडण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला आहे. तर आठवणीतील वल्ली मध्ये ‘ललित उर्फ़ टोपल्या’च्या आठवणी व जगण्यातला आनंद वाचाकंसमोर येतो.पुनर्वसनानंतर हरवलेला गाव व गावपण यांच्या आठवणींचा धांडोळा दिसून येतो . नॉन मॅट्रीक श्याम्याचा ‘पुल कमजोर है’ दिलखुलास हसवितो..वाचनाची रुची वाढविणारा आठवणींचा हा चविष्ट चवदार ‘मोहोरपाला’ सर्वांनी एकदा चाखून पहावा असाच आहे .लेखक ,कवी गोपाल शिरपूरकर यांच्या साहित्य लेखानस हार्दिक शुभेच्छा ..


पुस्तकपरिचय लेखन

एकनाथ लक्ष्मण गोफणे.

८२७५७२५४२३-चाळीसगाव


16 दृश्य0 टिप्पणी

Comments


bottom of page