top of page
खोज करे
लेखक की तस्वीरEKNATH GOFANE

प्रबोधन आणि परिवर्तनाचा ठसा उमटलेल्या वैचारिक कवितांचा संग्रह- लोकशाही.

प्रबोधन आणि परिवर्तनाचा ठसा उमटलेल्या वैचारिक कवितांचा संग्रह- लोकशाही...



‘शब्द माझे बारुद झाले आहेत

जातीच्या उतरंडीला सुरुंग लावण्यासाठी

जाती जातीच्या कोंडवाड्यात अडकून पडलेल्या

माणसा माणसाला मुक्त करण्यासाठी’ …




अहमदपुर येथील साहित्यिक एन. डी.राठोड यांच्या 'लोकशाही' या काव्यसंग्रहातील कवितेच्या या ओळी.

या संग्रहाचे प्रकाशन 2022 या वर्षी नांदेड येथील ‘शब्ददान प्रकाशन’ – यांनी केले आहे.

प्रबोधन आणि परिवर्तनाचा ठसा उमटलेल्या बारुद झालेल्या शब्दांचालोकशाही हा वैचारिक कविता संग्रहआहे. कवी राठोड हे ते चळवळीतले कार्यकर्ते आहेत. मागील काही वर्षापासून ते परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करत आहेत. त्यामुळे त्यांना जे बरे-वाईट अनुभव आले. त्या अनुभवाच्या माध्यमातून प्रबोधनआणिपरिवर्तनाचाठसात्यांच्यामनावरउमटला . परिवर्तनवादीमहापुरुषांचेविचार त्यांच्या अंगात रुजले आणि त्यातूनच समाजाच्या सुख दुःखाची जाणीव झाली त्याचं प्रकटीकरण या लोकशाही काव्यसंग्रहातील शब्दा शब्दात आहे. म्हणूनच कवीचे

शब्द बारुद झाले आहेत,शब्द रोटी झाले आहेत,दिशाहिन समाजाला दिशा दखाविण्यासाठी ,समाजाच्या उन्नतीसाठी हुंकार होणार आहेत.असा आत्मविश्वास कवीला वाटतोय .

30 कवितांचा हा काव्यसंग्रह आहे.यातील काही कविता विविध प्रतिनिधीक काव्यसंग्रहातुन वाचकांपर्यंत पोहोचल्या आहेतच .पण या कविता ,काव्यसंग्रहात एकत्रित वाचतांना लोकशाहीची ,नितीमूल्ये,मनावर सहजतेने बिंबवितात.

बहुजनांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हरितक्रांतीचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना हा कवितासंग्रह अर्पण करण्यात आलेला आहे .

या संग्रहामध्ये ,लोकशाही ,क्रांतीसुर्य, भूकंप, असत्य, युद्ध नको, स्वातंत्र्य, समाजसेवा ,वसंतराव नाईक ,महात्मा फुले ,माझा भारत देश महान, मी कोण ?,मोसमाची पाखरं, शब्द ,उपकाराची परतफेड करणारे अण्णाभाऊ .येरे येरे पैसा, सावित्री, बस स्थानकातला वेडा ,गुरुजी, देशभक्त अण्णाभाऊ, माय ,माझा बाप, माझ्या गावचा शेतकरी राजा, पैसा, नारे ,भ्रष्टाचाराचे भूत वनमाऊली,बाचं माहेर ,वाघासारखा बाप माझा, सखू पळाली माहेरा व झोंबी या कविता आहेत.


लोकशाही कविता संग्रहातील याकविता माणसाच्या विचाराला चालना देतात. यात व्यक्तींच्या कार्याचा उल्लेख आहे. कवी चळवळीतले कार्यकर्ता असल्याने व शासनाच्या ग्रामविकास विभागात कार्यरत होते. त्यामुळे त्यांनी लोकांचे दुःख जवळून बघितले आहे. लोकांसाठी काय करता येईल ही तळमळ एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून एन.डी. राठोड यांच्या मनामध्ये आहे.

या कविता ,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसंतरावजी नाईक अण्णाभाऊ साठे ,यांच्या प्रबोधन व परिवर्तनाच्या प्रेरक कार्याची यांच्या कार्याची दखल घेतात .

लोकशाहीत काय करायला पाहिजे आणि आज काय होतंय हे सांगताना ती कवी म्हणतो,

‘ते आहेत महात्मा गांधींचे चेले

आणि सर्वात अगोदर बघा तेच किल्लेदार झाले’.

लोकशाही मूल्याचं जतन आणि संवर्धन करत असताना विकासाचा रथ हा कोणाकडे जायला पाहिजे तो जात नाही ती विषमता दिसते आणि त्या विषमतेतूनच कवी हळहळतो आणि मधूनच मग शब्दाने भूकंप करतो अन नव्या जगासाठी आशादायी होतो.

‘कशी होईल उद्या

आमच्या भविष्याची वाट

आज उद्या काळाची

पडेलच कि गाठ..

नाही तर दे एकदा

झिडकारुनच सारे

अन वाहु दे जोमाने

मग नव्या जगाचे वारे’....

लोकशाही कविता वसंतरावजी नाईक यांच्या समग्र कार्याचाही परिचय करून देते .

कवी म्हणतो ,

‘औष्णिक विद्युतचे जाळे विणले शेतकऱ्यांसहित सर्वच सुखावले

वीज घराघरात गेली

गोरगरिबांनी दिवाळी केली’

वसंतराव नाईक यांच्या सत्ता विकेंद्रीकरणापासून ते रोजगार हमीपर्यंतच्या एकूण राजकीय जीवनातील त्यांच्या सर्वच कार्यावर प्रकाश टाकलेला आहे .

जाणीवांच प्रकटीकरण ,वेदना संवेदना यातून कवी तांड्यात सुद्धा फिरून येतो .भटक्या लोकांच दुःख मांडतो.शेतीशी नाळ जोडून ,माय बापाच्या भावनांना जगासमोर आणत ताडयाची वेदना सांगतो.

‘अनेक संकटे झेलत

तांडा उभा माळरानी

बाप सांगतो कधी

आमच्या जीवनाची कहाणी’...


माय कवितेत ,आई व तांडा एकरूप होतांना दिसतात .

‘बकाल तांड्याचं दुःख

मायच्या चेह-यावर‌‍ दिसे

उपाशी लेकरांसाठी माय

वाही कष्टाचे ओझे..


कवितेतून समस्त मानवी जीवनाचा,वेदनेचा स्पर्श जाणवतो. अनेक प्रश्न घेवुन या कविता उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतात .

आपला देश युवाशक्तीच्या सामर्थ्याने प्रत्येक

क्षेत्रात आगेकूच करणार हा आशावाद निर्माण करत

कवी म्हणतो ,

‘युवा शक्तीचा वापर करा

वाहू द्या विकासाचा झरा

देश होईल सुजलाम सारा

जगाच्या शिरपेचात मानाचा तुरा’

यासाठीच ‘जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा’ असचं कवीला वाटत आहे.

यासाठीच ‘समजसेवेच्या’ नावाने पावलोपावली होणारी फसवेगिरी पासून सावध राहण्याचा सल्ला लोकशाही मधील कविता देते.

हा काव्यसंग्रह -महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसंतरावजी नाईक अण्णाभाऊ साठे ,यांच्या प्रबोधन व परिवर्तनाच्या प्रेरक कार्याची यांच्या कार्याची नोंद वाचकास घ्यायला लावतो.


डॉ.विलास ढवळे यांची या संग्रहाला लाभलेली पाठराखण कवीच्या कार्याचा सन्मान करणारी आहे. ‘कार्यकर्ता बघावे बनून’ या वैचारिक पुस्तकानंतर

प्रबोधनआणिपरिवर्तनाचाठसाउमटलेल्यावैचारिक ‘लोकशाही’ हाकवितासंग्रहप्रकाशितकरूनकवी.एन.डी.राठोडयांनीमराठीसाहित्यवसामाजिकपरिवर्तनाच्यादिशेनेदमदारपाऊलटाकलेआहे. त्यांच्यालेखनप्रवासालाgorbolibanjararadio.com तर्फेहार्दिक शुभेच्छा.🌹🌹.

काव्यसंग्रह-लोकशाही -

कवी-एन.डी.राठोड .

शब्ददान प्रकाशन ,नांदेड .मूल्य -५०/-रु.

----पुस्तक परिचय लेखन -✍️एकनाथ ल.गोफणे. 8275725423





53 दृश्य0 टिप्पणी

Comments


bottom of page