पुस्तक परिचय
----------
प्रामाणिकपणाच्या सोबतीने भारत सातपुतेंचे मानवतेसाठी 'जागरण'
-----------------
दिवाळी मागून आणलेल्या झोळयांवर सर्व भावंडे तुटून पडतात .
हे वास्तव प्रसंग आठवणीच्या रुपात डोळ्यासमोर उभे राहते . घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची , कष्टमय जीवन जगत असताना लेखकाच्या आई वडिलांनी त्यांच्या शिक्षणासाठी पारंपारिक व्यवसाय सांभाळून जागरणे केली पण आपल्या मुलांच्या पिढीला जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला जाऊ दिलं नाही . हा परिवर्तनाचा विचार करणारा कृतिशील बाप 'भऊ ' आणि मजुरीहून आल्यावर " आज शाळेत गेलताव ना ? शाळा बुडवू नका " . असं विचारणारी आई .
सावरणारी आई आणि आवरणारा बाप 'जागरण' या आत्मकथनातून साहित्य रुपाने वाचकांसमोर येतात .
मांजरा प्रकाशन - लातूर तर्फे प्रकाशित करण्यात आलेलं लेखक भारत सातपुते यांचं 'जागरण ' हे आत्मकथन 'सुराज्यासाठी निर्भीडपणे जागरण करणाऱ्या देशभक्तांना अर्पण केलेली साहित्यकृती आहे .
लेखक भारत सातपुते यांनी आतापर्यंत काव्यसंग्रह , वात्रटिका संग्रह ,कथासंग्रह ,बालसाहित्य व्यक्ती चरित्र आणि इतर वैचारिक 60 च्या वर साहित्य कृतींचे लेखन केले आहे .त्यांच्या साहित्यकृतींना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत .
शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक आणि साहित्यिक चळवळीमध्ये त्यांचे कार्य अतुलनीय आहे .
शाळेच्या शिक्षकांनी लावलेले लेखन ,खेळ ,स्काऊट गाईड , इंग्रजीचे छंद .
आईने शिकवलेलं पोहणं .
गावातील दरवर्षीची नाटक आणि प्रामाणिकपणे कष्ट करून या प्रामाणिकपणाच्या जोरावर मानवतेसाठी केलेले हे जागरण भारत सातपुते यांच्या आत्मकथनात दिसून येतं.
विद्यार्थ्यांना कल्पक व कृतीशील बनवण्यासाठी 'प्रेरणा ' नावाचा हस्तलिखित ते काढायचे .
शिक्षणाला समाजाशी जोडण्यासाठी पारंपारिक सण उत्सवांचा शिक्षणामध्ये उपयोग कशा पद्धतीने केला .प्राण्यांबद्दल पक्षांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात सहानुभूती निर्माण केले.
सणवाराला नवे कपडे मिळत नसे . वर्गमित्र तान्याचे जुने कपडे वापरायचे .कधी त्याचे फाटेल आणि आपल्याला भेटेल ही ओढ अंतर्मनात होती . हा गरीबीचा कठीण प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो .
लेखकाच्या लहान बहिणीला आपल्या गावातल्या गल्लीतल्या मुलींच्या अंगावरचे दागिने बघून आपल्यालाही दागिने असावेत असं वाटायचं पण परिस्थितीमुळे तिला दागिने मिळू शकत नव्हते आणि मग ती बाभळीच्या वाळलेल्या शेंगांची पैंजण करायची .घरातील जरमनची भांडी याचे वर्णन तत्कालीन परिस्थिती दाखवीते 1972 चा दुष्काळलेखकाने अनुभवलेला प्रसंग वाचकांना हे लावून टाकतो .
आयुष्यात बेईमानी न करण्याचा धडा दुधाच्या प्रसंगातून लेखक शिकतो .
लातूरला डीएडला शिकत असताना लेखकाला कविता लेखनाचा छंद जडला आणि आई-वडिलांचे प्रामाणिक कष्टाची . त्या आंतरिक प्रेरणेची ओढ लेखकाला घडवित जाते . कौटुंबिक अडचणीतून स्वतःला
संपूर्ण सेवाकाळात प्रामाणिक पणे व निर्भयवृत्तीने कार्य करीत स्वतःला सावरत सेवानिवृत्तीनंतरही शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी लेखक हे जागरण सुरु ठेवत आहे .हे समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही .
जागरण मध्ये भारत सातपुते यांनी जे अनुभवलं ते परखडपणे रोखठोक स्वरूपात मांडलेलं आहे .
शिक्षण व्यवस्थेतील चांगले वाईट अनुभव , कौटुंबिक जबाबदारी शालेय कामकाज आणि प्रशासक म्हणून आलेले अनुभव .
शिक्षक संघटनांशी आलेले संबंध त्याचबरोबर जिल्हा परिषद च्या अध्यक्षाचा भ्रष्टाचार एकूणच चांगल्या वाईट प्रकरणांना या आत्मकथनातून परखडपणे अनुभवपर मांडलेला आहे .
मुंबई येथे राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन शासकीय प्रकाशन संचालनालयात लिपिकाची नोकरी करीत असताना .तेथे लेखकाची राहण्याची होणारी परवड वडील स्वतः अनुभवतात आणि त्याला परत आपल्या गावाकडे घेऊन येतात .यातून वडिलांचं लेखकावर असलेले प्रेम , आत्मीयता ,जिव्हाळा दिसून येतो .
शिक्षण व्यवस्थेत असताना कॉपीमुक्त अभियानराबवित असताना आलेले अडचणी .प्रशासन व सहकाऱ्यांशी झालेले वाद गैरसमज .शिक्षण व्यवस्थेतील प्रामाणिक आणि भ्रष्ट अधिकारी
यांचा आलेला अनुभव आणि विरोधासाठी लेखकाने केलेली हिम्मत . व्यवस्थेविरुद्धचा विद्रोह .भ्रष्टाचारांविरुद्धचा संघर्ष .
विविध शासकीय अभियान राबवत असताना आलेले अनुभव .
आणि शेवटपर्यंत आई-वडिलांचं मार्गदर्शन .
शैक्षणिक आणि सामाजिक काम करत असताना शिक्षकाचे साहित्यिक कार्य पण त्यावेळेस सुरुच होतं आणि या प्रामाणिकपणाच्या जोरावर
त्यांची राजकीय आणि प्रशासकीय स्तरावरील झालेली ओळख ही महत्वपूर्ण होती .तरीसुद्धा त्या ओळखीचा गैरफायदा त्यांनी कधीही घेतला नाही . अनेक विद्यार्थ्यांच्याआठवणी आणि बदलीचे काही बिकट प्रसंग या जागरण मध्ये मांडलेले आहेत .
कौटुंबिक स्थितीमध्ये भावाने जमीन विकली एक भाऊ दुर्धर आजारामुळे सपत्नीक हे जग सोडून गेला . हे प्रसंग मन हेलावून सोडतात .शासनाच्या साक्षरता अभियानातील प्रसंग आणि त्यातून जनशिक्षण निलामय केंद्र बंद करण्यासाठीची लेखकाने केलेली शिफारस .लेखकाच्या प्रामाणिक वृत्तीचे दर्शन घडविते .
शिक्षण क्षेत्रातील दडपशाही , कुटुंब नियोजन केस टार्गेट आणि त्यावेळी वरिष्ठ अधिकारी आणि शिक्षकांची झालेली हातापाई शिक्षण व्यवस्थेतील दडपशाही
दाखविते .
जागरण या आत्मकथनातून लेखक समाजात सुशासन निर्माण कसं होईल यासाठी तळमळताना दिसत आहे .
नोकरीच्या काळात दररोज रात्री झोपताना दिवसभराचा आढावा दैनंदिनीच्या रुपाने लिहिण्याची चांगली सवय ही लेखकाला 'जागरण' हे आत्मकथन लिहिण्यासाठी उपयोगी पडलेली आहे .
नोकरशाहीचा प्रामाणिकपणाच देशाला समृद्ध करेल असा आशावाद घेऊन सत्य परखडपणे मांडत लेखक भारत सातपुते ' साहित्य रुपात प्रामाणिकपणाच्या सोबतीने मानवतेसाठी 'जागरण' करीत आहे .
त्यांच्या साहित्य लेखन कार्यास हार्दिक शुभेच्छा .
----------------------
✍️ एकनाथ लक्ष्मण गोफणे
📲8275725423
Comments