पुस्तक परिचय :-
-------------
बालकांच्या भावाविश्वाशी नातं जोडणारा काव्यसंग्रह -
'आला आला माझा घोडा ' .
____________________
बाल साहित्याची उत्कृष्ट निर्मिती करुन बालमानाला समृद्ध करणारे साहित्यिक विंदा करंदीकर , राजा मंगळवेढेकर , बाबा भांड , सुरेश सावंत , राजीव तांबे , दत्ता डांगे अशोक कुरुडे यांना आपला काव्यसंग्रह सस्नेह अर्पण करुन कवी शेषराव जाधव यांनी बालकांच्या भावा विश्वाशी नातं जोडणारा 'आला आला माझा घोडा आला ' या काव्यसंग्रहाची निर्मिती केली आहे .
बालसाहित्य क्षेत्रात कवी शेषराव जाधव यांची कामगिरी त्यांच्या उत्कृष्ठ बालरचनांमुळे सरस ठरली आहे .
मयूर प्रकाशन लोहा (नांदेड) यांनी प्रकाशित केलेल्या या बालकाव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ व आतील रेखाचित्रे प्रा प्रमोद दिवेकर यांनी सुंदर व आकर्षक बनविली आहेत .
माकडे आणि दुष्काळ या कवितेच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्यासाठी माकडाने वापरलेली युक्ती बालकांना कल्पना शक्तीचे महत्व सांगते .
'निसर्ग हे अनमोल ' या शीर्षकाच्या कवितेतून बालमनावर वृक्ष , नदी , सूर्य व आकाशाला प्रश्न विचारुन निसर्ग कसा अनमोल आहे . त्याचं जतन करण्याचा संस्कार देते .
'चिमूलीचे शौर्य ' कविता बालकांच्या कल्पनाशक्तीचे दर्शन घडविते आणि शौर्य ,हिम्मत , देशप्रेताची भावना त्यांच्या मनामध्ये रुजविते .
'हेरगिरी करुन शत्रुंचे
उद्ध्वस्त करीन म्हणते ठिकाण
भारतभुमीचं रक्षण करण्या
आले तरी म्हणते मरण ' .
'पाच एक पाच ' शीर्षकाच्या कवितेतून पाच चा पाढा रंजक पद्धतीने मांडून पाढ्यांविषयी गोडी निर्माण करुन गणित विषयाची आवड निर्माण करण्याचा रंजक प्रयत्न कवीने केला आहे .
पंख मला जर , ढगांची गंमत , भाकरीचे पाय , बापू तुमच्या देशात या कविता विचार शक्तीला चालना देत बालकांचे भावविश्व समृद्ध करण्याचा प्रयत्न करतात .
'आला आला माझा घोडा ' या कवितेतून मामाच्या घरची ओढ , तेथील गंमत जंमत मांडली आहे .
'फळांची महती ' या कवितेतून विविध फळे आणि त्यांचे प्रदेश यांची ओळख बालकांना करुन देण्यात आली आहे .हत्ती दादा चांदोबाच्या वाडीत , मुंगीची दातखिळी' वाऱ्या रे वाऱ्या कुत्र्याची शेपटी या कविता
बालमनाला आनंद देऊन जातात .
काव्यसंग्रहातील कविता बालकांचं मुक्तपणे वावरणं , बोलणं , फिरणं अनुभवणं ,कल्पना करणं , मजा करणं , खेळ , गंमत , हसणं व एकूणच भावाविश्वाशी नातं जोडणारा हा काव्यसंग्रह आहे . 'आला आला माझा घोडा ' . हा काव्यसंग्रह म्हणजे बालकांच्या आनंदाचा वाडा आहे .
कवी शेषराव जाधव यांच्या साहित्य लेखनास हार्दिक शुभेच्छा .
____________________
✍️ एकनाथ लक्ष्मण गोफणे
चाळीसगाव
📲8275725423
Comments