top of page
खोज करे
लेखक की तस्वीरEKNATH GOFANE

भविष्यवेधी शिक्षणाचा विचार मांडणारे राजेंद्र वाघ यांचे शैक्षणिक उपक्रमांचे पुस्तक . .

पुस्तक परिचय

भविष्यवेधी शिक्षणाचा विचार मांडणारे राजेंद्र वाघ यांचे शैक्षणिक उपक्रमांचे पुस्तक

________________

शिक्षक आपल्याकडे असलेल्या वर्गामध्ये विविधांगी शैक्षणिक कृती करुन विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देत असतो . आपल्या कल्पनेतून आपल्या वर्गामध्ये अनेक विविध उपक्रम राबवित असतो आपला विद्यार्थी हा गुणवत्तेच्या क्षेत्रात पुढे गेला पाहिजे आणि जागतिक स्तरावर या विद्यार्थ्याने स्वतः सह देशाची नवी ओळख निर्माण केली पाहिजे या धडपडीतून अनेक शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत .ज्ञानदानाचे अविरत कार्य करीत आहेत . तंत्रज्ञानाची मदत घेऊन आपल्या कल्पनाशक्तीला वाव देत विद्यार्थ्यांना घडवण्याचं अतुल्य कार्य देशभरातील शिक्षक बंधू भगिनी करीत असतात आपण केलेलं कार्य हे समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे . विद्यार्थ्यांसह शिक्षक बंधू भगिनींना त्याचा फायदा व्हायला पाहिजे . हा उदात्त विचार घेऊन चाळीसगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सिंधी या गावातील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक राजेंद्र भाऊराव वाघ यांचं 'माझे ज्ञानरचनावादी उपक्रम भाग - 2 'हे पुस्तक एटीएम प्रकाशन कर्जत यांनी प्रकाशित केले आहे .

राजेंद्र वाघ यांनी आपल्या वर्ग अध्यापनात केलेल्या एकूण 50 विविध उपक्रमांची सचित्र आणि इत्यंभूत कृतीसह माहिती पुस्तकामध्ये या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेली आहे .शिक्षकांना शासन स्तरावरून विविध काम देण्यात येतात ती सर्व कामे सांभाळून ,आपल्या कल्पनेला कृतीत उतरवून शिक्षक राजेंद्र वाघ यांनी उल्लेखनीय असं पुस्तक तयार केलेलं आहे .

ऑडिओ व्हिडिओ क्लासरूम एक विकास मंच ,

मनी वसे ते मोबाईल मध्ये दिसे .

प्रयोग करूया विज्ञान शिकूया . विज्ञान डे साजरा करुया .

मुले आणि त्यांची मैत्री .

दैनंदिनी लिहूया ज्ञान वाढवूया .

चित्रमेळा एक विचार मंच .

मुलाखत घेऊया व्यक्तिमत्व घडवूया .

चिठ्ठी काढूया कृती करुया .

बँकेचे व्यवहार शिकूया .

उघडू या ज्ञानाची कवाडे .

खेळ खेळूया , शांतता पाळू या .


वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन एक आव्हान .

नाटक सादरीकरण एक आव्हान . तंटामुक्त वर्ग एक अभियान .

पुस्तक परिचय एक ज्ञानसाधना .

भाषण करुया व्यासपीठ जिंकूया .

स्फूर्ती देऊया , कृती करुया . बातमीपत्र सादरीकरण .

कात्रण संग्रह पुस्तिका , विषयज्ञानाचे भांडार .

झटपट प्रगत होऊया .

विद्यार्थी ज्ञानाचा रचेता .


अशा कल्पक शीर्षकातून या उपक्रमांची ओळख त्यांनी आपल्या पुस्तकातून केलेली आहे .

राबविलेल्या विविध उपक्रमांसाठी लागणारे साहित्य त्यासाठी केलेली कृती आणि कृती पूर्ण झाल्यावर त्या उपक्रमांचा काय फायदा झाला याची नोंद सुद्धा या पुस्तकात त्यांनी केलेली आहे .

राजेंद्र वाघ यांच्या मते , विद्यार्थी आधुनिक स्पर्धेच्या युगात कसा टिकेल आणि त्याचा आत्मविश्वास कसा वाढेल विद्यार्थी तंत्रस्नेही कसा तयार होईल आणि दैनंदिन जीवनात वावरताना व्यवहाराचे ज्ञान मुलाला कसे प्राप्त होईल विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या सर्व प्रश्नांची उत्तरं या उपक्रमातून त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे .

खेड्यापाड्यातील तळागाळातील मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांना सहज करता येतील अशा या उपक्रमांची मांडणी या पुस्तकात केलेले आहे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन

भविष्यवेधी शिक्षणाचा विचार

मांडत विद्यार्थ्यांमध्ये 6 C ( सहा C ) विकसित करण्यासाठी हे उपक्रम निश्चितच उपयोगी ठरतील असा विश्वास वाटतो लेखक राजेंद्र वाघ यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांवर आधारित त्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांच्या अभिव्यक्तीला वाव देणारं एखादं पुस्तक भविष्यात प्रकाशित करावं या साठी शुभेच्छा .

____________________

✍️ एकनाथ ल . गोफणे

चाळीसगाव

8275725423

50 दृश्य0 टिप्पणी

Comments


bottom of page