top of page
खोज करे
लेखक की तस्वीरEKNATH GOFANE

भाषाविषयक प्रेम व अथक परिश्रमातून झालेली साहित्यनिर्मिती '.......

अपडेट करने की तारीख: 26 सित॰ 2023

भाषाविषयक प्रेम व अथक परिश्रमातून झालेली साहित्यनिर्मिती

'गोरमाटी बोलीभाषेचे सामाजिक आविष्कार आणि लोकजीवन'.

........................................


भिमणीपुत्र मोहन नाईक यांनी लिहिलेल्या गोरमाटी बोली भाषेचे सामाजिक आविष्कार आणि लोकजीवन या पुस्तकाचे संपादन प्रा. भारती मुडे यांनी केलेलं आहे.

गोरमाटी बोलीभाषाच्या सहवासातून भाषा विज्ञानाकडे, गोरमाटी बोलीभाषा उत्पत्ती सिद्धांत, गोरमाटी बोलीभाषा व्यवहार आणि स्वरुप, शिष्टाचारातील अभिव्यक्तीचे सामाजिक संकेत लिंगभेदान्वये गोरमाटी बोलीभाषा आविष्कार आणि सामाजिक संकेत,ध्वनी/उच्चार प्रक्रिया ,ध्वनी परिवर्तन ,अर्थ विचार ,गोरमाटी बोलीभाषा शब्द संकेत,रुपीम विचार (संक्षिप्त) ,लोकसाहित्य, लोककथा भाषिक क्रांतीच्या सीमेवरचा शब्दसैनिकांचा आविष्कार या भागांमधून गोरमाटी बोली बंजारा भाषा आणि बंजारा समाजाची संस्कृती यांची पाळमूळ किती खोल रुजलेली आहे याचा एक आदर्श वस्तू पाठ या पुस्तकाच्या माध्यमातून नजरेसमोर येतो.

वाचकांना, अभ्यासकांना, संशोधकांना आणि येणाऱ्या पिढीसाठी एक सांस्कृतिक ठेवा जतन रहावा व व भविष्यात गोरमाटी घोरपोली बंजारा भाषेचं सौंदर्य अधिक खोलत जावं या बोलीभाषेत अधिकाधिक प्रमाणात साहित्य निर्मिती व्हावी यासाठी हे पुस्तक एक मार्गदर्शक ठरेल असं मला वाटत आहे.

भीमाणीपुत्र मोहन नाईक यांनी आत्तापर्यंत आपल्या लेखनातून गोरबोली भाषा बंजारा भाषेच्या संदर्भातील अनेक गोष्टी प्रकर्षाने मांडलेल्या आहेत.

त्यांचे मारोणी, गोरपान -गोरबोलेतील भाषा सौंदर्य ‘लावण’क्रांतीसिंह सेवादास तोडावाळो यासह 12 साहित्य कृती प्रकाशित आहेत. सोबतच त्यांनी लिहिलेल्या विविध विचारांवर आधारित वाते मुंगा मोलारी याचे भाग एक आणि दोन हे संपादित स्वरुपात प्रकाशित आहेत. त्यांची एक कथा, नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे.

सदोदित वाचन मनन चिंतन आणि चळवळीतून उभं राहिलेलं हे व्यक्तिमत्व.

प्रकर्षाने मांडणी करणारं आणि आपली चिंतनशीलता वाचन यामधून या समाजाचा गोरमाटी बंजारा संस्कृतीच्या बोली भाषेचे वेगळं पण ते मांडत असतात. लिहीत असतात .ही फार मोठी मोलाची गोष्ट आहे. त्यांनी या पुस्तकाच्या लेखनासाठी वेगवेगळे संदर्भ घेतलेले आहेत आणि त्या संदर्भातून ही गोरबोली भाषा कशा पद्धतीने वेगळी आहे. तिचं वेगळं पण काय आहे हे सांगण्याचा खूप चांगला प्रयत्न त्यांनी केलेला आहे.बोलीच्या अभ्यासाच्या दृष्टीने बंजारा गोरबोली भाषेच्या विविध छटा त्यांनी आपल्या गोष्टीतून मांडल्या आहेत. या पुस्तकातल्या एकूण 13 उप प्रकरणांमधून त्यांनी गोरमाटी बोलीभाषेचं भाषा विज्ञान हे त्याने खूप सजगतेने मांडलेलं आहे .

बालपणापासूनच तांड्याची जीवनपद्धती तांड्यातला जगणं तेथील लोकसंस्कृती याचा पुरेपूर अभ्यास करून त्या गीतांचा सखोल असा अर्थ घेऊन या पुस्तकाचं लेखन केलं ही फार जमेची बाजू आहे. गोरमाटी बोलीभाषा उत्पत्ती सिद्धांत मध्ये त्यांनी या मातृभाषेचं महत्त्व विषद केलेलं आहे.सोबतच गोरमाटी बोलीभाषा ही मराठीची उपभाषा नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे गोरमाटी बोलीभाषा आणि भूगोल याचा संदर्भ सोदाहरण त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून स्पष्ट केलेला आहे. गोरमाटी बोलीभाषा व्यवहाराचे भाषिक संप्रेषण हे किती महत्त्वाचं होतं त्याची गरज काय होते हे सहजतेने त्यांनी स्पष्ट केलेलं आहे .

त्यामुळे तांडा सोडून नोकरी व्यवसाय आणि उद्योगाचे निमित्ताने जो समाज बांधव शहरांमध्ये गेला,बोलीभाषेपासून दूर गेला त्या समज बांधवाला आपल्या बोलीभाषेची ओळख नव्याने करुन देण्याचं हे महत्त्वपूर्ण काम या पुस्तकाच्या माध्यमातून भीमणीपुत्र मोहन नाईक यांनी केलेल आहे. आपल्या बोलीभाषेची गोडी लावण्याचे त्याच्यातला गोडवा समजून सांगण्याचं भाषेविषयीचे प्रेम त्यांच्या या कार्यातून दिसून येतं. समाजाला आपल्या भाषेची ओळख नव्या प्रकारे करून देण्यासाठी भीमणीपुत्र मोहन नाईक यांचे हे पुस्तक खूप उपयुक्त आहे.

या पुस्तकांमधून त्यांनी बंजारा संस्कृतीचा त्यासोबत बंजारा व्याकरणही देण्याचा प्रयत्न केला. विरुद्धार्थी शब्द ,समानार्थी शब्द आणि विविध विचार या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे .शब्द संकेत त्यासोबत सांस्कृतिक ऋणानुबंध आणि इतर भाषांशी असलेली लोक साहित्याची भूमिका हे पण त्यांनी स्पष्ट मांडलेली आहे अनेक अर्थाने हे पुस्तक बंजारा बोली भाषेच्या जतन संवर्धनात उपयोगिता सोबतच येणाऱ्या नवी पिढीसाठी नवलेखन करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल.

एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगू इच्छितो की, पुरातन काळापासून या बोलीभाषांचं जतन आणि संवर्धन करण्यात भगिनींचा ,महिलांचा फार मोठा वाटा आहे. विविध प्रसंगाचे गीत आणि एका स्वतंत्र चालीमध्ये मिळण्याचे कसं बंजारा श्रेयात मध्ये होतं आणि पुरुषांचीही त्यांना साथ होती. आजही या पुस्तकाचं संपादन करणाऱ्या प्रा. भारती अनिल मुडे आणि या पुस्तकाचे सुंदर अशी पाठराखण करणाऱ्या डॉ. निशा मुडे- पवार या दोघी भगिनी आहेत. त्यामुळे या भाषेच्या जतन आणि संवर्धन करण्यासाठी या भगिनी पुढे सरसावल्यात ही गोडबोली भाषेसाठी लाख मोलाची अशी गोष्ट ठरलेली आहे .त्याचं अभिनंदन आपण सर्व वाचकांनी करायला पाहिजे. भाषेच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण कार्य ही अनेकांना प्रेरणा देणारी गोष्ट आहे.

खूप सुंदर पद्धतीने यावर पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. प्रा. भारती मुडे यांनी या पुस्तकाचा संपादन करुन आपल्या भाषेची,वडिलांची व समाजाची हे शाब्दिक सेवाच केली आहे. असे या निमित्ताने सांगणे उचित वाटते.

मा. संतोष घोंगडे यांनी खूप सुंदर पद्धतीने गोरमाटी प्रदेश,संस्कृती हे दाखवत भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्याचा वेध घेणारं सुंदर असं मुखपृष्ठ निर्माण केलेला आहे. विशेष उल्लेखनीय गोष्ट असे की गोरमाटी बंजारा गणात ग्रांथिक चळवळ रुजावी या प्रामाणिक हेतूने राजाराम जाधव साहेब माजी सहसचिव मंत्रालय मुंबई , धोळी बुक सेंटर परतवाडी आणि बी सुग्रीव राठोड यांनी या पुस्तकाच्या निर्मितीसाठी अर्थसहाय्य केलं आणि गोरबोली भाषेच्या साहित्य निर्मितीतील ही लोक चळवळ समाजापुढे ठेवली. एक आदर्शवत काम त्यांनी केलं. माननीय भिमणीपुत्र मोहन नाईक हे 'शरीर थकलं पण मन थकू न देणारं व्यक्तिमत्व' आहे. विविध शस्त्रक्रिया त्यांच्यावर झालेल्या आहेत तरीसुद्धा त्यांनी आपलं हे लेखन कार्य बंद केलेलं नाही. अविरतपणे हे लेखन कार्य त्यांचे सुरु आहे.भाषाविषयक प्रेम व अथक परिश्रमातून झालेली साहित्यनिर्मिती असलेलं 'गोरमाटी बोलीभाषेचे सामाजिक आविष्कार आणि लोकजीवन'. हे पुस्तक प्रकाशित केलं. ही सर्वांसाठी एक मार्गदर्शक अशी सांस्कृतिक ठेव आहे.

2 एप्रिल . ह्या दिवशी त्यांच्या वाढदिवस आहे.या निमित्ताने त्यांच्या या लेखन कार्याला आणि मनाच्या उर्मीला gorbolibanjararadio.com तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा.🌹🎂🎂🌹

प्रकाशक -निर्मल प्रकाशन 'नांदेड

किंमत 200 ₹

--------------------------------------------------------


लेखन:-

एकनाथ ल.गोफणेे.

........................लेख वाचल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया खालील coment box मध्ये नोंदवा.

115 दृश्य2 टिप्पणियां

2 Comments


EKNATH GOFANE
EKNATH GOFANE
Mar 08

धन्यवाद .मा .प्रो.डॉ. मोहन चव्हाण🙏🌹

Like

drmohanchavan15
Apr 02, 2023

एकनाथ गोफने जी,

आप का भीमणीपुत्र के व्यक्तित्व पर आधारित यह आलेख बहुत ही मार्मिक ढंग से गोरमाटी बोली की महत्ता, भाषा की व्युत्पति , भाषा का व्यवहार तथा व्यवस्था , बोली भाषा हो करके भी कई सालों से लगातार बगैर किसि बाधा से अबाधित रुप से जीवित है |

यह इस बोलीभाषा की वैज्ञानिकता तथा बोली नहीं बल्कि भाषा इस प्रवृति का द्योतक है| यह आपके आलेख से प्रतिपादित होता है| धन्यवाद

प्रोफेसर डॉ मोहन चव्हाण ,

Like
bottom of page