मतदानासाठी जनजागृती चा अनमोल संदेश देणारा कवी अमोल यांची कविता 'उठा मतदात्यांनो '
----------------------
आपल्या भारत देशामध्ये 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची म्हणजे एका स्थिर संवैधानिक संस्थेची स्थापना करण्यात आली.
या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देशातल्या लोकसभेच्या निवडणुकीचं नियंत्रण व कार्य केलं जातं राज्याच्या निवडणूक आयोगाअंतर्गत राज्यातील विधानसभा आणि इतर मतदान प्रक्रिया गोपनीय पद्धतीने पार पाडली जाते .मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे सोबत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला पाहिजे यासाठी निवडणूक आयोगामार्फत शासनाच्या विविध विभागांच्या वतीने मतदान जनजागृती पर कार्यक्रमांचा आयोजन करण्यात येतं .यामध्ये स्थानिक कलाकारांसह गीतकार गायक यांचा समावेश असतो . साहित्यिक मंडळी सुद्धा या निवडणूक आयोगाला आपल्या साहित्यातून सहकार्य करीत असतात आणि मतदानाची टक्केवारी वाढावी मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी लेखन करीत असतात अशीच कवी अमोल नायक यांची मतदारांना जागृत करणारी ,लोकशाहीच्या मूल्यांचं जतन आणि संवर्धन करणारी अनमोल अशी कविता त्यांच्या आकांत या काव्यसंग्रहात पान क्रमांक 64 वर प्रकाशित करण्यात आलेले आहे . ‘आकांत’ काव्यसंग्रहाचा 'प्रवाह ' हा तिमिरातून तेजाकडे जातो . काव्यसंग्रहातून कवी महिलांच्या दुःखाला वाचा फोडतो , पर्यावरण रक्षण ,निसर्गप्रेम जपण्याची गरज सांगतो .पाणीटंचाई व शेतमालाच्या भावाची चिंता व्यक्त करतो .
लोकशाहीची मूल्ये जपण्याचा संदेश कवीने कवितेतून दिला आहे .
'स्वतः जागे व्हा
इतरांना जागे करा
अजून वेळ गेलेली नाही
मतदानाचा अधिकार बजावा
लोकशाही अजून मेलेली नाही ' .
‘उठा मतदात्यांनो’ या कवितेतून कवी मतदारांना जागृत करतो.देशाच्या रक्षणार्थ लोकशाही मूल्यांची पाठराखंड करतो आणि मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावा हे सुद्धा हक्काने सांगतो .
मतदान प्रक्रिया ही सुरळीत पार पडते पण आपल्या देशाला चांगल्या प्रतिनिधीची गरज असते आणि यासाठी उच्चशिक्षित उमेदवार निवडला जावा राजकारण खूप खराब आहे असं आपण म्हणतो आणि त्यात सहभाग घेण्याचे नाकारतो .यात दोषी आपण स्वतःच आहोत असा सवाल सुद्धा कवी वाचकांना करतो.कवी आपल्या कवितेच्या माध्यमातून मतदानाच्या दिवशी मतदान न करता मौज मजा करायला फिरायला जाणाऱ्यांना अटकाव करताना म्हणतो ,
‘सुज्ञतेची शाल पांघरुन
ज्ञानाच्या गोष्टी आपण झाडतो .
मतदानाच्या दिवशी सहपरिवार .
मस्त फिरायला जातो .’
लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदाराला सर्व अधिकार असतात आणि मग एका मतदाराच्या मतदाराने देशाचं सरकार बनत आणि तो मतदानाचा हक्क बजावा ही जबाबदारी स्वीकारावी यासाठी कवी आपल्या कवितेतून आपलं मत व्यक्त करत असतो. मतदारांशी लोकप्रतिनिधी बांधील असतो त्याला आपले प्रश्न विचारा कारण या निवडणूक प्रक्रियेमध्येच तो आपल्याजवळ येतो .परत ही संधी मिळणार नाही असं परखडपणे चिंतनशील विचार चिकित्सक पणे वाचकांना करायला लावताना म्हणतो कवी म्हणतो ,
‘भाजीपाला पारखणारे आपण
नेता का नाही पारखतो
उच्चशिक्षित तत्व विभूषित
असे नेतृत्व का नाही निवडतो ?’
हे सांगतांना कवी निपक्ष राहतो व शिक्षणाचे महत्त्व सांगतो .
देशाची एकता अखंडचा कायम रहावी आणि सामाजिक बांधिलकी ही कायम राहील म्हणून उमेदवाराची निष्ठा तपासण्याची त्याची प्रामाणिकता आणि मतदारांशी असलेली आपुलकी याचा शोध घेण्याचा संदेश कवी आपल्या कवितेतून देतो.
‘ स्वतः जागे व्हा आणि इतरांना जागे करा
अजून वेळ गेलेली नाही
मतदानाचा अधिकार बजावा
लोकशाही अजून मेलेली नाही.’
म्हणजे प्रत्येकाला कवी मतदान करा मतदानाचा अधिकार आहे प्रत्येकाला दिलेला भारतीय लोकशाहीने आणि तो अबाधित राहावा आणि ही लोकशाहीची मूल्य जपले जावेत आणि लोकशाही ही प्रवाहित राहावी जिवंत राहावी यासाठी प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे असा संदेश कवी आपल्या कवितेतून या ठिकाणी देत आहे. कवी अमोल नायक हा प्रबोधनाचा वारसा जपणारा परिवर्तनाच्या दिशेने पुढे जाणारा कवी आहे .कवी अमूल नायक यांची मराठीतील 'उठा मतदात्यांनो 'कविता त्याच सोबत कवी अमोल नाईक यांची ‘गोरपीठ’ या संग्रहात असलेली एक कविता गोरबोली भाषेची आहे. निवडणुक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे .हा उत्सव सपत्नीक आनंदाने साजरा करण्यासाठी इतरांना प्रेरित करतांना कवी अमोल नायक ‘मतदान’ करण्याच्या संदर्भातील आपले मत व सहकुटुंब मतदान केल्यानंतरचा आनंद या ठिकाणी व्यक्त करीत आहे.
मतदान किदी सेल्फी काढी ,
वाटसापेप देमेलदिनी !
अधिकार बजावला मतदानाचा
हानु वाक्य हेट लकदिनी !
मराठी सह मातृभाषा गोरबोलीतून मतदानासाठी जनजागृती चा अनमोल संदेश देणारा कवी अमोल यांच्या कवितेतून १००% जनजागृती होईल अशी आशा व्यक्त करून कवी अमोलयांच्या साहित्य लेखन प्रवासाला हार्दिक शुभेच्छा .
----------***********************
एकनाथ लक्ष्मण गोफणे.
८२७५७२५४२३
Comentarios