मन तिच्यावर
...
............
हरवून गेलं
हरपून गेलं
मन तिच्यावर
माझं मोहून गेलं .........
गार गार वारा
अंगाला शहरा
बोलवी हिरवी धरा
आभाळाच्या निळाईला
दरीला बघून
ढग वाजवितो ढोल
मन तिच्यावर
माझं मोहून गेलं..........
पानांची सळसळ
गाती पाखरं मंजूळ
झ-याची चालली
मस्तीत खळखळ
नदीला पाहून
जातोया तोल
मन तिच्यावर
माझं मोहून गेलं .........
फेसाळती लाटा
आनंदाच्या वाटा
आठवणींचा घोट
पिऊ गटागटा
स्पर्शला आतूरलं
ओढ भरपूर
मन तिच्यावर
माझं मोहून गेलं .........
............................
✍एकनाथ गोफणे
Comments