पुस्तक परिचय : -
'माझे ज्ञानरचनावादी उपक्रम' - विविधांगी शैक्षणिक उपक्रमांचा खजिना असलेले पुस्तक .
---------------***-----
'आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे ,परिपूर्णतेचा ध्यास घेतलेले प्राथमिक शिक्षक राजेंद्र भाऊराव वाघ ,या उपक्रमशिल आणि धडपड्या तरुण शिक्षकाने त्यांच्या वर्गातील विद्यार्थी 'प्रतिभावंत' बनावेत या हेतुने केलेले शैक्षणिक कार्य, शिक्षण आनंददायी करणारे , विद्यार्थ्यांची निरिक्षण शक्ती व आत्मविश्वास वाढविणारं, सहजता, चिकित्सक वृत्ती जोपासायला लावत, कल्पकता व श्रमाचा आनंद देत शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया वाढविण्यासाठी एकत्रित स्वरुपात शब्दबद्ध केलेल्या विविधांगी शैक्षणिक उपक्रमांचा खजिना असलेले म्हणजे
'माझे ज्ञानरचनावादी उपक्रम' हे पुस्तक आहे.कोविड १९ काळातील पुस्तकाचे प्रकाशन, जेष्ठ शिक्षणतज्ञ ,माजी शिक्षण संचालक डॉ.वसंत काळपांडे यांच्या हस्तेऑनलाईन झाले असुन ATM प्रकाशन कर्जत,अहमदनगर.प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ गजानन सुरकुटवार,नांदेड कल्पनने यांच्या आकर्षक बनले आहे .श्रेयशी ग्राफिक्स, पुणे यांनी अक्षर जुळवणी उत्तम प्रकारे केले आहे. 'उपक्रमांच्या नावात यमक साधल्यामुळे रंजकता वाढलेली आहे'. शिक्षक, पालक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत सर्वांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.
जळगाव जि. प. अंतर्गत सध्या चाळीसगाव तालुक्यातील जि.प.उच्च प्राथ.शाळा शिंदी
ता.चाळीसगाव जि.जळगाव या शाळेत सध्या श्री. राजेंद्र वाघ सर कार्यरत आहेत. याआधी टाकळी प्र.चा येथिल शाळेमध्ये ते कार्यरत असतांना केलेले शैक्षणिक उपक्रम त्यांनी या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत . त्या पन्नास उपक्रम 'माझे ज्ञानरचनावादी उपक्रम' या पुस्तकात आहे.
उपक्रम भाषा ,विज्ञान ,गणित ,कला ,कार्यानुभव संगीत या विषयावर आधारित आहेत. पर्यावरण पुरक असं सहज उपलब्ध होणार व पूनर्वापर प्रक्रियेस हातभार लागेल असे साहित्य या उपक्रमात त्यांनी वापरले आहे. हे एक वेगळंपण ठरतं. विद्यर्थ्यांंमध्ये रममाण होणारा शिक्षक यात आपणास दिसून येतो.
बुद्धीला चालना देणारे, हाताला हालचाल करायला लावणारे, विचाराला कृतीची जोड देऊन, विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून,अध्ययन अध्यापनाकडे नेणारे उपक्रम खूप छान आहेत. एकूण पन्नास उपक्रम, त्यांची कृती, साहित्य व उपक्रमाचे फायदे यात क्रमबद्ध पद्धतीने या पुुस्तकात वाचता येतात. उपक्रमाचे प्रासंगिक छायाचित्रे उपक्रमाची महत्वपूर्णता सिद्ध करतात. लॅपटॉप चा शिक्षणात वापर
अक्षर बनवूया डाळींचे, संख्या क्रम लावूया
गुणवत्ता वाढवू या .
ओळखा पाहू काय माझ्या टपाल पेटीत माझे नाव.
ठोकळे जोडूया पक्षी बनवूया.
आवडती क्लिप पाहूया त्वरित वर्गात येऊया.
मुक्त वाचन कट्टा
शब्द दाखवूया माहिती देऊ या.
जत्रेला जाऊ या संख्या जिंकूया. आदी उपक्रम यात आहेत.हे उपक्रम सहज करता यावेत म्हणून त्यांनी खूपच सुटसुटीतपणे आणि एकाच पानावर कमी शब्दात जास्तीत जास्त आशयाची मांडणी असलेलं लेखन केलेलं आहे. त्यामध्ये उपक्रमा साठी लागणारे साहित्य त्याची कृती दिलेली आहे. संदर्भात त्यांनी आपल्या मनोगतात राजेंद्र वाघ यांनी आठवण लिहिलेली आहे. की जळगाव जिल्हा परिषदेने सुरु केलेल्या एक दिवस शाळेसाठी या उपक्रमांतर्गत विविध अधिकार्यांच्या पथकाने जेव्हा त्यांच्या शाळेला भेट दिली त्यावेळी त्यांच्या उपक्रमातील सहभाग कृती पाहून पथकात शिक्षण विभागातील अधिकारी आले होते आणि त्यांनी सूचित केले की तुम्ही केलेले उपक्रम शब्दबद्ध केले तर इतर शिक्षकांनी प्रेरणा मिळेल. या प्रेरक सुचनेतुन प्रेरित होत राजेंद्र भाऊराव वाघ ,या उपक्रमशिल आणि धडपड्या तरुण शिक्षकाने वर्गाच्या चार भिंतीत केलेले व युट्युब समाज माध्यमातून प्रसारित करण्यात आलेल्या उपक्रमांचे एक सुंदर पुस्तक 'माझे ज्ञानरचनावादी उपक्रम' प्रसिद्ध केले ही उल्लेखनीय बाब आहे. पुस्तक प्रकाशन पूर्वी त्यांनी शैक्षणिक विषयांवर अनेक लेख विविध वृत्तपत्रांमध्ये लिहिलेले आहेत . दैनिक लोकमत मधील कला संस्कृती, हॅलो डॉक्टर विज्ञान वार्ता,प्रतिबिंब, अर्थ,उदयोग वाणिज्य आणि धार्मिक आध्यात्मिक इ.सदरात शैक्षणिक, सामाजिक स्वरूप असे आहे असे ४२ लेख प्रसिध्द आहेत. लेख सदरात प्रसिध्द झाले होते.त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन २०१७ मध्येजि.प.आदर्श शिक्षक पुरस्कारासह, महात्मा फुले राष्ट्रीय पुरस्कार १६ डिसेंबर २०२०,राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ई - पुरस्कार २०२० त्यांना मिळाले आहेत. भविष्यात श्री राजेंद्र सरांनी आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या अभिव्यक्तीवर आधारित कृती व बालकवितांचे पुस्तक प्रकाशित करावे. 'माझे ज्ञानरचनावादी उपक्रम' हे पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल लेखक -श्री.राजेंद्र भाऊराव वाघ सरांचे हार्दिक अभिनंदन व आगामी काळात आंतरराष्ट्रीय ,राष्ट्रीय पातळीवर त्यांचा पुस्तकरुपी उपक्रम जावो हीच त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. 🌹🌹
____________________
✍️ एकनाथ लक्ष्मण गोफणे .
चाळीसगाव
8275725423
Kommentare