मानवा......
सायकल, रिक्षा ,
स्कूटर , कार, बससहीत
अवजड वाहनाचे काय नवल
तू विमानात बसून
गगन भरारी घेतलास,
थेट मंगळावर , चंद्रावर
जाऊन राहून आलास,
नाना प्रकारचे यंत्र आणि
यंत्रमानव ही बनवलास,
थ्री जी, फोर जी,
फाय जी पर्यंतही पोहचलास,
बुद्धीच्या बळावर
विज्ञानाच्या कक्षा रुंदावत
जे जे हवे होते तुला
ते ते हस्तगत केलास,
हे मानवा....!
तू अक्षरशः
भौतिक सोयी सुविधांचा
धो धो पाऊस पाडलास....
परंतु,
शोधू शकला नाहीस
निखळ आनंद,
मिळवू शकला नाहीस
माणूसकीची सनद,
विसरू शकला नाहीस
द्वेश, ईर्षा, राग,
भेद, लोभ, मत्सर,
येथेच अडलास...
तू आत्मिक समाधान
मिळवण्यात
कूठे तरी कमी पडलास...
©️®️
Comments