top of page
खोज करे
लेखक की तस्वीरEKNATH GOFANE

' माह्यी परदेस वारी' .एक दिलखुलास अनुभव

गोपाल शिरपूरकर यांची वऱ्हाडी बोलीतील
' माह्यी परदेस वारी' -एक दिलखुलास अनुभव

............................
राठी साहित्य मध्ये प्रवास वर्णन हा एक प्रकार आहे.या साहित्य प्रकारातून अनेकजण आपले फिरस्तीचे अनुभव, गंमती जमती,लोकजीवन संस्कृती, विनोद यांचा परिचय वाचकांना करुन देतात. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून रशियाच्या प्रवासाचे वर्णन केले आहे.सोबतच गो. चि. भाटे. गो.नी.दांडेकर,गंगाधर गाडगीळ ,प्र.के. अत्रे,पु.ल. देशपांडे व अनेक मान्यवरांच्या प्रवास वर्णन साहित्याने मराठी भाषा समृद्ध केली.हाच धागा पुढे नेत आपल्या वऱ्हाडी बोलीच्या जतन आणि संवर्धनासाठी गोपाल शिरपूरकर यांनी प्रवास वर्णनाचं काम करून खूप सुंदर पद्धतीने आपलं फिरणं आणि वाचकांनाही वाचनाच्या माध्यमातून फिरवून आणण्याचं कार्य ' माह्यी परदेस वारी' या पुस्तकाच्या माध्यमातून रंजकपणे केलं आहे.
या पुस्तकाचे सुंदर मुख्यपृष्ठ सुदर्शन बारापात्रे यांनी केलेलं आहे. सुशीला गायकवाड यांच्या या संवेदना प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे मूल्य 120 रुपये आहे.भटकंती करणाऱ्या सर्व पर्यटन प्रेरणे आई दादाजींना आणि भटक्या हाऊस मित्रांना त्यांनी समर्पित केलेलं असं हे प्रवास वर्णन आहे. ज्यामधून आपल्या बोलीतून हा सगळा भूगोल , सगळा परिसर निसर्ग आणि देश परदेश दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे .
पुस्तक वाचताना वाचक प्रवास करुन येतो. माह्यी दुबई वारी, दुबई आणि अबुधाबी या दोन देश - शहरांची गोष्ट आहे. त्यासोबत प्रवासाच्या घटनांचे वर्णन वऱ्हाडी बोली भाषेत खूप सुंदर पद्धतीने आहे.
'पुस्कळ दिवसा पासुन घरवालीची 'लंडन' पाहाची भुनभुन सुरु होती.' या वाक्याने ' माह्यी परदेस वारी' चा प्रारंभ होतो.
सामान्य माणसाचा परदेशासह स्वदेशातील भिडस्तपणा कमी करण्याचा प्रांजळप्रयत्न लेखकाने आपल्या लेखनातून केला आहे.
लेखकाने बायकोसोबत असलेल्या विमान प्रवासातील अनुभव, विमान टेक ऑफ, लॅन्डींग प्रसंगातून होणारी गंमतीची मांडणी उल्लेखनीय आहे.परदेशातील दोन देशांचं नऊ भागातील अप्रतिम वर्णन लेखकाच्या लेखनकौशल्याची महती सांगून जाते.
मोनेरेल, बस, वॉटरबोट चे अनुभव, बुर्ज अल अरब हे सेव्हन स्टार हॉटेल,थायलंड मधील धार्मिक परंपरा व इतर अनेक गोष्टींचे वर्णन वाचकांस खिळवून ठेवत पुढील वाचनासाठी आतुर करतो.एक गोष्ट दोन अलग अलग माणसाला विचारली म्हणजे डाऊट क्लिअर .असं लेखकाला वाटतं. थायलंड वारीची गंमत ते हळुवारपणे सांगतात .या पुस्तकांमधून लेखकाने प्रवासातील अनुभव मांडले आहेत. सोबतच प्रवास करतेवेळी काय काळजी घ्यावी, प्रवास खर्च कमी असण्याची गंमत, व प्रवासात कसं वागावं याचं मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे.'आपल्या देशात वावरु हिंडू शकतो तो आत्मविश्वास कायम ठेवा तुम्हाला मदत करायला लय हात पुढे येतात गरज आहे ते तुम्हाला हात पुढे करायची. आपलं सांग लय पर्यटक तिथे फिरायला येत असतात.
खूप सुंदर पद्धतीने पर्यटकांना माहिती देणारा आपल्या भाषेतलं आपल्या बोलीच्या जतन आणि संवर्धन केलं सोबतच मराठी साहित्यामध्ये आपल्या बोलीभाषेचे जतन संवर्धन केल्याबरोबर या बोलीभाषेतूनच ते फिरून आणतात .
स्वतः अध्यापक असलेल्या गोपाल शिरपूरकर यांनी ' माह्यी परदेस वारी' या पुस्तकाच्या माध्यमातून वऱ्हाडी बोली मधली जो सहजपणा,त्यातला रोखठोकपणा कायम ठेवत खूप सुंदर असं काम या वऱ्हाडी बोलीभाषेच्या प्रवासवर्णनपर साहित्यातून केलेलं आहे.' माह्यी परदेस वारी' .एक दिलखुलास अनुभव आहे.त्यांच्या लेखनाला हार्दिक शुभेच्छा.....

......
पुस्तक परिचय लेखन
एकनाथ ल.गोफणे.
चाळीसगाव
8275725423
15 दृश्य0 टिप्पणी

Comments


bottom of page