पुस्तक परिचय : -
'लोकनायक वसंंतराव नाईकसाहेब :-
महाराष्ट्रासह देशात विकासात्मक बदल घडवून आणणाऱ्या वसंतरावांच्या कार्याचा गौरव करणारे पुस्तक -
------------------
महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीमध्ये शेतीसह औद्योगिक क्रांती आणि एकूणच राज्यात विकासात्मक बदल घडवून आणण्यात तत्कालीन मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचे अमूल्य असे योगदान आहे . एक जुलै रोजी वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येते यानिमित्ताने महानायक वसंतराव नाईक यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडणारं
"लोकनायक वसंंतराव नाईकसाहेब" हे लेखक याडीकार पंजाब चव्हाण यांनी लिहिलेले पुस्तक प्रकाशित करण्यात आले .
लेखक 'याडीकार' पंजाब चव्हाण यांनी हे पुस्तक वसंतराव नाईक यांच्या वर्षा बंगल्यावर उत्कृष्ट स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या आपल्या वडीलांना - लालसिंग देवला चव्हाण यांना अर्पण केलं आहे .
संतोष घोंगडे यांचा आकर्षक असं मुखपृष्ठ आणि सुधीर प्रकाशन वर्धा यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं मूल्य तीनशे रुपये आहे .
लेखकाचे वडील व इतर नातेवाईक बराच काळ पुसद व मुंबई स्थित मुख्यमंत्री शासाकिय निवासस्थान 'वर्षा ' येथे कार्यरत होते. त्यांनी सांगितलेल्या वसंतरावांच्या आठवणीतून बहुजनांसाठी प्रेरणादायी पुस्तक लेखनाचे कार्य लेखकाने केले आहे .
एकूण ३९ भागात वसंतराव नाईक यांच्या प्रेरणादायी कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या कर्तृत्वाची व व्यक्तीमत्वाची उंची दाखविण्याचे कार्य या पुस्तकाच्या माध्यमातू करण्यात आले आहे .
पुस्तकात प्रारंभी घेतलेली तांडेलकार प्रा . रावजी राठोड यांची ' वसंतवारा ' ही कविता व जेष्ठ लेखक मधुकर भावे यांचा नाईक ? नव्हे ! महानायक हा लेख
वसंतरावांच्या कार्याला उजाळा देतो .
जेष्ठ साहित्यिक तथा शासनाचे माजी अव्वर सचिव राजाराम जाधव यांनी दिलेली समर्पक प्रस्तावना लेखनाचं महत्व अधोरेखित करते .
पुस्तकाच्या पाहिल्या प्रकरणात वसंतराव नाईकांचे वडील फुलसिंग नाईक यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या व प्रगतीच्या कार्याचा आढावा घेतला आहे .
पुसदचे नाईक घराणे व मांडवीचे लोकनेते बळीराम राठोड यांचा सामाजिक विकासाचा विचार व त्यातून वसंतराव नाईक यांची होणारी वैचारीक जडणघडण व राजकीय प्रगतीचा आलेख कसा उंचावत गेला होता . याची मांडणी करण्यात आली आहे .
वसंतराव नाईकांनी १९५२ ची निवडणुक प्रथमत: लढविली . यासाठी तमाम बहुजनांनी कशी आर्थिक मदत केली याचं वर्णन वाचतांना आजच्या काळातील पैसे घेऊन मतदान करण्याचे प्रकार हा विरोधाभास दिसून येतो .
जन्म आणि बालपण , नाईकसाहेबांचे शिक्षण , लग्न , वकिली व्यवसायाचा प्रारंभ , क्राँग्रेस पक्षातील प्रवेश , नगराध्यक्ष पदी निवड आमदार ते उपमंत्री यासोबत बंजारा समाजातील सामाजिक चळवळ संघटन , द्विभाषीक मुंबई राज्यातील मंत्रीमंडळातील कृषीमंत्री पदासह विविध पदांवर केलेलं काम समित्यांमध्ये मांडलेले मुद्दे आणि मुख्यमंत्रीपदी झालेले निवड या संदर्भातला संपूर्ण आढावा वाचकांना वसंतराव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करुन देतो .
वसंतरावांची दिवंगत कन्या अरुंधतीचा साहित्य व नाट्य अभिनय क्षेत्रातील कार्याचा परिचय या पुस्तकातून लेखक पंजाब चव्हाण यांनी करुन दिला आहे .
या पुस्तकातील आरक्षण संदर्भात वसंतराव नाईकांची भूमिका व विविध समितीची कामे यांचा लेखाजोखा मांडतांना लेखकाने विद्यमान स्थितीतील भटक्या
विमुक्त आरक्षणतील घुसखोरी बद्दल स्पष्ट व सडेतोड मत मांडले आहे .
मुख्यमंत्री पदावर विराजमान असूनही वसंतरावांच्या मनातील शेतकरी हा कायम तेथे विराजमान होता . आणि मुंबईत ज्याही वेळेस पाऊस पडायचा त्यावेळेस मुख्यमंत्री पेढे वाटायचे हा शेती व शेतकऱ्यांशी असलेला जिव्हाळा आणि कर्तव्यातील प्रामाणिकता यांचे दर्शन लेखकाने या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांना घडविले आहे .
वडीलांना दिलेला शब्द पाळला व पुसद ला उच्च शिक्षणाची सोय केली .
'तू एकलो शिकन प्रगती कररो छी . तो तार वांग गोरगरीबेर छिच्यापर शिकजायं तो सारी तांडेर झुपडा गायब हे जायं ' .
शैक्षणिक प्रगतीतच सामाजिक विकास दडलायं हे सांगणारे वसंतरावांचे वडील .
हा सारा प्रसंग व बंजारा भाषेतील बापलेकाचा संवाद- पुस्तकाची उंची वाढवितो .
पुस्तकातील इतर प्रकरणे
व वसंतरावांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील ऐतिहासिक क्रांतीकारी निर्णय व सर्व गोष्टी
महानायक वसंतराव नाईकांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू लेखकाने आपल्या लेखनातून मांडले आहे. या पुस्तकात
'नाईक साहेब तुम्हाला परत यावे
लागेल!' हा लेख वाचकांना अंतर्मुख करतो .
महाराष्ट्रासह देशात विकासात्मक बदल घडवून आणणाऱ्या वसंतरावांच्या कार्याचा गौरव करणारे - 'लोकनायक वसंंतराव नाईकसाहेब ' हे पुस्तक म्हणजे
वसंतराव नाईक यांच्या सामाजिक ,राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वाची महानायक लोकनायक अशी ओळख आहे . वाचकांना वसंतराव नाईकांच्या प्रेरणादायी कार्याची नवी ओळख करुन देण्याची लेखकाने केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे .
लेखक याडीकार पंजाब चव्हाण यांच्या लेखन कार्याला हार्दिक शुभेच्छा .
-----------
पुस्तक परिचय : -
-----------
एकनाथ लक्ष्मण गोफणे
📲8275725423
चाळीसगाव
Comments