top of page
खोज करे
लेखक की तस्वीरEKNATH GOFANE

लोकांंना जगवण्या सोबत राष्ट्रबांधणीचही कार्य महानायक वसंतराव नाईक यांनी केलंं.-

अपडेट करने की तारीख: 13 अग॰ 2023


लोकांंना जगवण्या सोबत राष्ट्रबांधणीचही कार्य महानायक वसंतराव नाईक यांनी केलंं.-तिसरे वसंतवादी साहित्य संमेलन संमेलनाध्यक्ष प्रा.जे.डी.जाधव .

---------------------------------------------

नागपूर येथील राष्ट्रभाषा कार्यालय, अंबाझरी रोड, वोक्हार्ट हॉस्पीटलच्या मागे, शंकर नगर चौकात गोर बंजारा साहित्य संघाच्या वतीने तिसरे वसंतवादी साहित्य संमेलन दि.१२ ऑगष्ट रोजी संमेलनाध्यक्ष प्रा.जे.डी.जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.



कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली.

यावेळी बोलतांना संमेलनाध्यक्ष प्रा.जे.डी.जाधव यांनी सांगितले की,

महाराष्ट्राच्या संदर्भात वसंतराव नाईक यांचे कार्य खूप महान आहे. लोकांंना जगवण्या सोबत राष्ट्रबांधणीचही कार्य महानायक वसंतराव नाईक यांनी केलंं.वसंतराव नाईक यांच्या बहुआयामी कर्तृत्वावर त्यांनी प्रकाश टाकत.महात्मा फुले यांच्या विचारांना खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचे कार्य सुद्धा महानायक वसंतरावजी नाईक यांनी केले आहे असे प्रतिपादन केले .आव्हान स्वीकारणं सोपं नसतं सडक बांधण्याचे कार्य करणारी माणसं मोठी असतात. आव्हान स्वीकारणे आणि त्या दिशेने जात आपली वाटचाल करणेे हे ध्येयवादी तरुणांचे काम असते. .प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्याची फळेे समाजाला मिळत असतात . १९७२ चा दुष्काळ हा निसर्गाचा होता. दुष्काळाला सामोरे जाण्याचा नेतृत्व वसंतराव नाईक यांनी केलं महाराष्ट्राला जगवण्याचा आणि सोबत राष्ट्रबांधणीचही कार्य वसंतराव नाईक यांनी केलंं. या देशात मोठ्या प्रमाणात लोकांना काम दिले. देशात लोहमार्गाचे जाळे मिळण्याचे कार्य सुद्धा लोकांना जगवण्यात आणि राष्ट्राला उपकरणाचा महान कार्य वसंतराव नाईक यांनी केलं.


लोहमार्गाचे जाळे विणण्यासह, शेतकरी, शेतमजूर यांच्यासह समाजाच्या उत्थानाचा विचार पुढे नेला. वसंतराव नाईक यांच्या काळातील आश्रम शाळेची योजना हे वरदान आहे.वसंतराव नाईक यांनी समाजाच्या उत्थानासह कृषी आणि आर्थिक दृष्टीने महाराष्ट्र कसं संपन्न होईल यासाठी प्रयत्न केलेले आहे. वसंतराव नाईक यांचे कार्य हे साता समुद्रापार पोहोचलेलं आहे .

महाराष्ट्राच्या महानायक वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या जड घडणीसाठी विचार केला आणि देशाने त्यांचा विचार स्वीकारला.

वसंतराव नाईक यांच्या धोरणाला राष्ट्रीय दृष्टी होते.

पंचायत राज व्यवस्थेचे राष्ट्रीय जनक लोकशाहीचे विकेंद्रीकरण

आपल्या भाषणात यावेळी त्यांनीसमाज बांधवांच्या उद्धार कार्याचे माहिती दिली. वसंतराव नाईकांचा कार्य हे पुस्तक रुपाने आहे. ती पुस्तक रूपातील माहिती इतर लोक सांगतात पण प्रत्यक्षात वसंतराव नाईक यांनी ज्या लोकांशी नाळ जोडली ती माहिती खूप लोकांना माहीत नाही. असं वसंतराव नाईकांचा जे अलिखित कार्य आहे ते समाजापुढे येण फार गरजेचे आहे.


वसंतराव नाईक हे प्रत्यक्ष जनतेत उतरुन त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या दृष्टीने समाजाच्या उद्धाराचा कार्य करणारे व्यक्तिमत्व होते.

वसंतराव नाईक यांची समाजाची जोडलेली नाळ हीच भूमिपुत्राचे देणं या पुस्तकाच्या जन्माची कथा आहे असे त्यांनी आपल्या या पुस्तकाच्या संदर्भात सांगितले. महान लोकांनी दिलेल्या वाटांवर चालून प्रगती करा

जर आपण ठेचा खातच राहिलो तर आपला अंगठा व पायाची बोटे कशी सुरक्षित राहणार.म्हणून समाजसुधारकांच्पया पहिल्या पिढीने खस्ता खाल्या त्यानुसार मार्गदर्शन घेत पुढे जाणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी साहित्यिकांनी वसंत विचार समाजत रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य जबाबदारीने केलं पाहिजे.साहित्य संघ सशक्त होणं आवश्यक आहे.यासाठी किमान सदस्यता शुल्क घेऊन साहित्य साहित्यिकांना जोडणं आणि समाजाच्या पुढे येणे गरजेचे आहे आपल्या 11 पानांचे अध्यक्षीय भाषणात डॅनियल राणा विचारमंचावर त्यांनी मराठीसह ,बंजारा गोरबोली भाषेमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनी मनोगत व्यक्त केलं.

प्रमुख अतिथी साहित्य संघाचे अध्यक्ष- नवलकिशोर राठोड [नामा नायक.] स्वागताध्यक्ष- श्रीकांत राठोड नागपूर चे नायक- आत्माराम चव्हाण ,नंदू पवार ,संजय महाराज यांचेसह संयोजक पृथ्वीराज चव्हाण

आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रथम सत्र- सुत्रसंचालन-होमसिंग पवार यांनी केले .

प्रथम परिसंवादात श्रीधर पालते यानीं नाईक साहेबांचे सामजिक कार्य

श्री.अशोक पवार यांनी नाईक साहेबांच्या सामाजिक विचारातील आजचा तांडा या विषयावर विचार मांडले.

दुपारच्या सत्रात हास्यकवि सुरेशभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली 'कवी संमेलन' संपन्न झाले. सामाजिक प्रबोधन ,विडंबन ,मार्मिक व चिंतनशील कवितांच्या वर्षावात रसिक चिंब भिजले.

या कविसंमेलनात

SRPF विभागत नागपूर. येथे कार्यरत सुमित राठोड यांनी

'त्याग' या शिर्षकाची

पोलिस कर्तव्य व जीवन या वर आधारित कविता सादर केली.

कवी-सुरेश राठोड 'महानायकाने केला निर्धार

व्हावा शेतकरी कारखानदार'

तांडा वाडीत येईल

वसंत बहार

काय गाऊ किर्ती तुझी

ही मराठी व

गोर कोरेन सायी वेगोरे भाया

बोल अनमोल सेनं केगोरे भाया

माथो पगडीप टेकन जरा देखो

राज आयं गोरुरो केगो रे भाया.

गोर समाजेम हेगो एक लाल

सेन कर दिनो मालामाल

समण घालो रे

भिया समण घालो रे .कांयी खेलरी आदी कविता आपल्या अनोख्या शैलीत सादर केल्या.

कवी -एन .डी.राठोड. यांनी

गाढवाचे कवी संमेलन

कवी श्रावण यांनी

नायकेरो गोरुन केणू रं

एकीती रेणू रं

नैतारो समाजेन केणू रं

एकीती रेणू रं.

नाईक साहेबांना अपेक्षित समाजाची निर्मिती....बाबत काव्य सादर केले.

कवी-उदलभाऊ ...यांनी

समाजेम परिवर्तन लावा

कोनी ला हाम हुंडा..ही कविता सादर केली.

डॉ.शांतीलाल चव्हाण यांनी आपल्या

'तांडा' कवितेतून

आम्ही वाचतोय आमचा इतिहास

तेंव्ह

परिवर्तनाची पाने फाडफाड बोलू लागतात

आमच्या कथा आणि कविता तांड्याचे दु:ख सांगू लागते ही

परिवर्तनाचा प्रकाश देणारी कविता सादर केली.


कवी -राहूल पालतिया...यांंनी सेवालाल वाचेस ही कविता तर

होमसिंग पवार...कांयी फरक छेनी

या कवितेतून मुलगा मुलगी भेद करु नका हा संदेश दिला.

चित्रकार कवी -सूरेश राठोड 'भिवापूर

वैगळा मार्ग नको धरु ही पारिवारिक वाद संपुष्टात आणणारी रचना सादर केली .विशेष पवार-यांनीही आपली रचना सादर केली .

समरोपीय सत्र यावेळी पत्रकार मनोहर चव्हाण यांनी गोर बंजारा साहित्य संघाच्या कार्याचा आढावा सादर करुन ,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आगामी समेलानांच्या आयोजनाची माहिती दिली.

एकंदरीत १२ ऑगष्ट २०२३ हा दिवस समाजबांंधवांचे वैचारिक प्रबोधन करणारा ठरला.पत्रकार मनोहर चव्हाण व गोर बंजारा साहित्य संघाच्या कार्यास हार्दिक शुभेच्छा ........

-------------------------------------------

लेख-एकनाथ गोफणेे



242 दृश्य2 टिप्पणियां

2 Comments


EKNATH GOFANE
EKNATH GOFANE
Mar 08

धन्यवाद🙏🌹

Like

rathodsravan21
Aug 13, 2023

खुब आछो तमार वसंतवादी साहित्य सम्मेलन । चकेन मार जै सेवालाल श्रावण राठौड़ लेखक उटनुर आदिलाबाद तेलंगाना भारत

Like
bottom of page