वसंतराव नाईकांच्या कार्याचा गौरव करणारा विशेषांक -
----------------------
महानायक वसंतरावजी नाईक यांच्या 111 व्या जयंतीनिमित्त विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे .
यामध्ये पाच भाषांमध्ये हा विशेषांक प्रकाशित होणार आहे . आणि महानायक वसंतराव नाईक साहेबांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मिळून देण्याकरिता 12 लाख प्रति लक्ष ग्रिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी संपादक श्रावण राठोड हे धडपडत आहेत .
संपादक श्रावण राठोड या युवा नेतृत्वाची धडपड वाखाणण्याजोगी आहे .
या निमित्ताने श्रावण राठोड यांनी
वसंतराव नाईक यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त प्रकाशित केलेल्या विशेषांकाचा हा परिचय :-
👇
वसंतराव नाईकांच्या कार्याचा गौरव करणारा विशेषांक -2018
----------------------
वसंतराव नाईक ,महाराष्ट्राच्या राजकीय ,सामाजिक जीवनाला गती देणारे एक प्रभावी नेतृत्व .
महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कर्तव्याच्या जोरावर
कृषी क्षेत्राचा औद्योगिक क्रांती घडवून आणण्यात त्यांचं अमलाग्र असे योगदान आहे .महानायक वसंतराव नाईक यांच्या कार्याचा आढावा घेणारी पुरेशा प्रमाणात साहित्य संपदा नाही . ही खंत मनात बाळगून लातूर येथील श्रावण राठोड यांनी महानायक वसंतराव नाईक यांच्या कार्याविषयी माहिती देणाऱ्या समग्र लेखांचा त्यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या कवितांचा एक साहित्यरुपी ठेवा प्रकाशित करावा ही इच्छा मनात बाळगून वसंतरावजी नाईक यांच्या 105 व्या जयंती निमित्त त्यांनी सन 2018 मध्ये ' वसंतराव नाईक विशेषांक -2018 '
प्रकाशित केला या विशेषांका मध्ये प्रा . ग .ह राठोड .
कॉम्रेड उल्हास राठोड , कवी अरुण पवार ,अमरसिंग राठोड , पंजाब चव्हाण , प्रेमचंद राठोड ॲड . टी . एन . कांबळे, . रवी जनार्दन राठोड ,डॉ सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी ,डॉ . दिलीप लालू बंजारा .
कवी एन . डी . राठोड ( अहमदपूर ) कवी . सुरेश राठोड (काटोल )
आदींनी महानायक वसंतरावजी नाईक यांच्या कार्याबद्दल लिहिलेल्या लेख आणि कवितांचा हा विशेषांक प्रकाशित केला आहे .
या अंकात लिहिणाऱ्या सर्वच लेखक कवींनी महानायक वसंतराव नाईक यांच्या ज्ञात अज्ञात कार्याबद्दल , त्यांच्या मानवतेबद्दल ,त्यांच्यातल्या माणूसपणाबद्दल त्यांच्यातल्या नेतृत्व गुणाबद्दल ,त्यांच्यातल्या कर्तृत्वाबद्दल सखोल चिंतन केलेलं आहे .
प्राध्यापक गृह राठोड यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक या शीर्षकाचा लेख लिहिलेला आहे .
ते आपल्या लेखात म्हणतात की नाईक साहेबांनी जात-पात पक्ष धर्म वगैरेच्या सर्व भिंती ओलांडून महाराष्ट्राचा न भूतो न भविष्यती असं महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवला आहे . महाराष्ट्रावर आलेल्या अनेक मोठे मोठे संकटांवर सर्वांना सोबत घेऊन कोणाचीही मन न दुखविता त्यांनी मात केली आणि सर्वांगीण विकास घडवून आणलेला आहे .
शेतकऱ्याचा मुलगा पुढे अकरा वर्षापेक्षा जास्त काळ महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री राहून अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने भेदभाव पक्षपात न करता सर्व जनतेची सेवा करून सर्वांचा हृदय सम्राट होऊन गेला .
असं मत राठोड यांनी आपल्या लेखांमध्ये व्यक्त केलेलं आहे .
कॉम्रेड उल्हास राठोड मुंबई यांनी आपल्या 'पंचायत तांडा सिस्टम म्हणजेच पंचायत राज 'या लेखांमध्ये म्हणतात की माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे बंजारा समाजासह भटके विमुक्त आणि सर्वच बहुजनांच्या विकासासाठी कृतिशील होते .
बंजारा समाजातील चांडाळ पंचायत नाईक साहेबांनी महाराष्ट्रभर व पुढे देशभर कशी लागू केली याविषयी त्यांनी या लेखामध्ये मांडलेलं आहे .
या विशेषांकामध्ये
कवी अरुण पवार यांची 'वीरा' ही कविता सामाजिक संस्कृती रक्षण ,एकतेची गरज व परिवर्तनाचा संदेश देते .
गोर बंजारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमरसिंग राठोड यांनी वसंतराव नाईक हरितक्रांतीचे प्रणेते व कृषी औद्योगिक क्रांतीचे जनक या आपल्या लेखातून वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीपथाचा रथ निर्माण करणारे
महानायक असा उल्लेख केला आहे .
याडीकर पंजाब चव्हाण यांनी 'नाईक साहेब तुम्हाला परत यावेच लागेल . . . ! '
या आपल्या लेखातून
वसंतरावजी नाईक यांच्या समग्र कार्याचा आढावा घेतलेला आहे .
समाजाची आजची परिस्थिती ही भयानक आहे आणि ती परिस्थिती सुधारण्यासाठी नाईक साहेब तुम्हाला परत यावेच लागेल . अशी आपल्या मनातील व्यथा याडीकार पंजाबराव चव्हाण यांनी आपल्या लेखाद्वारे मांडलेली आहे .
कवी प्रेमचंद राठोड यांनी ' वसंत रावेरो हेतोतो '
या बंजारा बोली भाषेतील कवितेतून वसंतराव नाईक यांचा गोरगरिबांना कसा आधार होता त्यांच्यामुळे काय काय बदल झाले याविषयी मांडणी केली आहे .
लातूर जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ॲड . टी .एन .कांबळे यांनी 'वसंतराव नाईक हे शेतकरी कष्टकरी गरिबांसाठी वरदान 'या शीर्षकाचा लेख लिहून वसंतराव नाईकांच्या काळातील समग्र कार्याचा आढावा घेतला आहे .
मा . वसंतराव नाईक हे ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५ या कालावधीत ४४६४ दिवसाचा प्रदीर्घकाळ मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या राजपथावर चालत राहिले .शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या गरिबांच्या जीवनात हरित व धवल क्रांती घडवून आणणारे मुख्यमंत्री व नेते हे शेतकऱ्यांना व गरिबांना वरदान ठरले .
असा समग्र आढावा श्री . कांबळे यांनी आपल्या लेखामध्ये घेतलेला आहे .
जनतारा रवी जनार्दन राठोड पुणे यांनी एक जुलै कृषी दिन या शीर्षकाचा लेख लिहून महानायक वसंतराव नाईक यांच्या एकूणच कारकिर्दीचा आढावा घेतलेला आहे .आपल्या लेखात ते म्हणतात , 'महाराष्ट्राची सेवा हाच माझा धर्म महाराष्ट्र मोठा व्हावा येथील शेतकरी संपन्न व्हावा हीच माझी इच्छा आहे ' असे म्हणणाऱ्या महान नेत्याचा जन्मदिवस एक जुलै कृषी दिन म्हणून साजरा केला जातो .
कवी प्रेमचंद राठोड यांनी आपल्या गोरबोली बंजारा भाषेतील 'मारो नायका रे ' या कवितेच्या माध्यमातून वसंतराव नाईक यांच्या एकूणच कार्याचा आढावा घेतला आणि 'असा हिरा माणूस कधी येईल जन्माला ' असा विचार मांडला आहे .
डॉ . दिलीप लालू बंजारा यांनी 'हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक आणि बंजारा समाजाचा आत्मा ' .
या आपल्या लेखांमध्ये वसंतरावजी नाईक यांच्या गहुली या गावातील वास्तव्यापासून तर त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला आहे . ते ते आपल्या लेखात म्हणतात असा नेता महाराष्ट्राच्या अध्वर्युपदावर एवढी वर्ष राहिला आणि त्याच्या वर्तमान व भविष्याची वाट त्याने प्रशस्त केली यासाठी त्या नेत्याला अभिवादन .
अहमदपूर येथील कवी एन .डी . राठोड यांनी 'बहुजनांचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक ' .या शीर्षकाचा लेख लिहिला आहे ते आपले लेखात म्हणतात , 'मला या गोष्टीचे आश्चर्य वाटतं की साठ वर्षांपूर्वी पुसद तालुक्यातील गवली सारख्या अतिदुर्ग दर्या खोऱ्याच्या ठिकाणी अशिक्षित कुटुंबात जन्म घेतलेल्या मुलाने महाराष्ट्राच्या राज्य पटलावर व मध्यप्रदेशच्या भूमीवर अठरा वर्ष राज्य गाजवलं ही महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील अनन्यसाधारण व सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखी घटना आहे ' .
वसंतराव नाईकांची विचारधाराच शेतकऱ्यांशी जोडली गेलेली होती असं राठोड यांनी आपले लेखामध्ये मांडलेलं आहे .
कवी - सुरेश राठोड यांच्या
' नायकी करुचू ' या शिर्षकाच्या
कवितेतून वसंतराव नाईक यांच्या समाज विकासाच्या कार्याचा आढावा घेतलेला आहे .
कवी म्हणतो ,
'वसंतराव नाईक वेत्तो कवडा
लोक कचं आभाळे आवडा
ओ आभाळेन जान भिडुचू
मारे नायकेरी नायकी करु चू . . '
या विशेषांका मध्ये कवी एन .डी राठोड यांची लोकशाही ' असत्य आणि गोरमाटी रो छोरा
या कविता प्रकाशित करण्यात आलेले आहेत संपादक श्रावण राठोड यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा विशेषांक प्रकाशित करून समाजामध्ये वाचन चळवळीला रुजवण्याचं अनमोल असं कार्य केलेला आहे सोबतचमहानायक वसंतरावजी नाईक यांच्या संदर्भातील साहित्यकृती प्रकाशित करण्याचं कौतुकास्पद कार्य केलेल आहे . 2024 मध्ये प्रकाशित होणाऱ्या या विशेषांक मध्ये सुद्धा महानायक वसंतरावजी नाईक यांच्या समग्र कार्यावर आधारित विविध मान्यवर लेखकांनी लिहिलेले लेख व कवींच्या कविता वाचायला मिळणार आहेत .
महानायक वसंतराव नाईक साहेबांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मिळून देण्याकरिता 12 लाख प्रतींचं लक्ष ठेवून ग्रिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी संपादक श्रावण राठोड धडपडत आहेत .
त्यांच्या या धडपडीला सर्व समाजबांधवांनी सहकार्य करावे .
असे आवाहन मी .https://www.gorbolibanjararadio.com तर्फे रसिक व वाचकांना पुस्तकप्रेमी मंडळींन करीत आहे .
२०२४ मध्ये प्रकाशित होणाऱ्या
या अंकाची नोंदणी जास्तीत जास्त वाचकांनी करावी .
---- धन्यवाद---------
✍️ एकनाथ ल . गोफणे
संचालक - निवेदक
गोरबोली रेडीओ - स्वच्छंदी भरारी .
留言