वसंतराव नाईक यांचं वेगळं पण सांगणारं नाटक :- 'तो एक समुद्रपक्षी'.
---------------------------------------------
नागपूर येथील साहित्यिक प्रा. डॉ. गणेश चव्हाण यांनी आपल्या विविध साहित्य कृतीतून मराठी आणि बंजारा गोरबोली साहित्य क्षेत्रात अतुलनीय अशी कामगिरी केलेली आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या चरित्रावर आधारित दोन अंकी ' तो एक समुद्रपक्षी' हे नाटक लिहून मराठी साहित्य मध्ये मोलाची भर घातलेली आहे. या पुस्तकाची प्रथम आवृत्ती वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनी 18 ऑगस्ट 2019 रोजी प्रकाशित झालेलं हे पुस्तक आहे.या नाट्यसंहितेला
महाराष्ट्र राज्य रंगभूमी आणि प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणात आहे.
वसंतराव नाईक यांचं, वेगळंपण सांगणार हे नाटक आहे . वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सव्वा अकरा वर्ष विराजमान होते.५ डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 हा दीर्घकाळ या नाटकाची जमेची बाजू आहे. प्रा. डॉ .गणेश चव्हाण यांनी नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून वसंतराव नाईक यांचा वेगळंपण ,समग्र जीवनपटाचे पैलू ,त्यांची सामाजिक , विकासाची तळमळ हे दोन अंकी चरित्र नाटकाच्या माध्यमातून सांगण्याचा जो विचार केला तो खरोखरच अभिनंदनीय आहे .ही नाट्यसंहिता 'राघव पब्लिशर्स अँड डिस्ट्रीब्युटर्स नागपूर यांनी प्रकाशित केली असून ४४पृष्ठ संख्येच्या या नाट्यकृतीची किंमत ७० ₹ आहे .
या नाटकातील सर्व पात्रांची रेखीवता व उत्सुकता वाढवणारे विविध प्रसंग कुठेही पाल्हाळीकता न येणारे अप्रतिम कथानक आणि यासोबत नाटकाचा काळ प्रसंगातील वेळ आणि प्रसंगानुरुप होणारी वातावरण निर्मिती आणि लयबद्धता हे लेखन कौशल्य लेखकाने अप्रतिमपणे हाताळलेले आहे. एका तपाकडे जाणारा मोठा काळ ही नाटकाची जमेची बाजू आहे. प्रत्येक पात्राची निर्मिती ही अप्रतिमपणे लेखकाने केलेली आहे .या नाटकाचा पहिला अंक मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान 'वर्षा बंगला' येथून सुरु होतो.पडदा उघडल्यावर मुख्यमंत्री पदी विराजमान असलेले वसंतराव नाईक हे फाईल चाळत असल्याचे प्रेक्षकांना ,वाचकांना दिसतात. त्यांचा स्वीय सहाय्यक विलास आणि वसंतराव यांच्यातील संवादाने .पी.ए विलासला वसंतराव 'काका' म्हणायला लावून त्याला घरचाच माणूस समजण्याचा विचार ,समाजाला आपला मानण्याची भूमिका मांडतो .वर्षा बंगला बंगल्यातून महाराष्ट्र व भटक्या विमुक्तांना मुलगामी मार्गदर्शन ,बंजारांची देशभक्ती ,वसंतराव नाईक यांनी आश्रम शाळांची निर्मिती करुन शिक्षणाची केलेली सुविधा . या संदर्भातील संवाद लेखकाचे कौशल्य अधोरेखित करते.
आधुनिकतेच्या व परिवर्तन, स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा, संयुक्त महाराष्ट्राची अखंडता. आणि मराठी भाषा आदी विषय. विदर्भाला स्वतंत्र होण्यात नव्हे तर महाराष्ट्रात राहणं आर्थिक दृष्टीने हिताच आणि फायद्याचा आहे हा मुद्दा व इतर बाबी लेखकाने सुरेख पद्धतीने मांडलेले आहेत.नाटकामधील विविध प्रसंगांमध्ये तांड्यातील दोन पात्र लेखकाने या ठिकाणी घेतलेले आहे .'शकुंतला' ही तांड्यातील एक सामाजिक कार्यकर्ती महिला व 'अण्णा' हा तांड्यातला एक शेतकरी कार्यकर्ता या नाटकाच्या माध्यमातून भेटत असतो. 'शकुंतला आणि वत्सला' या दोन पात्रांमधील संवाद हा परिवर्तनाचा आहे. सोबतच सामाजिक तळमळीचा चळवळीचा आहे.स्त्री मनाची एक व्यथा आहे. आधुनिक जगाशी जोडलं जाणं या गोष्टी अधोरेखित करते .वसंतराव नाईकांनी ,मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत असताना, एक कुशल प्रशासक आणि उत्तम नियोजक या भूमिकेतून कार्य केलं .आलेल्या कठीण प्रसंगांना त्यांनी कशा पद्धतीने तोंड दिले हे वेगवेगळ्या प्रसंगातून या नाटकामध्ये दिसून येतात.वसंतराव नाईकांनी माणुसकीचा जो जिवंत झरा उभा केलेला आहे तीच जादू आहे असं विलास या पात्राच्या तोंडच वाक्य देऊन लेखक वाचकांना विचार करायला भाग पाडतो.वसंतराव नाईक यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मुख्यमंत्री पदाच्या घडामोडींवर या नाटकाच्या माध्यमातून प्रकाश टाकलेला आहेविदर्भवादी नेता हनुमंतराव यांच्या आईच्या आजारपणातील प्रसंग हा विरोधकांना आपलंसं करण्याची आणि माणुसकीची एक नवी चेतना निर्माण करतो.वसंत आणि वत्सला यांच्या संवादाचा प्रसंग फारच अप्रतिमपणे लेखकांनी रेखाटलेला आहे .दुष्काळाच्या काळातील वसंतराव नाईक यांचे भाषण, अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण करायचा कृतिशील विचार. हे भाषण प्रत्येकाच्या मनात कार्य तत्परता ,जागृती आणि समाजाप्रती संवेदना व्यक्त करते.
पहिल्या अंकामध्ये वसंतरावांचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाच्या पर्यंतचा कालखंड खूप सुंदर पद्धतीने रेखाटलेला आहे शकुंतला आणि वत्सला यांच्या संवादाचे प्रसंग सुद्धा भावुक करुन जातात.या नाटकाच्या दुसऱ्या अंकाची सुरुवात सुद्धा 'वर्षा' बंगला येथूनच होते.अण्णा आणि विलास यांच्या संवादातून वसंतराव नाईक यांच्या कार्य तत्परतेची आणि सोबतच राहणीमाना संदर्भातील गोष्ट अप्रतिम आहे .या दुसऱ्या अंकात शेती संदर्भातील बहुमोल गोष्टी वसंतराव बोलून जातात आणि सोबतच आपल्या परिवाराच्या आणि बंधू प्रेमाच्या गोष्टी सुद्धा सहजपणे सांगून जातात. दुसरे प्रसंगात लेखकाने शकुंतला आणि वत्सला यांच्या संवादातून वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळातील महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या निर्मितीच्या संदर्भातील गोष्ट सुंदर पद्धतीने मांडलेली आहे. या प्रसंगातून रोजगार हमी योजना ही कशा पद्धतीने महाराष्ट्रात रुजली हे सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे.दुसऱ्या प्रसंगातील नाशिक येथील काँग्रेस पक्षाच्या प्रदेश शिबिरातील वसंतराव नाईक यांच्या भाषणातून देशातील आणि महाराष्ट्रातील गरीबी नष्ट करण्यासाठी आणि देशाची संपत्ती वाढण्यासाठी काय करता येईल या संदर्भातील स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे.लोकशाही विकेंद्रीकरण संदर्भातील वसंतरावांचे कार्य विरोधकांना मित्र बनवून सामाजिक विकासासाठी सोबत ही कल्पक वृत्ती ,वसंतराव नाईकांच्या कार्याचा लेखाजोखा या नाटकाच्या माध्यमातून मांडलेला आहे. वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध विकास कामांच्या संदर्भातील संवादातून हे नाटक कुठेही न रेंगाळत पुढे जातात आणि एक उत्सुकता आणि उत्कंठतावर्धक असं नाटक वाचकांना आणि रसिकांना भावतं. वसंतराव नाईक यांनी पंढरपूरच्या आषाढी एकादशीची शासकीय महापूजा सुरु करण्यासंदर्भातले केलेले प्रयत्न,पत्रकार अत्रे यांचा प्रसंग असो किंवा मुख्यमंत्र्यांचा राजीनामा दिल्यानंतरचं भाषण .हे खरोखरच सुंदर पद्धतीने गुंफण करुन या नाटकाची निर्मिती केलेली आहे .लेखक प्रा.डॉ. गणेश चव्हाण यांनी कुणबी ,मराठा सह बहुजनांचं व भटक्या विमुक्तांचा संघटन , सेवा हे व्रत ,शीलवान बनण्याचा सल्ला, शिक्षण घेण्याच्या ध्यास ,आणि शिक्षणातूनच होणारा विकास आणि समाजाची प्रगती हा सल्ला देत समाजातील महापुरुषांच्या विचारांची रुजवणूक सुद्धा केलेली आहे.'मनानं निर्मळ आणि वाचेनं रसाळ रहा म्हणजे विरोधकही तुमच्यापुढे मान झुकवतील कटू शब्द वापरु नका, तुम्ही नम्रतेने जगाला जिंकाल.अशा स्वरूपाचा वसंतराव नाईक यांचा आशीर्वाद रुपी संवाद देत या नाटकाचा पडदा पडतो. नाटकातील अण्णा या पात्राच्या संवादातील विविध प्रसंगी आलेला 'याडी पांडुरंग' व विलास च्या संवादातील 'डॅडी पांडुरंग' हे शब्द नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेतात.
'रिचर्ड बाक' यांच्या जोनाथन या समुद्र पक्षाच्या कथेशी जवळीक साधणारं 'तो एक समुद्र पक्षी' हे नाटक लेखक प्रा.डॉ. गणेश चव्हाण यांनी लिहून 'वेगळे काहीतरी करण्याची धडपड असलेला आणि इतरांना प्रेरणा देणारा नेता म्हणून वसंतराव नाईक यांचं कार्य समाजाला दिशादर्शक कसे ठरेल हे दाखवण्यासाठी लिहिलेलं हे नाटक ,मराठी साहित्यातील एक अप्रतिम अशी कलाकृती आहे .लेखक प्रा.डॉ. गणेश चव्हाण यांच्या लेखन कार्याला gorbolibanjararadio.com तर्फे हार्दिक शुभेच्छा...🌹🌹
✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍
पुस्तक परिचय लेखन:-एकनाथ गोफणे.
( पुस्तक परिचय वाचून खाली दिलेल्या चौकटीत आपली प्रतिक्रिया नोंदवा.धन्यवाद🙏🌹)
Comments