विविधांगी साहित्याचं अंतरंग उलगडणारा समिक्षा ग्रंथ - अक्षरायण .
बालपणात शिकत असताना , चौथीपासून जडलेला वाचनाचा छंद , त्यातून मिळालेला आनंद . सकारात्मकता व डोळसपणा वाढीस लागला . जो जीवनाचा अविभाज्य अंक बनला . वाचन चितनातून लेखनाकडे सुरु झालेला प्रवास .प्रकाशित लेखनाबद्दल वाचकांच्या आलेल्या प्रतिक्रिया व त्याच विश्वासातून एका वर्षात सत्तर पुस्तके वाचून त्यावर व्यक्त होण्याची कला हा प्रा. व्यंकटेश सोळंके यांचा लेखन प्रवास त्यांना 'विविधांगी साहित्याचं अंतरंग उलगडणारा समिक्षा ग्रंथ - अक्षरायण ' या संग्रहाची निर्मिती करण्याकडे घेऊन गेला.
गणगोत प्रकाशनातर्फे ऑगस्ट २० २१ मध्ये 'अक्षरायण ' हा समिक्षा ग्रंथ नांदेड येथील
कवी लेखक प्रा . व्यंकटेश सोळंके यांनी विविधांगी साहित्यकृतीचं विश्लेषण करत त्यावर आधारित भाष्य आपल्या समिक्षा ग्रंथात करुन वाचकांना विविध साहित्य वाचनाकडे घेऊन जाणारा मार्ग दाखविला . एक सक्षम समिक्षा लेखक म्हणून प्रा. व्यंकटेश सोळंके साहित्य क्षेत्रात आपल्या कार्याचा शब्दठसा उमटवित आहे .
सर्व स्वप्नांचा त्याग करून अनेक संकटांना एकाकी झुंज देत , जन्मभर हाल अपेष्टा भोगत लेखकाचं अस्तीत्व तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या 'आईतल्या बापाला ' हा समिक्षा संग्रह त्यांनी अर्पण केला आहे .
या संग्रहात एकोणवीस साहित्यकृतीवरील समिक्षा शब्दबद्ध केला आहे .
गणगोत प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या या समीक्षा संग्रहाचे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी समर्पक रेखाटले आहे .
बाबू बिराजदार यांच्या 'माती खालचे पाय ' या कादंबरी संदर्भात 'सामाजिक व मानसिक द्वंदाचा सिद्धांत ' या शिर्षकाच्या माध्यमातून साहित्यकृतीचा एकंदरीत अंतरंग उघडताना लेखकाने ही कादंबरी वाचकांमध्ये सामाजिक व मानसिक ध्वजाचा सिद्धांत कशी वाटायला लागते महाभारताचा संदर्भ याला कसा लागतो . याबाबत समर्पक भाष्य केले आहे .
या समिक्षा ग्रंथाचं एक वेगळपण म्हणजे एका ठराविक साहित्य प्रकारावर लक्ष केंद्रित न करता कथा संग्रह , काव्य संग्रह , कादंबरी , बालकाव्यसंग्रह , आत्मकथन या प्रकारातील एकोणाविस विविधांगी साहित्य कलाकृतीवर भाष्य केलेले आहे. प्रा. व्यंकटेश सोळंके यांच्यात दडलेला चोखंदळ
रसिक वाचक या माध्यमातून समिक्षा लेखक म्हपुढे आला आहे .
बाबू बिरादार, देविदास फुलारी, मनोज बोरगावकर , कै.प्रदीप धोंडीबा पाटील , भरत माने व प्र.श्री.जाधव या लेखकांच्या मातीखालचे पाय, पाच आऱ्याचे चाक , नदीष्ट, गावकळा , पांढरकवड्या, भरतायन, बाल कादंबरी गोंदू यांचा समावेश आहे. विशेष उल्लेखनिय म्हणजे
या कादंबऱ्या विविध विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सामाविष्ट आहेत. मांगीलाल राठोड, यांचा
मुनादी या काव्यसंग्रहासह,अर्चना डावखरे शिंदे, यांच्या
अधांतरीचे प्रश्न, संतोष अळंजकर यांची
मातीतल्या कविता,
लक्ष्मण मलगीलवार ऋतूगंध,
नामदेव कोळी, लिखित काळोखाच्या कविता, अमृत तेलंग यांचा पुन्हा फुटतो भादवा , विरभद्र मिरेवाड यांचा माती शाबूत रहावी म्हणून व उद्धव सोनकांबळे यांचा सूर्यपंख यासह बालसाहित्यिक डॉ. सुरेश सावंत, एकनाथ ढुमणे यांच्या अनुक्रमे युद्ध नको बुद्ध हवा व थेंबफुले बालकवीता संग्रह यासह कवी सु.द. घाटे व लक्ष्मी पुरमशेटीवाड यांच्या कथासंग्रहाचा समावेश आहे. .या साहित्यकृतीची अतुलनिय ओळख श्री. सोळंके सरांनी करुन दिली आहे .
या पुस्तकांमध्ये गणगोत प्रकाशन ,दिलीपराज , राजहंस ' ग्रंथली ,गाव प्रकाशन , सुविधा प्रकाशन ,अक्षरवाङ्मय ,
तेजश्री प्रकाशन , सूर्यमुद्रा ,दर्या प्रकाशन ,निर्मल प्रकाशन वर्णमुद्रा प्रकाशन आदी प्रकाशन संस्थांतर्फे प्रकाशित साहित्यकृतींचा समावेश आहे .
हा समिक्षा ग्रंथ अभ्यासकांना पण उपयुक्त ठरेल . समिक्षा लेखनातील प्रभावीपण वाचकांना यात समाविष्ठ साहित्यकृती वाचण्यास प्रेरीत करेल असा आशावाद व्यक्त होतो . लेखक या समीक्षा ग्रंथाच्या माध्यमातून साहित्यकृतीची फक्त ओळखच करुन देत नाही तर त्यावर सुस्पष्ट स्वरूपात भाष्य लिहितात .त्यामुळे लिहित्या हातांना बळ मिळते . या समिक्षा संग्रहाच्या माध्यमातून साहित्याचं सौंदर्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे सोबत साहित्य संस्कृतीची ओळख समाजाला करुन देण्याचे कार्य केले आहे .
विविधांगी साहित्याचं अंतरंग उलगडणारा १२८ पृष्ठे असलेला २७० रुपये मूल्य असलेला अक्षरायण हा समिक्षा ग्रंथ साहित्य वाटेचा मित्र असल्याची भावना या निमित्ताने व्यक्त होते. खान्देशी व गोरबोली रेडीओवर 'अक्षरायणाचे १९ अंतरंग ' या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा समिक्षा ग्रंथ देशविदेशातील अनेक साहित्य रसिकांपर्यंत पोहोचलेला आहे .
व्यंकटेश सोळंके यांच्या भावी लेखनासाठी मनपूर्वक शुभेच्छा..
___________________
✍️ एकनाथ लक्ष्मण गोफणे
चाळीसगाव
८२७५७२५४२३
धन्यवाद 🙏🌹
श्री एकनाथ गोफणे सरांनी चांगल्या समीक्षा ग्रंथाची दखल घेतली आहे. खूपखूप अभिनंदन..! छान परीचयात्मक समीक्षण केले आहे. समीक्षाग्रंथाचीही समीक्षा झाली पाहिजे, पण चांगले समीक्षक कानाडोळा करतात ही उपेक्षा भाषाव्यवहारात होता कामा नये, निकोपवृत्ती असावी. संपादकांनीही नवोदितांच्या समीक्षेला स्थान द्यायला हवे.