पुस्तक परिचय .
शेषराव जाधव यांचा अभिव्यक्ती संपन्न हिंदी काव्यसंग्रह 'कविता ए जिंदगी '
____________________
काव्य लेखनालाच आपल्या जीवनाचं सूत्र मानून त्याप्रमाणे वाटचाल करीत सुखदुःख मांडत आव्हानांचा स्वीकार करीत , संघर्ष करीत अविरत वाटचाल करणारे , जीवन जगणारे व कवितेलाच जगण्याची प्रेरणा मानणारे लोहा जि. नांदेड येथील कवी शेषराव जाधव यांचा 'दमाळ प्रकाशन -चंद्रपूर तर्फे 88 कवितांचा हिंदी काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे .
ज्येष्ठ साहित्यिक याडीकार पंजाब चव्हाण यांची प्रस्तावना या काव्यसंग्रहाला लाभलेली आहे .
कवीने आपल्या जीवनाच्या आठवणी , सुखदुःख ,संघर्ष हे मांडलेलं आहे . आपल्या या हिंदी काव्यसंग्रहात शेषराव जाधव यांनी मराठी साहित्यातही योगदान दिलेलं आहे .मराठी साहित्यात त्यांचा 'आला आला माझा घोडा ' हा बालकाव्यसंग्रह प्रकाशित आहे .
कवीने आपल्या या हिंदी काव्यसंग्रहातून मानवी
जीवनासह ,समाजाच्या सर्व स्तरातील विषय हाताळलेले आहे .
' अब चूप न रहेंगे हम ' या शीर्षकाच्या कवितेतून कवी क्रांतीची भावना मनात जागृत करतो .
शेतकरी ,कष्टकरी ,नातेसंबंधांमधील भावभावना यासोबत प्रेरणा देणारे महात्मा गांधी , डॉ . आंबेडकर या महान व्यक्तिमत्वांच्या कार्याचा उल्लेख आहे .
'जीवन बहता पानी ' या कवितेत कवी म्हणतो .
जीवन है बहता पानी
कभी सुख कि बरसात
तो कभी दुःखों कि लिखी
सत्य कहानी।
'फिर सें लौट आया . '
या कवितेत
माणूस वयोवृद्ध अवस्थेत गेल्यावर
बालपणाच्या आठवणीत रमतो
व आनंदी जगण्याचा प्रयत्न करतो .अशी सुंदर कल्पना केलेली आहे .
'फिरसे लौट आया मेरा बचपन जब मैं खेला बचपन बचपन।
हम बुढ़े तो क्या हुआं, गुड्डी गुड्यिोंका खेल रचाया बचपनं वह मस्त मस्त रिझाया बचपन। फिरसे लौट आया मेरा बचपन ...
महात्मा गांधी यांच्या महान कार्याविषयी कवी 'गांधीजी . . . ' या कवितेत म्हणतो ,
'गांधी नहीं मरते
दौड लगातें है।
फिर से उठकर
दुनियाँ जगाते है। ...
आशय संपन्न अशी अभिव्यक्ती शेषराव जाधव यांच्या 'कविता ए जिंदगी ' या हिंदी काव्यसंग्रह दिसून येते .
'आज की राजनीति ' या कवितेतून कवी आज देशभरातील राजकारणाच्या स्थितीवर मार्मिक भाष्य करतो .
'जनता की भलाई करे
इनसें नहीं उनका वास्ता।
बेकारी बढे या महंगाई बढे
नहीं ऊन्हें आस्था। ...
।महाराष्ट्र है संतोकी भूमी... '
या कवितेत
महाराष्ट्रातील संतांच्या कार्याचा आढावा कवितेत मांडला आहे .
'पंढरीनाथ है मोजूद यहाँ
तुकाराम की विन यहाँ।
ज्ञानेश्वर की अमृत वाणी हैं नामदेव की सुंदर कहाणी।
चोखामेळा संत संत जना है नरहरी ही मौजूद हैं।
एकूणच जीवनातील चढ उतार भावभावना व प्रेरणा घेऊन कवी शेषराव जाधव यांनी हा आपला हिंदी भाषेतील काव्यसंग्रह प्रकाशित केलेला आहे .
त्यांच्या साहित्य लेखन प्रवासाला हार्दिक शुभेच्छा ..
__________________
✍️एकनाथ ल . गोफणे
8275725423
टिप्पणियां