पुस्तक परिचय : -
संविधान विषयक जागृती निर्माण करणारे पुस्तक - 'आपले संविधान आपले हक्क '
----------------------
भारतीय संविधानामधील समता बंधुता न्याय हक्क आणि अधिकार तमाम समाज बांधवांपर्यंत पोहोचविणाऱ्या आंबेडकरी विचारवंताना अर्पण केलेलं ,संविधान विषयक जागृती निर्माण करणारे पुस्तक - 'आपले संविधान आपले हक्क ' हे पुस्तक लेखक पंजाबराव चव्हाण यांनी शब्दवेध बुक हाऊस छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे ६ मे २० २३ रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृतिदिनानिमित्त प्रकाशित करुन जनमानसामध्ये संविधानाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे .
संविधानाची व भारतीय एकतेची ओळख करून देण्याचे कार्य पंजाबराव चव्हाण यांनी केलेलं आहे . ग्रामविकास विभागात सहाय्यक गटविकास अधिकारी पदावरून निवृत्त झाल्यानंतर लेखन वाचन चिंतन मनन हा छंद जोपासत विविध वृत्तपत्र आणि समाज माध्यमातून ते व्यक्त होत असतात . 'याडी ' या मराठी आत्मकथनामुळे ते याडीकार म्हणून प्रसिद्ध आहेत . संविधानाची व भारतीय एकतेची ओळख करून देण्याचे लेखन कार्य त्यांच्या हातून या पुस्तकाच्या माध्यमातून झालेलं आहे .
शंभर रुपये मूल्य असलेले 48 पानांचा हे पुस्तक भारतीय संविधानाची ओळख संघराज्य आणि राज्यक्षेत्र नागरिकत्व मूलभूत अधिकार ,राज्य धोरणाची निर्देशक तत्व मूलभूत कर्तव्य संघराज्य राज्य पहिल्या अनुसूची च्या भाग ख मधील राज्य संघराज्य क्षेत्र पंचायती नगरपालिका सहकारी संस्था अनुसूचित क्षेत्रे जनजाती क्षेत्र संघराज्य आणि राज्य यामधील संबंध वित्तव्यवस्था मालव्यवस्था संविधान आणि दावे भारताच्या राज्यक्षेत्रातील व्यापार वाणिज्य आणि व्यवहार संघराज्य आणि राज्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या सेवा न्यायाधी करणे निवडणुका विवक्षित वर्ग संबंधी विशेष तरतुदी राजभाषा आणीबाणी संबंधित तरतुदी संकीर्ण संविधानाची सुधारणा असता ही संक्रमण कालीन व विशेष तरतुदी संक्षिप्त नाव प्रारंभ प्राधिकृत हिंदी परिपाठ निरसने मूलभूत परिशिष्ट अनुसूची मानवी कल्याणाचा श्रेष्ठ ग्रंथ संविधान विचाराचा ज्ञानाचं खरं सोडून तुटण्याचा एकमेव प्रेमळ स्थान दीक्षाभूमी नागपूर आणि चैत्यभूमीवर 50 कोटीची पुस्तके खरेदी करणाऱ्या आंबेडकरी जनतेपासून आम्ही केव्हा शिकणार आहोत या लेखांसह
या पुस्तकात त्यांनी सविस्तर अशी मांडणी केलेली आहे.
पुस्तकातील मुद्देसूद मांडणी वाचकांना संविधानाची सविस्तर माहिती देत आहे .अनुच्छेद एक ते 395 आणि राष्ट्रीय परिशिष्टांसह या पुस्तकाचं लेखन केले आहे .
सर्व वाचकांना या छोट्या पुस्तकातून संविधानाचा मोठा विस्तृत भाग सखोल माहितीसह उपलब्ध करुन देण्यात पंजाबराव चव्हाण हे यशस्वी झाले आहेत .
प्रकरण तीन मधील राज्य विधिमंडळाची सर्वसाधारण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे .घरोघरी आणि मनामनामध्ये संविधानाविषयी जागृती निर्माण करण्यात पंजाबराव चव्हाण यांनी लिहिलेलं आपले संविधान आपले हक्क हे पुस्तक उपयोगी ठरेल .
या पुस्तकात तीन लेखांचा समावेश केलेला आहे . त्यामध्ये मानव कल्याणाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ संविधान .
विचाराचा ज्ञानाचं खरं सोनं लुटण्याचं एकमेव प्रेरणास्थळ - दीक्षाभूमी नागपूर .आणि चैत्यभूमीवर पन्नास कोटीची पुस्तके खरेदी करणाऱ्या आंबेडकरी जनतेपासून आम्ही केव्हा शिकणार आहोत .या लेखाच्या माध्यमातून वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यात सर्वांचा मोलाचा हात आहे . हेच लेखकाला सुचित करायचा आहे .
देशभरात संविधान विषयक जनजागृतीची जी चळवळ सुरु आहे . त्यात 'आपले संविधान आपले हक्क ' या शिर्षकाचे संविधान विषयक जागृती निर्माण करणारे पुस्तक प्रकाशित करुन लेखक पंजाबराव चव्हाण यांनी जे योगदान दिलं आहे ते कौतुकास्पद आहे .
----------------------
पुस्तक परिचय : - लेखन
✍️एकनाथ लक्ष्मण गोफणे
8275725423
Comments