top of page
खोज करे
लेखक की तस्वीरEKNATH GOFANE

सहित्यमूल्य जपणारा समीक्षा संग्रह –“स-समीक्षेतला”

पुस्तक परिचय

सहित्यमूल्य जपणारा समीक्षा संग्रह –“स-समीक्षेतला

-------------------------------------------------------------------------------------------------


दिशा प्रकाशन पुणे यांच्यातर्फे १९/९/२०२३ या दिवशी प्रा.ज्योती देसाई (पेंढारकर) यांनी समीक्षा करुन संपादित केलेला “स-समीक्षेतला” हा सहित्यमूल्य जपणारा समीक्षा संग्रह प्रकाशीत झालेला आहे. या पुस्तकांमध्ये महाराष्ट्रातल्या नामवंत अशा एकूण सतरा कवींच्या 32 साहित्यकृती आणि त्यावर आधारित समीक्षात्मक लेखन आहे.

आजच्या विद्रोही व इतर कवितांचे आस्वादक समीक्षण प्राध्यापक ज्योती देसाई यांनी केलेलं आहे.

एकत्रित स्वरूपात वाचकांना विविधांगी कविता ,गझल,ललित लेख यासंग्रहात वाचायला मिळतात.त्यासोबतच त्यावर आधारित आस्वादक समीक्षण वाचण्याची एक वेगळीच अनुभूती वाचकांना देत असतात.

यामध्ये कवि साहेबराव मोरे यांच्या माय ,लेख दमछाक स्वतंत्र देशाची, वरवंटा, महापूर या आहेत.

व्यंगचित्रकार प्रा.बी.एन.चौधरी सरांची भोंगा या शीर्षकाची कविता या संग्रहात आहे .प्रमोद जगताप यांची प्रवास, लावली मी मोहमाया, घरदार या कविता या संग्रहामध्ये वाचता येतात यशवंत पगारे यांची पर्स, लेकराची झोळी , हिरवी बोली बोलत असते आणि घरटे बांधत गेलो या चार गझलाचा यामध्ये समावेश केलेला आहे . अनिल भालेराव यांचे ‘प्राजक्त दरवळला’ हा ललित लेख सुद्धा यामध्ये समावेश केलेला आहे. सोबतच जयराम मोरे यांच्या ‘हृदयात बाग पुन्हा सजणार नाही’,दीट(दृष्ट) या कविता आहे. अनिल भालेराव, संतोष वाटपाडे ,सुजाता काळे, रमेश राठोड ,बी अनिल, माधुरी देव ,श्रेयस शिंदे, मधुरा चव्हाण ,गणेश निकम आदी साहित्यिकांच्या साहित्यकृती या संग्रहामध्ये आहे .ज्योती देसाई यांनी एक वेगळाच प्रयोग मराठी साहित्यात या निमित्ताने केलेला आहे. यानिमित्त त्यांचे अभिनंदन .

साहित्याची समीक्षा ही रुपनिष्ठ ,न्यायिक, चरित्रात्मक मानसशास्त्रीय, आदिबंधात्मक, व आस्वादक समीक्षा याप्रकारात होते असते . प्रा.ज्योती देसाई यांनी 31 कविता एक ललित लेख या साहित्यकृतींचे समीक्षण करतांना कोणतेही काटेकोर नियम ण बघता अगदी सहजतेने आणि रसिकतेने केलेले दिसून येते . आपल्या समोर आलेल्या साहित्यकृतीचा आस्वाद घेत आस्वादक समीक्षा लिहून त्यांनी पूर्ण केलेली आहे. यासाठीच –“स-समीक्षेतला”हा समीक्षा संग्रह सहित्यमूल्य जपणारा वाटतो.समीक्षकाची भूमिका आस्वादकाची असली पाहिजे. ही संकल्पना प्रा.ज्योती देसाई (पेंढारकर) यांनी खरी करून दाखविली आहे. या संग्रहातील प्रत्येक कवीची कविता ही एक स्वतंत्र व अनन्यसाधारण अशी निर्मिती आहे. प्रा.बी.एन .चौधरी यांची ‘भोंगा’ ही कविता

सत्य सांगत विदारक स्थितीच दर्शन घडवीत सवाल करते.

एका भोंग्याने लोकांच डोकं भडकलं!

त्यात प्रार्थनेचा वार .........

कि न मागतो राम

न मागतो रहीमही ..

का ठेवता गड्यांनो

मग अस्तनीत भोंगा?.


तर साहेबराव मोरे या ‘लेक ‘ या रचनेतून दुर्दैवी सत्य सांगतात .

लालसेच्या धृतराष्ट्री चष्म्यातून

मायचं ‘संजय निराधरच’

फाईलही सुटत नाही..


कवितेची निवड व त्यावर त्या समीक्षात्मक लेखनाचा हा एक आगळावेगळा प्रयोग मराठी साहित्यामध्ये प्रा. ज्योती देसाई पेंढारकर यांनी केलेला आहे . कवितांचा आस्वादक रसग्रहण आणि लेखनाला बळ देणारी ही निर्मिती असलेला हा संग्रह निश्चितच एक चिंतनशील आणि प्रेरणा देणारा ठरला असंच या निमित्ताने म्हणावे लागेल. स-समीक्षेतला आहे. स-समाजमनाच्या प्रतिबिंबांचा आहे.स-समाजजागृतीचा आहे. स-साहित्याचा आहे .असा सहित्यमूल्य जपणारा समीक्षा संग्रह –“स-समीक्षेतला” आहे.सर्व रसिक या संग्रहाच स्वागत करतील.

विद्रोही कवी साहेबराव मोरे यांची प्रस्तावना लाभलेला हा अप्रतिम संग्रह आहे.

प्रा. ज्योती देसाई (पेंढारकर) यांच्या संपादन व समीक्षेला हार्दिक शुभेच्छा .




....................

एकनाथ लक्ष्मण गोफणे.

8275725423

चाळीसगाव.

112 दृश्य0 टिप्पणी

Comments


bottom of page