top of page
खोज करे
लेखक की तस्वीरEKNATH GOFANE

सामाजिक तळमळीतून जाणीव जागृतीचा वैचारीक आविष्कार 'जगणं रानफुलांच '

पुस्तक परिचय



सामाजिक तळमळीतून जाणीव जागृतीचा वैचारीक आविष्कार

'जगणं रानफुलांच '

----------------------

लेखक वसंत भाऊराव राठोड हे चळवळीच्या माध्यमातून अनेक गाव ,वाडी , तांडे , गुडा , पोडा , वस्ती येथे फिरले काही प्रखर अनुभव त्यांना आले आणि तेथील लोकांच्या विविध समस्या त्यांना समजल्या .शहर विकसित होत आहेत पण ग्रामीण भागात राहणारा तळागाळातला सर्वसामान्य माणूस हा विकसित शहराच्या परिवर्तनापासून आणि या परिवर्तनाच्या मुख्य मार्गापासून कोसो अंतर दूर आहे . दारिद्र्य दुःख लाचारी अंधश्रद्धा वैद्यकीय कमतरता विषमता मुलक जीवन जगत राहणाऱ्यांच्या लोकांना आणि तरुण युवकांना सामाजिक जाणीव जागृती व्हावी त्यांच्या चेतना निर्माण व्हावी . हा तळमळीचा समाज जागृतीचा मुख्य उद्देश घेऊन समाजात विविध विषयांसंदर्भात जाणीव जागृती निर्माण व्हावी यासाठी लेखक वसंत भाऊराव राठोड यांनी क्रिएटिव्ह पब्लिकेशन नांदेड या प्रकाशाच्या माध्यमातून 'जगणं रानफुलाचं ' या वैचारीक पुस्तकाचे लेखन केले आहे .


डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे डॉ . प्रल्हाद लुलेकर यांनी या वैचारिक पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे .

महाराष्ट्र तेलंगाणा आंध्रप्रदेश सीमेवर असलेल्या किनवट तालुक्यातील मांडवी या ठिकाणी लेखक शिक्षक म्हणून आदिवासी भागात कार्य करीत आहे .

आदिवासी भागातील माणसांचं जीवन त्यांनी जवळून पाहिलं आहे . त्या तळमळीतून त्यांनी 'जाग पालका ' नंतर आपल्या '

जगणं रानफुलांच ' या दुसऱ्या साहित्यकृतीचं प्रकाशन केलेलं आहे .


समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी चैतन्य निर्माण व्हावे आणि लोकजीवन सुकर होण्यासाठी त्यांनी एकूण वीस प्रकरणांमध्ये माहितीपूर्ण आढावा या पुस्तकाद्वारे घेतलेला आहे .

भारतीय समाजाची स्थिती आणि स्वातंत्र्य ,भारतात लोकशाही प्रणालीचा स्वीकार , विसंगत समाज व्यवस्था आणि ग्रामीण समाज , समाजातील दुर्बल घटकांची अनास्था, आदिवासी समाज व लोकशाही , भारतीय समाज व नागरी जीवन , विसंगत समाज व्यवस्थेच्या समस्या , राजेशाही कडून लोकशाहीकडे वाटचाल ,लोकशाही :शासन व प्रशासन व्यवस्था , मतदारांशी जवळीकता व जनजागृती , जनता व प्रशासनातील दुवा : लोकप्रतिनिधी व विरोधी पक्ष नेते , ग्रामविकास आणि जनता , माहिती अधिकार कायदा - 2005 , ग्राहक संरक्षण कायदा - 1986 ,भारतीय नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य ,

आर्थिक विषमता आणि जातीयता , रानफुलांच्या कृषी व्यवस्थेची दशा व दिशा ,लोकशाही आणि असमान नारी जीवन ,रानफुलांचे अयशस्वी संघटन ,समाजात दृढ झालेली अंधश्रद्धा .आणि यासोबत परिशिष्टांमध्ये विनंती किंवा तक्रार पत्रांचा नमुना सुद्धा देण्यात आलेला आहे .

लेखक म्हणतो ,मुठभर राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांना नादी लावतात राजकीय सत्ताधीश आणि आर्थिक सत्ताधीश यांचे साठे लोटे झाले त्यामुळे लोकशाही प्रणाली प्रभावहीन होत चालली आहे .

ग्रामीण भागात आदिवासी पाड्यांमध्ये वस्तींमध्ये फिरत असताना लेखकाला आलेले अनुभव आणि त्या अनुभवातील असलेली जागृती विषयीची त्यांची तळमळ व

वैचारिक दृष्टी समाजाला देणे हा या लेखनाचा पाया दिसतो .

लेखक म्हणतो ,

वाडी वस्तीतील शहाणी सुरती माणस तरुण पोरांना म्हणायची ,

'पोर हो काळा सोबत लढायला शिका त्याच्या सोबत भांडायच शिका . वेळ आली तर त्याच्यासोबत दोन हात करायला शिका परंतु शिका आवश्यक

.कर भला तो हो भला हा कानमंत्र द्यायची म्हणून मित्रहो शिकणं ही काळाची गरज आहे .

समाजातील दुर्बल घटकांचे अनास्था या प्रकरणात लेखक भटक्या विमुक्तांच्या जीवनाकडे लक्ष वेधतात .रेणके आयोग 2008 साली सादर झाला .पण अजूनही हा रेणके आयोगाचा अहवाल धूळ खात पडलेला आहे असं मत लेखकाने आपल्या या लेखनाद्वारे मांडलेल आहे .

शासशासन प्रशासन समाज व्यवस्थेला लेखकाने आदिवासी समाज व लोकशाही या प्रकरणाद्वारे एक प्रश्न विचारलेला आहे की जमातीचे लोकप्रतिनिधी राखीव जागेच्या नावाखाली निवडून येत होते . ही कोणती समाज विकासाची अदाकारी म्हणावी की दैवी दुर्विलास म्हणावा .

अंधश्रद्धेत न अडकता स्वतः जीवापाड केलेली मेहनत . उचललेले कष्टच आपल्या भाग्यरेषा बदलू शकतात हा आशावाद लेखकाने या पुस्तकाच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे .

समाजात दैनंदिन व्यवहार करताना अनेक अडचणी येतात .

त्या दूर करण्यासाठी कशा पद्धतीने पत्र लिहावे आपली घराणी मांडावी यासाठी विनंती किंवा तक्रार पत्रांचा नमुना ज्यामध्ये माहिती अधिकार शेतीसंबंधीची तक्रार शेती रस्त्या संबंधीची तक्रार गावातील पाणीपुरवठा ,नळ जोडणे , सिमेंट रस्त्याचे निकृष्ट काम झाल्याबद्दल तक्रार , स्वस्त धान्य दुकान संदर्भात अडचणी , गावातील भांडण तंटा , जिल्हा तक्रार निवारण समिती या संदर्भातील पत्रांचे लेखन कसं करावं याचा एक नमुना सुद्धा या जगणं रानफुलांचं या पुस्तकाच्या माध्यमातून लेखक वसंत राठोड यांनी जनतेसाठी उपलब्ध करुन दिलेला आहे .


समाजाला जागृत करण्यासाठी विविध माध्यमातून त्यांची प्रगती करण्यासाठी वैचारिक समृद्धी समाजात निर्माण होण्यासाठी लेखक वसंत भाऊराव राठोड यांनी .जगणं रानफुलांच ' या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे समाजाला उपयोगी पडेल अशा या पुस्तकाला त्यांनी कै . बळीराम हिरामण पाटील आणि माजी खासदार उत्तमराव बळीराम राठोड यांना हे पुस्तक अर्पण केलं आहे .

सामाजिक विकासाच्या तळमळीतून जाणीव जागृतीचा वैचारीक आविष्कार असलेले

'जगणं रानफुलांच ' हे पुस्तक उपयुक्त आहे .

लेखक वसंत भा . राठोड यांच्या

लेखन कार्यास हार्दिक शुभेच्छा .

----------------------

✍️ एकनाथ लक्ष्मण गोफणे

चाळीसगाव

📲8275725423

7 दृश्य0 टिप्पणी

Commentaires


bottom of page