दखल एका दिवाळी अंकाची....!
सुज्ञ वाचकांना परिवर्तनाच्या वाटेवर नेणारा ई- दिवाळी अंक स्वच्छंदी भरारी- 2024
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
✍️संपादक -एकनाथ गोफणे
✍️याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद -94 21 77 43 72
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*सहभागी लेखक/ कवी*
१) कवी सुरेश मंगुजी राठोड काटोल- नागपूर
२) कवी निरंजन व मुडे चिल्ली- इजारा बदलापूर, मुंबई
३) कवी प्रा. नेमीचंद चव्हाण अकोला
४) लेखक- प्रा.डॉ. विरा राठोड छत्रपती संभाजी नगर
५) कवी बाबूसिंग राठोड दारव्हा.
६) लेखक प्रा. आनंदा जाधव बिदर
७) लेखक विशाल बंडूसिंग लूणसावत
८) लेखक बी. सुग्रीव सिरोंचा
९) कवी गजानन जाधव सावरगाव कानोबा.
१०) कवी विनोद राठोड कल्याण.
११) कवी अजय रमेश चव्हाण तरनोळी, दारव्हा.
१२) कवी मोहन भिकू विसलावत किनवट
१३) लेखक प्रा. घनश्याम राठोड
१४) कवी सुनील पंडित चव्हाण जालना.
१५) कवी अनिल जाधव नागपूर
१६) लेखक याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद
१७) कवी अरुण पवार परळी.
प्रसिद्ध साहित्यिक तथा प्रतिभावंत कवी मा. एकनाथजी गोफणे सरांनी सर्वसामान्य वाचकांना केंद्रस्थानी ठेवून विविधांगी विषयाची सुंदर मांडणी केलेला ई- दिवाळी अंक स्वच्छंदी भरारी-२४ काल वाचण्यात आला. अत्यंत सुबक आणि सुंदर असा हा दिवाळी अंक तमाम बहुजन वाचकांना परिवर्तनाच्या दिशेने नेणारा हा अंक खरोखरच अप्रतिम आहे. अंकाची सुरुवात गोरबंजारा साहित्यातील प्रचंड ताकतीचा कवी आणि जांगडबुत्ताकार सुरेश राठोड यांच्या देमा गुरु या कवितेने सुरुवात झालेली आहे आणि त्यांनी आपल्या पहिल्या ओळीतच सर्व वाचकांची विकेट घेतलेली आहे.
सपनेम देमा गुरु केरोतो रातेन!
वेळ गमावो मत,थोती वातेम !!
या अप्रतिम ओळी दैनंदिन जीवनामध्ये सुरू असलेल्या आलतुफालतू गोष्टीकडे लक्ष न देता आपण भविष्याकडे वाटचाल कऱ्यायला पाहिजे असेच कवी सुरेश राठोड यांनी या अंकाची सुरुवात करून झणझणीत अंजन घालण्याचा खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. आणि शेवटी ते म्हणतात...
*सिकचं सिकावचं,सिके राज घडायचं!!*
*जगदनीयाम गोरुरो, सन्मान बडावचं!!*
*सवारेरो भविष्य रचं,आजेरी रातेम!!*
*वेळ गमावो मत थोती वातेम.....*
कवी सुरेश राठोडला मनापासून धन्यवाद देतो 🙏🙏!
दिवाळीचा अंक आणि निवडणुकीची घाई याचा मेळ बसवून प्रसिद्ध हास्य आणि शीघ्र कवी निरंजन मुडे यांनी *मतदान करो* या कवितेत मतदानाचे महत्त्व पटवून दिले आहे आणि ते लोकशाही मजबूत करण्यासाठी...
*धाकेती कोणी हाक्केती करो..!*
*लोकशाहीम सेज मतदान करो..!!*
असा नारा देऊन लोकशाही मजबुतीकरणाची संकल्पना मांडलेली आहे.
दिवाळी अंक म्हणजे दिवाळीची कविता आलीच *धन धन देयेस ये दवाळी याडी* या कवितेत प्रसिद्ध कवी प्रा. नेमीचंद चव्हाण यांनी दिवाळीचे महत्त्व पटवून देतानाच गोर संस्कृतीला उजाळा दिलेला आहे.
*पितळखोरा लेणी* या लेखांमध्ये प्रसिद्ध लेखक आणि साहित्य अकादमी युवा पुरस्कार कवी प्रा. डॉ. वीरा राठोड यांनी पितळखोरा लेण्याची अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करून लेण्यांची ऐतिहासिक माहिती उजागर करण्याचा फार चांगला प्रयत्न त्यांनी या लेखांमध्ये केलेला आहे.
गोरसिकवाडी साहित्यदलाचे संयोजक प्रसिद्ध कवी तथा गोर विचारवंत बाबूसिंग राठोड यांनी *गोरमाटी* कवितेत मधून गोरमाटीची संस्कृती, धाटी आणि गौरवशाली इतिहास मांडलेला असून गोरमाटी धाटीची आठवण या दोन ओळीत करून दिलेली आहे...
*भुलाडीनं वाट तरसेन पाणी भुकेर बाटी छू.*
*ढाकडार मोल करेवाळो म गोरमाटु छू!!*
भर उंदाळेम धाकडा मोरावछं. करणच *संत सेवाभाया केगो म गोरुन केशुलांनयी मोरायुं!*
ही आठवण जिवंत ठेवण्यासाठी कवी बाबुसिंग राठोड यांनी *ढाकडार मोल करेवाळो म गोरमाटी छूं..* या अप्रतिम ओळी गोरमाटी कवितेच्या माध्यमातून लिहून बाबूसिंग राठोड यांनी ताकतीने सर्वच आघाडीवर लढा देण्याचा संदेशच त्यांनी गोरमाटी गणाला दिलेला आहे.
कवी प्रा. नेमीचंद चव्हाणची याडी, प्रा.आनंद जाधवचा सकऱ्या, विशाल बंडूसिंग लूणसावत यांची साकी- भुरीया या मनाला चटका लावून जातात.
प्रसिद्ध गोर विचारवंत बी सुग्रीव यांचा *बणजारा तांडयातील शिक्षणाच्या प्रगतीसाठीचे उपाय* हा लेख महानायक वसंतराव नाईक साहेब यांच्या शिक्षण धोरणाच्या नीतीची आठवण करून देणारा असून पद्मश्री रामसिंगजी भानावत आणि महानायक वसंतराव नाईक साहेबांच्या समकालीन समाजसुधारकांनी डोंगरदऱ्यात राहणाऱ्या तमाम गोरमाटी समाजाला शिक्षणाच्या दिशेने नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी त्यांना जीवाचे रान करावे लागले या सर्व गोष्टीं अंतर्भूत असलेला, अत्यंत अभ्यासपूर्ण असा हा लेख लिहून या दिवाळी अंकाची शान वाढवलेली आहे.
बी सुग्रीव हा प्रचंड ताकतीचा ऐतिहासिक लेखक त्याच्या लिखाणाला तोड नाही. अशासारख्या विद्वान माणसाच्या परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या लेखाने निश्चितच या दिवाळी अंकाचे महत्व वाढलेले आहे.
गोर साहित्यातील सुप्रसिद्ध आशावादी कवी गजानन जाधव यांची *गोरु र आशा* ही कविता मनाला चटका लावून जाते.
*शिकार करेवाळा वागडा!* *खड मत खायेस!!*
*नवणं करेवाळू बाळा बापू!* *पण केरी सरणं मत जायेस*
या अप्रतिम ओळीने शूरवीर बंजारा समाजाची आठवण होते.
कवी विनोद राठोड, कवी अजय रमेश चव्हाण यांच्याही कविता सुंदर आणि अप्रतिम आहेत.
प्रसिद्ध कवी एकनाथजी गोफणे सरांची *साकी -नवसी* ही पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते.
*जो कोणी मळो वेदेम ऊ मळो हरप्पणीर गिदेम या पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक मोहन भिकू विसळावत* यांची कविता ही गोर बंजारा समाजाची ऐतिहासिक रूढी जतन करा अशी हाक देते.
प्रसिद्ध गोर कथाकार प्रा. घनश्याम राठोड यांची *दन ढळगो* ही कथा गोरमाटी गणातील प्रचंड व्यथा आणि वेदना मांडून जाते.
जालना जिल्ह्यातील नवकवी सुनील पंडित चव्हाण यांची *याडी* ही कविता शाळेत जाणाऱ्या बाळांना गोडी लावणारी आहे.
नागपूरचे प्रसिद्ध कवी अनिल जाधव यांची *केनीमत केस* हे हास्यरंग वाचकांना हास्यरंगात डुबून देते.
आणि शेवटी प्रसिद्ध कवी अरुण पवार यांच्या *फरेंगी घोळ* या कवितेने या सुंदर आणि अप्रतिम अंकाचा शेवट करण्यात आलेला आहे. प्रसिद्ध कवी अरुण पवार यांनी आपल्या फरेंगी घोळ कवितेमध्ये तमाम गोरगणातील नेते ,विचारवंत, प्राध्यापक, डॉक्टर, विविध संघटनेचे पदाधिकारी यांना उद्देशून ते म्हणतात ......
तारी लदणी समाळ सुदो वाटेन
घणे लुटारू चोर बेटे घाटेम!
अशी आर्त हाक या कवितेतून देऊन त्यांनी सगळ्यांनाच सावध राहण्याचा इशारा दिलेला आहे. आपल्या कविता प्रोग्रामच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात परिवर्तनाची मशाल घेऊन तांडा तांडा पेटवणारा हा प्रसिद्ध कवी फरेंगी घोळ या कवितेच्या माध्यमातून त्यांनी स्वच्छंद भरारी ई- दिवाळी अंकांचा शेवट गोड करून या दिवाळी अंकाची उंची वाढवलेली आहे.
काही लेखकांच्या कविता दोन दोनदा घेतलेल्या असून दिवाळीच्या अंकात पोळा ही कविता घेतलेली आहे. एवढे मायनस केले तर एकंदरीत अप्रतिम आणि ज्ञानवर्धक असा हा स्वच्छंदी भरारी ई दिवाळी अंकप्रसिद्ध कवी तथा संपादक एकनाथजी गोफणे सरांनी प्रसिद्ध करून महाराष्ट्रातील दिवाळी अंकात भर टाकलेली आहे. हे कोणालाही नाकारता येत नाही. सर्वांनी वाचावा असा हा सुंदर स्वच्छंदी भरारी ई- दिवाळी अंक असल्यामुळे मी प्रथमतः या दिवाळी अंकाचे संपादक एकनाथजी गोफणे सरांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि या अंकामध्ये ज्यांनी ज्यांनी कविता, लेख ,कथा लिहिलेल्या आहेत त्या सर्व लेखक, साहित्यिक, कवी व विचारवंतांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो!!
जय गोर... जय सेवालाल... जय वसंत!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
✍️याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद- 94 21 77 43 72*
Comments